Skip to main content

माझी खाद्यशैली योग्य आहे का?

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 11/05/2016 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझे वय पन्नास.अद्याप तरी किडनी, हृदय, रक्तदाब, मधूमेह नाही. रक्तातील आणि लघवीतील साखरेचे प्रमाण योग्य आहे.हिमोग्लोबिन साधारणपणे १२.० च्या आसपास (प्लस-मायनस १) घोटाळत असते. दर ६ महिन्यातून एकदा मधूमेहाची तपासणी करतो.बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते. सध्याची माझी जीवनशैली आणि खाद्यशैली देत आहे.काही कारणांमुळे ती अधुन-मधून बदलत असते.पण डोंबिवलीला आलो की परत नेहमीच्या मार्गावर येते. उठ्णे ==> झोप पुर्ण झाली की, पण जास्तीत जास्त ७:०० वाजता.कधी-कधी पहाटे ५:००ला पण जाग येते.पण मग न झोपता वाचन करत बसतो किंवा फिरायला जातो किंवा एख

सोलापूरचे कुणी आहे का?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 30/04/2016 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कालच "मिळून सार्‍याजणी-दिवाळी अंक-२०१५" वाचला. त्यातील "सौर उर्जा शेती" ह्या विषयावरील "आय.आय.टी की डोंबल" हा अरूण देशपांडे लिखित लेख वाचण्यात आला. ही शेती अंकोले ह्या सोलापूर शहराजवळच्या गावांत आहे. आज श्री. अरूण देशपांडे ह्यांच्या बरोबर प्राथमिक बोलणे झाले. मी आणि आमची सौ.

शेती संदर्भात काही गोष्टींची मदत हवी आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 18/04/2016 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, येत्या १ ते २ महिन्यात मी शेती विकत घ्यायचे आणि तिथेच रहायचे ठरवत आहे.आमच्या अर्धांगिनीने, चिपळूण जवळ शेत जमीन बघीतली आहे. एखादा मिपाकर कुठे अडला तर त्याला मार्ग दाखवायला आणि त्याला मनापासून मदत करायला मिपाकर तयार असतात, ह्याचा स्वानुभव आहे. सध्या त्वरीत हवी असणारी मदत म्हणजे.... १. शेतात पाणी कुठे मिळेल?, ते शोधून देणारा पाणक्या. २. डिझेल पंप विकत घ्यायला आणि तो बसवायला साधारण किती खर्च येतो? आपलाच मुवि.

चोरून बघणे - आधुनिक पद्धत - २ (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 07/04/2016 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
काल मयश्या, दाद्या आणि सम्या आलेले. जबड्याला, पाठीला, कढलेली आंबेहळद लावलेली बघून बेक्कार हसले! :( हरामखोर, शितलीचा भाऊ पंधराएक बाईक, डस्टर घेऊन आलेला, तेव्हा त्याच्या ग्रूपमध्ये थांबलेले! शितलीच्या भावाने मारलेलं चालल असत राव. बापाला कुणी सांगितलं? :( बापाने मार्च एंडिंगवानी हिशोब संपवला! मागचं 'घोडा' प्रकरणही काढल. मुळात चिडण्यासारखं काय होत कळेना! म्हणजे, त्या दिवशी आतेभावाच लग्न ठरल्याचं कळाल. तर आता 'घोडा' लागणार अस म्हटलेलो! आता, वरातीला घोडा नको? बापाने परवा मारताना सारख, घोडा, घोडा म्हणतच मारल! :( ते खडूतून धूर काढल्याचा राग, आता हे शितलीच प्रकरण!

मनीषासाठी..

लेखक यशोधन वाळिंबे यांनी सोमवार, 04/04/2016 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
मनीषासाठी तुमच्याकडे माझी ही मदतीची याचना असे मेसेज मी सहसा फॉरवर्ड करत नाही. पण हा १०० टक्के खराय, याची खात्री असल्याने करतोय. संपूर्ण वाचून इच्छा झाल्यास मदत करता येईल. बघा जमलं तर. पालघर जिल्हा व तालुक्यातील सफाळे नजीकच्या नवघर-घाटीम ग्रामपंचायतीमधील पेणंद या आदिवासी पाड्यातून यंदाच्या वर्षी फक्त एकाच मुलीने दहावीची परीक्षा दिली. तिचं नाव आहे मनीषा बरफ. मनीषाला दहावी पुढेही खूप खूप शिकायचंय, परंतु तिला शिकता येईल का? पेणंद तसेच त्याच्या आजुबाजूच्या पाड्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण फार कमी आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण फारच अत्यल्प आहे.

जर्मनीमध्ये एम.एस - माहिती

लेखक टुंड्रा यांनी गुरुवार, 31/03/2016 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनी हा देश अनेक गोष्टींमध्ये अत्यंत प्रगत देश समजला जातो. मेकॅनिकल इंजिनिअरसाठी तर जर्मनी म्हणजे पंढरीच! म्हणुनच मी इथे उच्चशिक्षण घेण्याचे ठरवले. जर्मनीमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षण मोफत आहे. त्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांशिवाय जर्मनी हा ही एक उत्तम पर्याय आहे. मेकॅनिकल इंजिनिरिंग मध्ये बी.ई केल्यानंतर अजुन थोड्याफार तयारीने मी जर्मनीतल्या डॉर्टमुंड ह्या युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवु शकले. सध्या मला जर्मनीमध्ये एम.एस कसे करावे ह्याची चौकशी करणारे फोन सतत येत आहेत.

नाव सोनीबाई आणि ................

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 07/03/2016 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा ----- निषाद कुलकर्णी या मुंबई आय. आय. टी. च्या विद्यार्थ्याने औरंगाबाद येथील मे. सोनी एक्स्क्लुझिव या सोनी इंडिया प्रा. लि. चे अधिकृत विक्रेते यांच्याकडून २९ एप्रिल २००९ रोजी सायबर शॉट डिजिटल कॅमेरा रु. १२५००/- ला विकत घेतला.

मिसळपावचे मारेकरी - ... ... ...

लेखक नीलमोहर यांनी गुरुवार, 25/02/2016 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्‍यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ...

राष्ट्रीय आयोगाचा सोन्यासारखा निर्णय.....

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 22/02/2016 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण जवळ आले की फ्रीज, टी.व्ही. अशा किमती वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट, हप्त्याने खरेदीच्या योजना, किंवा मोठी भेटवस्तू इ. चा सुकाळ असतो. यामध्ये अलीकडे स्क्रॅच कार्ड योजनेची भर पडली आहे. या योजनेमध्ये खरेदीच्या वेळी बिलासोबत एक कार्ड दिले जाते. त्यावरील एक छोटेसे आवरण खरडले की खाली एका वस्तूचे नाव, चित्र किंवा क्वचित रोख रकमेचा आकडा लिहिलेला असतो. ग्राहकाला बक्षीस म्हणून मिळालेली ही वस्तू, किंवा रक्कम देण्याची मुख्य जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्या उत्पादकाची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वस्तू विकणाऱ्या वितरकाची असते.

दिल से सलूट....

लेखक dipak bhutekar यांनी रविवार, 14/02/2016 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.