मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदत

चतुरभ्रमणध्वनीच्या (स्मार्टफोन) कॅमेर्‍याचे नाविन्यपूर्ण उपयोग

डॉ सुहास म्हात्रे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच्या घडीला चतुरभ्रमणध्वनी (स्मार्टफोन) बाळगणे ही नेहमिची गोष्ट झाली आहे. यात संभाषण आणि संदेश पाठवणे या सर्वसामान्य सोईबरोबर फोटो काढण्यासाठी कॅमेरा ही एक आकर्षक सोय असते, हे सांगायची गरज नाहीच. किंबहुना, जेथे जातो तिथला फोटो आणि सेल्फी फेबुवर टाकली नाही तर तो अक्षम्य अपराध असावा असा हल्ली फोनकॅमेर्‍याचा उपयोग होऊ लागला आहे.

सामाजिक उपक्रम -२०१८

निशदे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम आता मिपाला नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. मिपाकरांनीही गेल्या वर्षी भरभरून साथ दिली. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो. ह्या वर्षी ५ पैकी 2 संस्था ह्या नोंदणी झालेल्या असल्या तरी त्यांना देणगी दिल्यावर अजून ८०जी कर सवलत मिळत नाही.

इंग्रजी कादंबरी प्रकाशनासंदर्भात माहिती आणि मदत

समीरसूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर्स, बर्‍याच दिवसांनी भेट होतेय. तसे मी वाचन मोडमध्ये असतोच आणि काही धाग्यांवर प्रतिक्रियादेखील देत असतो पण आताशा जरा माझा मिपावरचा वावर कमी झालेला आहे. मागील वर्षी मार्चमध्ये आमच्याघरी बाळराजांचे सुखद आगमन झाले. ठरलेल्या तारखेच्या दोन महिने आधीच बाळराजांचे आगमन झाल्याने आम्हाला जवळपास दीड महिना अतिदक्षता विभागात बाळाची काळजी घ्यावी लागली. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत मिपावरच काय इतरत्र कुठेच फारसे जाता आले नाही. असो. आजच्या या धाग्याचे प्रयोजन मिपावर इंग्रजी कादंबरीच्या प्रकाशनासंदर्भात काही मदत मिळू शकते का हे आहे.

कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का?

अज्ञात ·
गाभा: माझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा ! १) याने एका सेबी नोंदणीकृत कंपनीत DMAT अकाउंट उघडला होता.त्या कम्पनीने मोठ्या मोठया गोष्टी सांगून त्याला कमोडिटी ट्रेडिंग करण्यास सांगितले.काही काळानंतर त्याच्याकडून ५० हजार रुपये ऍडव्हान्स ब्रोकरेज म्हणून घेतले.आता त्याला अकाउंट बंद करायचा आहे कारण त्याचे बरेच पैसे त्यांच्या टिप्स मुळे बुडले आहेत.पण आता ती कंपनी पैसे परत देण्यास नकार देत आहे कारण आमच्याकडे अशी काही पद्ध्धत नाही म्हणत आहे.तुम्ही जो प्लॅन घेतला होता तो नॉन रिफंडबल होता असे त्यांचे म्हणणे आहे पण आधी असे काहीच आणि कुठेच सां

तातडीची मदत हवी आहे - लेह येथे चारचाकीच्या अननोन इश्यू संदर्भात..

मोदक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, मिपाकर अभिजीत अवलिया २४ ऑगस्ट पासून स्वतःच्या चारचाकीने पुणे-लेह-पुणे दौर्‍यावर आहेत. (गाडी - फोर्ड फिगो - डिझेल) काल दिनांक ३ सप्टेंबरला सकाळी लेह ते खार्दुंगला या रूटवरती साऊथ पुलू नंतर तीन किमी अंतरावर गाडीचा Malfunction Indicator (MAL) पिवळा झाला. तेथून ते परत फिरले आणि थोडे अंतर लेहच्या दिशेने उतरले. मोबाईलची रेंज मिळाल्यानंतर फोर्डच्या टेक्नीकल कॉल सेंटरला फोन केला. त्यांनी सांगितले की हा इंडीकेटर पिवळा झाला तर कांही अडचण नाही मात्र इंडिकेटर लाल झाला तर प्रॉब्लेम असतो.

सामाजिक उपक्रम २०१७ आढावा

अरुंधती ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! मिसळपाव साईटवर आवाहन जरी प्रथमच केले तरी आपल्या सामाजिक उपक्रमाचे हे ८वे वर्ष. या उपक्रमांतर्गत चांगले काम करणाऱ्या; गरजू व नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची नावे, त्यांबद्दलची माहिती आणि त्या संस्थेची सध्या काय गरज आहे याची एक यादी करुन, त्या माहितीची शहानिशा करून यादीतील संस्थांना मदत करण्यासाठी आपण मायबोली.कॉम, मिसळपाव.कॉम तसेच फ़ेसबुकच्या माध्यमातून एक जाहीर आवाहन केले. ( संदर्भ : http://www.misalpav.com/node/39108 ) याप्रकारे आवाहनात दिलेल्या यादीतून इच्छुक देणगीदारांनी आपापल्या पसंतीच्या संस्था निवडल्या व ते देणगी दे‌ऊ शकत असलेली रक्कम सामाजिक उपक्रम टीमला कळवली.

जनरेशन गॅप आणि निळाई

झपाटलेला फिलॉसॉफर ·
CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही. वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

बदलतं मराठी बालसाहित्य - प्रश्नावली भरण्यासाठी मदत हवी आहे

आदूबाळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ (http://www.reshakshare.com/) लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे. यासंदर्भात आजच्या मराठी बाल/कुमार पिढीच्या वाचनसवयी काय आहेत हे टिपण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही पिढी काय वाचते, कसं वाचते, का वाचते, कोणत्या भाषेतलं साहित्य वाचते वगैरे.

अभियांत्रिकीच्या पद्व्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीत कसे जायचे?

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय मिपाकरांनो, ह्या वर्षी आमचे मोठे चिरंजीव बी.ई. इंस्ट्रुमेंटेशन होतील. त्याला पुढील शिक्षण जर्मनीत घ्यायचे आहे. आपल्या मिपा कुटुंबातील सदस्यांना ह्या विषयी काही माहिती असल्यास विचारावे म्हणून हा धागा प्रपंच. आपलाच, मुवि.