गाये तो गाये कहा
गाये तो गाये कहा
मला गाण शिकायच आहे खर पण आवाज साथ देत नाही. तस लहानपणी मुलीला झोपोवताना अंगाई गीत म्हणून तीला झोपवले होते नाही अस नाही पण त्यातही ती जास्त गाण ऐकायला नको म्हणून कदाचित लवकर झोपी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता विचारल तर सांगेल ही एखाद वेळेस.
माझी गाण म्हणण्याची हौस मी गणपतीच्या आरती म्हणतात तेंव्हा भागवून घेतो. भक्त संकटी नानाSS म्हणताना आमच्या सोसायटीतल्या नाना नाडकर्णीना बघत नाना तला ना (पहीला ना नाही दूसरा ना ) ओढ़त ओढ़त म्हणतो. तो इतरांच्या आवाजात आवाज मिसळून म्हटल्या मुळे चालून जातो. आरती म्हणताना आपली गायनाची हौस भागवून घ्यावी या स्पष्ट मताचा मी आहे.
मिसळपाव