मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चाहुली...(चित्रपट गीत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न)

सुमित_सौन्देकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काळजी वाटी मजला तुज्याच प्रीतीने-2 चाहुली दाटी भोवती तुझ्याच प्रीतीने-2 तुज्या वीन राहु कसा गीत हे गाऊ कसा स्वप्न हे पाहू कसा तुज्याच प्रीतीचे काळजी वाटी मजला तुज्याच प्रीतीने-2 चाहुली दाटी भोवती तुझ्याच प्रीतीने-2 भास सारे हे छळती भाव मजला न कळती साद का ऐकू येते सांग ना रे...... का कुठे मी हरवतो मीच मजला मिरवतो चाहुली का पुन्हा या सांग ना रे परतुनी ये तू ग पुन्हा... सांग वेडे माझा गुन्हा ये पुन्हा...तू प्रिये...वाट बघते ही मीठी... आज बेधुंद वारा साथीला गार गारा भान नाही मनाला साजणी ग... स्पर्श पुन्हा करुदे हात हाती धरुदे आज मिटूदे अबोला सजणी ग.... जिव माझा आतुरला ध्यान नाही माझे मला... ऐकुदे....मज पुन्हा...आज प्रेमाची कथा...

वाचने 2371 वाचनखूण प्रतिक्रिया 17

तर्राट जोकर Wed, 04/13/2016 - 16:11
(चित्रपट गीत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न) कोणता चित्रपट? सिच्युएशन काय आहे? त्याच्या आधी व नंतर काय होते? गीताच्या चित्रिकरणात काय होते?

In reply to by तर्राट जोकर

तुषार काळभोर Wed, 04/13/2016 - 16:34
आज बेधुंद वारा साथीला गार गारा भान नाही मनाला साजणी ग... स्पर्श पुन्हा करुदे हात हाती धरुदे आज मिटूदे अबोला

प्रचेतस Wed, 04/13/2016 - 16:14
क्या बात है...! दाटी वाटी, छळती कळती, पुन्हा गुन्हा, वारा गारा, करुदे धरुदे... एकापेक्षा एक सरस. येउं द्या अजून.

In reply to by प्रचेतस

नाखु Wed, 04/13/2016 - 16:32
"लिफ्ट" न मिळाल्याने करावी लागणारी मजल दरमजल आहे काय? कारण आजकाल प्रेमातही "लिफ्ट " (कधीमधी गिफ्ट) मिळू शकते असे पोपशास्त्रींचे म्हणणे आहे. पोपवचन नितवाचक नाखु

In reply to by होबासराव

तर्राट जोकर Wed, 04/13/2016 - 16:41
स्वारी, वारा ला यमक लागलं नाही म्हणुन गारा टाकल्या. हे बघा कसं वाटतंय? आज बेधुंद वारा कढईत गरम झारा किंवा आज बेधुंद वारा निवृत्त झाला लारा किंवा आज बेधुंद वारा आकाशी एक तारा ( हायला, हे जमलं की चूकून ;-))

In reply to by तर्राट जोकर

सुधीरन Wed, 04/13/2016 - 17:29
१. आज बेधुंद वारा साथीस पाऊसधारा २. आज बेधुंद वारा मज तूच किनारा ३. आज बेधुंद वारा प्रितरंग हा न्यारा ४. आज बेधुंद वारा बोल तुझा मज प्यारा ५. आज बेधुंद वारा खुला आसमंत सारा ६. आज बेधुंद वारा सहवास तुझा प्यारा ७. आज बेधुंद वारा विसरु ज़माना सारा इ.