Skip to main content

तू फूल कुणाचे देखणे?

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 15/04/2016 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! रुजताना होईल अंत नसेल कोणास खंत तू जीव कुणा मायेचा? जा निघून हलक्या पायाने.... तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू..... -शिवकन्या

वाचने 6057
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

वा! ताई! तुमची स्वतंत्र स्टाईल लगेच ठाव घेते मनाचा. अप्रतिम लिहिता. अजून लिहीत रहा! वाचत राहू! चल उड जा रे पंछी के अब ये देस हुआ बेगाना या गीताची आठवण झाली.

In reply to by विजय पुरोहित

तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! अगदी killer आहेत या ओळी...

In reply to by विजय पुरोहित

तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! अगदी killer आहेत या ओळी...

In reply to by प्राची अश्विनी

सहमत प्राचीतै... राजकीय धुळवड आणि आस्तिक नास्तिक कळवंडीपेक्षा असले लेखन 100 टक्के चांगले..

रूपकात्मक कविता आवडली.

मांत्रिक भाऊ म्हणाले तसं पहिल्या चार ओळी एकदम किलर.

आशयाची शब्दांशी गट्टी नाही जमली नको म्हणता धरलेली फुगडीही सुटली स्वारी, नाही आवडली! Sandy

In reply to by चांदणे संदीप

प्रांजळपणा आवडला. :) रच्याकने, फुगडीसाठी कविता नसते ! आपल्यासारख्या रसिकास वेसांनल.

कवितेतील रुपक कदाचित वेगळ्या परिस्थितीवर असेल, पण का कोण जाणे ते मला सहजच मोठ्याशहरात आलेल्या शहरी कष्टाच्या उन्हात होरपळून निघणार्‍या बालकामगारांवर अथवा कोवळ्या वयातील तरुणांवर लावावे वाटले.

In reply to by माहितगार

अगदी बरोबर... असेच वाटते... पण मूळ रचनाच इतकी सुंदर आहे की तिच्या गर्भरेशमी अर्थाच्या कोंदणातून बाहेर पडूच नये असे वाटते... :)

जर्मन कवी Heinrich Heine यांची एक कविता होती - त्याचा मतितार्थ या कवितेप्रमाणेच होता. शब्द दुर्दैवाने आठवत नाहीयेत.

तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा!
काय ओळी आहेत ! अवघी कविताच सुंदर आहे.