मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

..तुला पाहण्याचा मला छंद राणी..

कानडाऊ योगेशु · · जे न देखे रवी...
..तुला पाहण्याचा मला छंद राणी.. दिव्यांना नको तू करु मंद राणी तुला पाहण्याचा मला छंद राणी पुरे सर्व निर्बंध टाळूनि इथले खुली मुक्त हो आज स्वच्छंद राणी मला घे मिठीच्याच कैदेत आणि नको गे करु तू खुले बंध राणी तुला मी मला तू असे प्राशवावे.. पुरी रात व्हावी मधू धुंद राणी.. तुला लागला सावळा रंग माझा तुझ्या मोगर्याचा मला गंध राणी - कानडाऊ योगेशु

वाचने 2849 वाचनखूण प्रतिक्रिया 11

चांदणे संदीप 06/05/2016 - 13:37
प्रेम-गझल आवडली! Sandy

नाखु 07/05/2016 - 16:52
एका प्रेमकाव्याची... उन्हाळी (रखरखीत) धाग्यात अवकाळी पाऊसकळा