नमस्कार मंडळी,
मिपाकर अभिजीत अवलिया २४ ऑगस्ट पासून स्वतःच्या चारचाकीने पुणे-लेह-पुणे दौर्यावर आहेत. (गाडी - फोर्ड फिगो - डिझेल)
काल दिनांक ३ सप्टेंबरला सकाळी लेह ते खार्दुंगला या रूटवरती साऊथ पुलू नंतर तीन किमी अंतरावर गाडीचा Malfunction Indicator (MAL) पिवळा झाला. तेथून ते परत फिरले आणि थोडे अंतर लेहच्या दिशेने उतरले. मोबाईलची रेंज मिळाल्यानंतर फोर्डच्या टेक्नीकल कॉल सेंटरला फोन केला. त्यांनी सांगितले की हा इंडीकेटर पिवळा झाला तर कांही अडचण नाही मात्र इंडिकेटर लाल झाला तर प्रॉब्लेम असतो. (नक्की काय प्रॉब्लेम असतो ते कळालेले नाही)
नंतर पुन्हा त्या रूटवरती गाडी चढवली असता जास्ती उंचीवर गेल्यानंतर तो इंडीकेटर पिवळा होत आहे व गाडीचे अॅक्सेलरेशन कमी होत आहे.
तेथे थोडीफार चौकशी करून ते लेहला परत फिरले आहेत आणि दिनांक ४ सप्टेंबरला पँगाँग लेक येथे जाऊन पुन्हा ५ तारखेला लेह-साऊथ पुलू-नॉर्थ पुलू-खार्दुंगला आणि नुंब्रा व्हॅली असा रूट करणार आहेत.
लेहमध्ये मेकॅनिक आणि इतरांचे प्रचंड वेगवेगळे सल्ले मिळत आहेत. "बिन्धास्त जावा हो कै होत नाही" येथे पासून ते "रेटून चालवा" "क्लच प्लेट गेली आहे" इथंपर्यंत.
या संदर्भात मिपाकरांची तातडीची मदत हवी आहे.
या संदर्भात मिपाकरांची तातडीची मदत हवी आहे.
१) तेथे गेलेल्या कोणाला असा कांही प्रॉब्लेम आला होता का..? त्यावेळी काय केले..?
२) बाहेरील देशात बर्फ / हाय अल्टीट्युडला गाड्यांना असा प्रॉब्लेम येतो का..? त्यावेळी काय करतात..?
३) "लो ऑक्सिजन इंटेक" हा प्रॉब्लेम असल्यास चारचाकीचा ऑक्सिजन इंटेक वाढवता येतो का..? (कारण अॅक्सलरेशन कमी कमी होत आहे)
* तुमच्या मित्रमंडळींमध्ये किंवा आणखी कोणाला कांही माहिती असल्यास कृपया कळवा.
** अभिजीत यांच्याशी कोणाला बोलून नक्की प्रॉब्लेम समजून घ्यायचा असल्यास मला व्यनी करा - मी त्यांचा तिथला नंबर व्यनीने पाठवेन.
*** लेह आणि त्यातही पँगाँगला फोन लागणे हे एक दिव्य असले तरी ४ सप्टेंबरला संध्याकाळी आमचे बोलणे होईल तेंव्हा या धाग्यावरील उपयोगी प्रतिसाद मी त्यांना कळवू शकेन.
प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

वाचने
7696
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
जास्त उंची
अजून थोडी माहिती
In reply to जास्त उंची by मी_आहे_ना
केमिस्ट्री आहे ती.
मला काही जास्ती कळत नाही
धन्यवाद मी_आहे_ना, कंजुसकाका
It’s generally due to high
हो चालेल, सांगतो.
In reply to It’s generally due to high by पप्पुपेजर
धन्यवाद मंडळी. वरील सर्व
निरनिराळ्या घाटांचा चढ मोजून
प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी
अजूनही तो MAL दिवा लागतोय का?
In reply to प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी by मोदक
नाही.
In reply to अजूनही तो MAL दिवा लागतोय का? by एस
लडाख परिसरात नेट चालत