Skip to main content

मदत

मदत हवी आहे - प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे खरेखुरे घर बांधण्यासंदर्भात..

लेखक मोदक यांनी गुरुवार, 20/04/2017 23:25 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मिपाकर्स..

गेले कांही वर्षे सायकल चालवत असल्याने अनेक व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य आहे.. त्यातील एका ग्रुपवर एक मदत संदेश येऊन धडकला.

घर बांधण्यासाठी प्लॅस्टिकच्या वापरलेल्या बाटल्या हव्या आहेत.

उत्सुकता चाळवली म्हणून या प्रोजेक्टची अधिक माहिती घेतली आणि बांधकाम सुरू आहे तेथे भेटही देऊन आलो.

हा प्रोजेक्ट करणार्‍या अवालियाचे नांव आहे राजेंद्र इनामदार, सिंहगडाच्या पायथ्याशी एके ठिकाणी हे बांधकाम सुरू आहे.

दोन कामगार बाटल्या भरताना..

मदत - रामरक्षा स्तोत्र..

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 31/03/2017 18:44 या दिवशी प्रकाशित केले.

एक मदत हवीय.. प्राचीन मिपात, २०१२ च्या सुरवातीच्या काळात, कुणीतरी एका धाग्यात एका भरपूर स्तोत्र असलेल्या वेबपेजची लिंक दिली होती. त्यात एक कुठल्यातरी दाक्षिणात्य (उच्चारांवरुन) गायकानी पठण केलेलं रामरक्षा-स्तोत्र ही होतं. अत्यंत भारावून टाकणारी लय होती त्या पठणात. उच्चारदेखील खणखणीत आणि स्पष्ट होते. मी त्यावेळी ते डाऊनलोड केलं होतं, आणि ऑलमोस्ट रोज रात्री ऐकायचो त्यावेळी.. पण आता ते मला सापडत नाहीये. डाऊनलोड केलेली फाईलदेखील हरवली आहे, आणि मी त्याकाळातल्या माझ्या मिपा भटकंतीचा धुंडाळा घेतला, त्यातही ती लिंक सापडत नाहीये.

दांडी मारणे - एक विलक्षण कला

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 24/03/2017 17:43 या दिवशी प्रकाशित केले.

खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 22/02/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.

तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड!
कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.

अशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.

आकर्षण, प्रेम आणि जवळीक

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 10/02/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.

आज प्रथमच त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले, अंगावर रोमांच उभे राहिले. प्रेमाचे ते काहीच क्षण पण खूप काही देवून गेले. पुढचे कित्येक तास ती हुरहुर मनात पिंगा घालत राहिली. एकमेकांबद्दलच्या प्रेमाने आणि शारिरिक आकर्षणाने दोघे संमोहित झालेत.

हा अनुभव.. खूपच रोमांचक वाटतो , हो ना ?

सिर्फ पचास कमेंट्स चाहिये!!

लेखक बाजीप्रभू यांनी मंगळवार, 27/12/2016 20:42 या दिवशी प्रकाशित केले.

NRI वेल्फेअर कमेटी,
आहार आणि आरोग्य विभाग,
ब्रँच पटाया (थायलंड).

बैठक ठिकाण :- हॉटेल दुसितथानी, नॉर्थ पटाया, चोनबुरी प्रोव्हिन्स.
दिनांक :- ०४ सप्टेंबर २०१६ (रविवार)
वेळ :- सायंकाळी ७ वाजता.

(फक्त) ऑफिस ला पर्याय...

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 24/11/2016 22:59 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मिपाकरहो !
कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का?
अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे.
धन्यवाद.

मुलाखत- स्पेशल एज्युकेटर- वेगळ्या मुलांसाठी.

लेखक कवितानागेश यांनी शुक्रवार, 18/11/2016 10:30 या दिवशी प्रकाशित केले.

लहान मूल हळूहळू मोठे होत जाताना पाहणं ही त्याच्या भोवतालच्या माणसांसाठी फार आनंददायक गोष्ट असते. वेगवेगळ्या आवाजांना, त्यांच्या नावाला, आपल्या बोलण्याला त्यांचे प्रतिसाद देणं हेही खूप सुखावह असतं. त्याचे नवीन नवीन शब्द शिकून बोलून आपल्याशी संवाद साधणं हेही फार आश्वासक असतं, आपल्याला अजून अजून नवीन स्वप्न पहायला प्रवृत्त करणार्‍या या गोष्टी आपण प्रत्येकच लहान मुलांच्या बाबतीत गृहीत धरलेल्या असतात. कारण ही सगळी वाढ अशा प्रकारे होत जाणं हा निसर्गाचा नियमच आहे! पण काही मुले मात्र वेगळी निघतात! तान्ही असतानाच काही खेळण्यांना प्रतिसाद देतात पण हाकेला नाही. अशा वेळेस काही पालक 'मूड नसेल त्याचा' असा…