मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुमचे आवडते "इंग्रजी सिनेमांचे थीम संगीत" कोणते?

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हिंदी सिनेमांना थीम संगीत नसतेच असे नाही, पण पण त्यांची धाव ही "टायटल साँग" पुरतीच मर्यादित. कोणे एके काळी हिंदी सिनेमांना टायटल साँग असणे अनिवार्य होते. उदा, "जब प्यार किसि से होता है" किंवा "युं तो हमनें लाख हसीन देखे है." किंवा मग टायटल साँग नसेल तर, मग जंगली सिनेमातील "ऐहसान तेरा हो गा मुझपर" हे गाणे. सगळ्यात शेवटचा "टायटल साँग" वाला सिनेमा बघीतला तो "सनम तेरी कसम" तसे थीम म्युझिकचा प्रयोग हिंदी सिनेमांनी पण केला आहेच, "इत्तेफाक" ह्या सिनेमाची पण सुरुवातीला "कॅलिडोस्कोपिक" बॅकगाऊंड वर नावे दाखवली आहेत.पण हे असे काही सिनेमे अपवाद म्हणूनच. हिंदी सिनेमांत गाजलेली थीम म्युझिक दोनच एक म्हणजे शोले आणि दुसरा डॉन (अमिताभह्या, दोघांचीही थीम म्युझिक अप्रतिम. पण मग पुढे इंग्रजी सिनेमे बघायचे व्यसन लागले आणि आम्ही नकळत इंग्रजी "थीम म्युझिक"च्या प्रेमात पडलो. मुळात "थीम म्युझिक" असे हवे की ते चित्रपटाच्या कथेला पूरक हवे किंवा कथा नायकाची वैशिष्ट्ये समजायला हवीत. आल्फ्रेड हिचकॉकला "थीम म्युझिकचे" महत्व फार उत्तम रित्या समजलेले होते. असे माझे निरिक्षण. "सायको" हा सिनेमा खरोखरच उत्तम होता पण त्याला सुरुवातीच्या "थीम न्युझिक" मुळे सिनेमा पहिल्या क्षणापासूनच पकड घेतो. https://www.youtube.com/watch?v=Tek8QmKRODw तसेच हिचकॉकचा व्हर्टिगो, https://www.youtube.com/watch?v=4CZfSc6nJ8U आणि "रियर विंडो" https://www.youtube.com/watch?v=4No2ZhJwVGU "डायल M फॉर मर्डर" https://www.youtube.com/watch?v=3GZt8n-PGyg आणि मला आवडलेले "नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट" https://www.youtube.com/watch?v=KVUnUmPV33c ========= इंग्रजी सिनेमांचा विषय आणि मग त्यात काऊ बॉईज नसतील तर मग कसे? "द गूड, द बॅड अँड द अग्ली" https://www.youtube.com/watch?v=h1PfrmCGFnk युल ब्रायनरचा "द मॅग्निफिशंट सेव्हन" https://www.youtube.com/watch?v=yulmgTcGLZw मॅकेनाज गोल्डचे "ओल्ड टर्की बझार्ड" https://www.youtube.com/watch?v=h7mVLWcMm-U ========== मला आवडलेली अजून काही थीम म्युसिक. इंडियाना जोन्स https://www.youtube.com/watch?v=-bTpp8PQSog सुपर मॅन https://www.youtube.com/watch?v=e9vrfEoc8_g स्टार वॉर्स https://www.youtube.com/watch?v=_D0ZQPqeJkk ई. टी. https://www.youtube.com/watch?v=O15x-B8PgeE द गन्स ऑफ नॅव्हेरॉन https://www.youtube.com/watch?v=Ewi1LRld5_k व्हेर इगल डेअर https://www.youtube.com/watch?v=8XKGhG0W0LQ द लाँगेस्ट डे https://www.youtube.com/watch?v=gZ7hYEJt2UY सेव्हिंग प्राय्व्हेट रायन https://www.youtube.com/watch?v=y-lyqc0ZDCA मिलियन डॉलर बेबी https://www.youtube.com/watch?v=fQgIQ65XdDU टर्मिनेटर https://www.youtube.com/watch?v=mpMg1upld0w गॉडफादर https://www.youtube.com/watch?v=1aV9X2d-f5g गॉन इन सिक्स्टी सेकड्स https://www.youtube.com/watch?v=Q8HTUTP7ohQ नॅशनल ट्रेझर https://www.youtube.com/watch?v=YFrfAM0U_5M द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय https://www.youtube.com/watch?v=83bmsluWHZc द ग्रेट एस्केप https://www.youtube.com/watch?v=MbsuAbTTsV8 मिशन इंपॉसिबल https://www.youtube.com/watch?v=XAYhNHhxN0A पायरेट्स ऑफ द कॅरेबियन https://www.youtube.com/watch?v=27mB8verLK8 कम सप्टेंबर https://www.youtube.com/watch?v=te7I_ta7Vzc (ह्याने बर्‍याच काळ मोहिनी घातली होती, जवळपास प्रत्येक जादूच्या कार्यक्रमात ह्या संगीताचा वापर ऐकला आहे.) हॅरी पॉटर https://www.youtube.com/watch?v=Htaj3o3JD8I कॅच मी इफ यु कॅन https://www.youtube.com/watch?v=gaLDyrun_Cc पिंक पँथर https://www.youtube.com/watch?v=9OPc7MRm4Y8 आणि आणि आणि १९६२ पासून अद्यापही तितकेच श्रवणिय जेम्स बाँड https://www.youtube.com/watch?v=ye8KvYKn9-0

वाचने 8792 वाचनखूण प्रतिक्रिया 25

सतीश कुडतरकर 26/06/2017 - 16:39
रॉकी - https://www.youtube.com/watch?v=I33u_इल्ली३व हा कसा काय मिसला.
टॉम क्रूज़चा बेस्ट पिक्चर - द लास्ट सामुराई - https://www.youtube.com/watch?v=स्विउयवत७केक & https://www.youtube.com/watch?v=-०ओ७८क्काय६ए - हान्स झिमरच उत्कृष्ट संगीत

एस 26/06/2017 - 17:30
हिंदी किंवा भारतीय चित्रपटांतही थीम संगीताचा वापर (किंवा स्वतंत्र विचार) केलेला दिसतो. उत्तम उदाहरण म्हणजे 'सरकार' चित्रपटाचे कै. अनिल मोहिले यांनी दिलेले पार्श्वसंगीत. 'गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा....'. ए. आर. रहमान यांनीही अफलातून पार्श्वसंगीत दिले आहे काही चित्रपटांना. मराठीत 'जोगवा', 'किल्ला' अशा चित्रपटांचेही पार्श्वसंगीत श्रवणीय आहे.

In reply to by एस

अप्पा जोगळेकर 28/06/2017 - 10:52
सरकार चित्रपटात नुसता अंधार आहे. आणि ते गोविंदा गोविंदा इतक्या जोरात वाजते की कान किटतात आणि आशय पोचवणारे डायलॉग इतक्या हळू आवाजात आहेत की काहीच कळत नाही.

कपिलमुनी 26/06/2017 - 17:45
Good Bad Ugly ची थीम https://youtu.be/AFa1-kciCb4

स्रुजा 26/06/2017 - 18:42
१०० फीट जर्नी चं ही पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. तो सिनेमाच फार सुंदर आहे आणि रेहमानचं संगीत बाप !!

धर्मराजमुटके 27/06/2017 - 09:57
माझी आवडती थिम म्हणजे जनु बांडेच्या फिल्मचे टायटल मुझिक !

मराठी_माणूस 27/06/2017 - 10:27
आकाशवाणीवर पुर्वी (साधारण ७५-७६ च्या सुमारास) दोन कार्यक्रमाच्या मधे, थोडा वेळ असेल तर फिलर म्हणुन एक मेंडोलीन ची (भैरवीतील असावी) धुन लावली जायची ती फर छान होती. कोणाला त्या बद्दल माहीती आहे का ? (सध्या पण एक मेंडोलीन ची धुन वाजवली जाते पण ही ती नव्हे)

तुषार काळभोर 28/06/2017 - 07:51
खाली खाली वाचत येताना, हाच विचार चालू होता की अजून त्याचा उल्लेख कसा नाही केला. रच्याकने, माझ्या वैयक्तिक आवडीचे: द गुड, द बॅड, द अगलीचं (हे खरं तर सैफ अली खान च्या कोणत्या तरी नव्वदीतल्या पिक्चरमध्ये पाहिल्यांदा ऐकलेलं) जेम्स बॉण्ड (हे पण आधी कितीतरी मराठी हिंदी पिक्चरमध्ये पाहिल्यांदा ऐकलेलं, 2003 मध्ये डाय अनादर डे पाहीपर्यंत) मिशन impossible: 2002 मध्ये पहिल्यांदा व्हीसीडीवर पाहिलेला MI2 . टॉम भाऊ कडा चढून जाताना पहिला अन याड लागलं! सायको: हे पहिल्यांदा ऐकलं, फाईंडिंग निमो बघताना. दातांच्या डॉक्टरची भाची दवाखान्यात येते तेव्हा. किलबिल: ओ रेन ईशी हॉटेलमध्ये तिच्या गॅंगबरोबर चालत येते, तेव्हाचं पार्श्वसंगीत. (लुनी टून्स) द रोड रनर शो: ह्यात coyote त्याचा प्लॅन तयार करताना जे वाजतं, ते. हे पण बऱ्याच मराठी चित्रपटांच्या विनोदी ऍक्शन सीन्स मध्ये ऐकून माहिती होतं)

हर्मायनी 28/06/2017 - 08:58
The Grand Budapest Hotel या सिनेमाला २०१५ चा बेस्ट स्कोर साठीचं ऑस्कर हि मिळाले आहे.. उत्तम संगीत.. अवांतर : यातला मि. गुस्ताव हाच Voldemort आहे यावर विश्वासच बसत नाही..
Ghost writer मधील गूढ संगीत, अगदी पहिल्या शॉट पासूनच हा चित्रपट काही तर वेगळा असल्याचे सूचक करतो. रोमन पोलान्स्की यांची अजून ऐक अप्रतिम निर्मिती.

अभिजित - १ 28/06/2017 - 12:44
the last of the Mohicans - https://www.youtube.com/watch?v=9tjdswqGGVg&ytbChannel=EpicMusicChannel8 the departed - https://www.youtube.com/watch?v=WqffDwfu-1w&ytbChannel=Darth%20Vader ओरिजिनल नाहीत हे माहित आहे तरीही ..

चौकटराजा 04/07/2017 - 08:18
गन्स ऑफ नॅव्हरॉन फॉर अ फ्यू डोलर्स मोर व्हेअर इगल्स डेअर