बाळूचे स्वप्न - (बाल कविता)
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about बाळूचे स्वप्न - (बाल कविता)
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
सशाने धरले सिँहाचे कान
गरगर फिरवून मोडली मान ।
शेळीने घेतला लांडग्याचा चावा
लांडगा ओरडला-धावा धावा ।
मुंगीची ऐकून डरकाळी कानात
हत्ती घाबरून पळाला रानात ।
कासवाने लावली हरणाशी शर्यत
हरीण दमले धापा टाकत ।
उंदराने बोक्याच्या पकडून मिशा
काढायला लावल्या दहा उठाबशा ।
बाळूने मोजले दोन सात चार
स्वप्नात बाळू मोजून बेजार !
'