Skip to main content

अनुवाद मदत हवी आहे.

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 25/09/2008 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, लोकायत.कॉम हे मराठीतून संगणक तंत्रज्ञान विषयक लेखन करण्यासाठीचं संकेतस्थळ आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. सध्या या संकेतस्थळावर वेगवेगळ्या विषयावर लेख लिहीने चाललेले आहे. यापैकी एक लेखमाला आहे मुक्तस्रोत सॉफ्टवेअर्स बद्दल. मुख्यतः लिनक्स विषयी मराठीतून तपशीलवार माहिती देण्याचा विचार आहे. हे करतांना एक अडचण जाणवली , ती म्हणजे या मुक्तस्रोत चळवळीचं सार सांगणार्‍या यांच्या परवाण्याचं मराठी भाषांतर उपलब्ध नाही आहे. मी लिनक्स कसं वापरावं याबद्दल लिहू शकतो मात्र या कायदेशीर परवाण्याचं मराठी भाषांतर करणं मला कठीण आहे.

रंगीत मिरच्या - रेसिपी सुचवाल ?

लेखक ईश्वरी यांनी शनिवार, 10/05/2008 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एका परिचितांनी एक रन्गीत पाकीट दिले...भेट म्हणून. Mixed hot chilli peppers असे त्यावर लिहीले होते. ह्य पाकीटामधे रंगीबेरंगी , जरा जाडसर आणि लांबट आकाराच्या ३५-४० मिरच्या होत्या.

गझल

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 21/04/2008 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
तेव्हा मुकीच होते आता मुकीच आहे आता मुकेपणाचा झाला सराव आहे जातीच्या प्रेमानं मी चिंब चिंब झाले आता धगीत माझे उद्ध्वस्त गाव आहे बोललेच नाही माझ्या व्यथा कुणाला सोसून सर्व घेणे माझा स्वभाव आहे आम्ही येथे भुकेले तेही तिथे उपाशी प्रत्येक माणसाला आमचीच हाव आहे गावात आम्ही हरलोच बाजी सजा न द्यावी त्यांना ऐसा ठराव आहे पाचोळाच जीवनाचा झाला अखेर माझ्या सांगा मित्रहो, माझा दोष काय आहे
Taxonomy upgrade extras

बार्बेक्यू रेसिपिज

लेखक वरदा यांनी शुक्रवार, 18/04/2008 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी इथे आता मस्त लाल पिवळ्या फुलांनी झाडं भरुन गेल्येत आणि सगळ्यांना वेध लागलेत समरचे. समर मधली सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे बार्बेक्यू. मस्त पैकी बागेत किंवा घराच्या अंगणात कोळसे पेटवून शेगडी करायची आणि भाजलेले वेगळे वेगळे पदार्थ खायचे. कोळशावर भाजलेल्या पदार्थाना येणारा तो खरपूस वास एकदम झकास असतो आणि त्यांची चव काही औरच!
Taxonomy upgrade extras

कन्नडा हाडु

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 28/11/2007 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! उदा. कन्नड भाषेतील खालील लोकप्रिय गाणे पहा. (बहुतेकांना नुसतेच पहावे लागेल, वाचता येणार नाही. पुन्हा एकदा हाय!) आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की कन्नड भाषेतील उच्चारांचा गोडवा देवनागरीमध्ये उतरणे शक्य नाही. उदा पत्नी आपल्या पतिला "री" अशी जी गोड लाडिक हाक मारते त्याची री मराठीत ओढता किंवा लिहिता येणे सर्वस्वी कठीण. पण व्याभिचारी आस्वादाला आमचा पाठिंबा आहे.

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

लेखक आजानुकर्ण यांनी गुरुवार, 15/11/2007 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

एजीओजी

लेखक ॐकार यांनी गुरुवार, 08/11/2007 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
दीपावलीचे निमित्त साधून मिसळपावच्या सर्व सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे. सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.