नागाला दुध पाजण्याची आहे आपली रिती
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about नागाला दुध पाजण्याची आहे आपली रिती
- 28 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
शत्रूच्या गोळ्यांनी
शहीद सैनिक किती.
ओघळणाऱ्या रक्ताची
किंमत शाई पेक्षा कमी.
कसुरी नागाने
विष ओकले किती.
दही -दुधाच्या नवैद्य
आनंदी दाखविला जी.
शिवबाची लेकुरो हो
कशाला करता राडा.
गुलाम संगीत ऐकुनी
ताल धरा हो त्यावरी.
एका गालावर चापटी
दुसरा गाल पुढती.
नागाला दुध पाजण्याची
आहे आपली रिती.