✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sat, 04/30/2016 - 15:18
मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून , अर्धातास, निमुट उभा रहात, आमच्या गप्पा ऐकणार्या तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते “आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले दमुन झोपले आहेत बिचारे. नाही तर आम्ही दोघेच येतो भाजी घ्यायला ” त्या वेळी मी पण तिला ठसक्यात सांगते “हा पण काल रात्री दोन वाजता घरी आला आहे” त्यावेळी तिच्या कडे बघून न बघितल्यासारखे करणारा तू मला फार म्हणजे फार आवडतोस शहारुख खान चा सिनेमा तुझ्या सोबत बघताना अचानक आपले बाळ बेंबीच्या देठापासून जोरात ओरडत रडायला लागते (तुझ्यावरच गेला आहे तो, सगळे तुझेच गुण तो आतापासुनच उधळतो आहे) मला सिनेमा अर्धवट टाकून उठायचा प्रचंड वैताग आलेला असतो आणि आजूबाजू चे लोकही शुक शुक करायला लागलेले असतात त्या वेळी तू तुझ्या चेहर्यावर दिसणारी नाराजी लपवत बाळाला घेउन बाहेर जातोस, त्याला शांत करतोस, आणि बाळ झोपल्यावर आत येताना न विसरता माझ्यासाठी पॉपकॉर्न आणि कोक घेउन येतोस तेव्हा तू मला फार म्हणजे फार आवडतोस पोळ्या करणारी बाई दोन दिवस आलेली नसते सासु बाई सुध्दा गावाला गेलेल्या असतात आता संध्याकाळी जेवायला काय करायचे? असा प्रश्र्ण् माझ्या पुढे असतो, कारण कालच खिचडी करुन झालेली असते आणि त्या नंतर तुला रात्री गुपचुप उठुन , किचन मधे डबे शोधताना मीच पकडलेले असते अशा वेळी माझा एकंदर रागरंग बघून तू हॉटेल मधे जाउ म्हणतोस मी उगाचच “नको रे फार खर्च होतो असे म्हणते” तेव्हा तू “अग खर्चाचे जाउ दे ग, एखाद दिवस गेलो हॉटेल मधे म्हणुन काही फरक पडत नाही” असे म्हणत गाडी काढतोस "बघ हं अजून विचार कर या महिन्यात सहाव्यांदा चाललो आहोत आपण होटेल मध्ये " असे लटकेच म्हणत मी गाडी तून उतरते "जाउदे ग असला विचार करता जाऊ नकोस, एनजॉय् द् एव्हिनिंग " असे तू म्हणतोस तेव्हा तू मला फार म्हणजे, फार म्हणजे फार, म्हणजे अतिशयच्, म्हणजे अपरीमित, म्हणजे अशक्य इतका, म्हणजे खुपच जास्त, म्हणजे नको तेवढा, म्हणजे लैच म्हणजे लैच् आवडतोस. खादाडमाऊ झोपेशु क्रमशः (मागच्या जन्माची गोष्ट पुढच्या भागात)

प्रतिक्रिया द्या
9836 वाचन

💬 प्रतिसाद (23)

=))

पैसा
Sat, 04/30/2016 - 15:37 नवीन
फारच रोमांचक कविता आहे!
  • Log in or register to post comments

=))

सस्नेह
Sat, 04/30/2016 - 15:47 नवीन
मिपावरील सर्वात रोमँटिक कविता ! पैजारबुवा __/\__
  • Log in or register to post comments

आईशप्पत

सविता००१
Sat, 04/30/2016 - 15:48 नवीन
लै भारी
  • Log in or register to post comments

.

जव्हेरगंज
Sat, 04/30/2016 - 15:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मजेशीर आहे. धन्यवाद.

असंका
Sat, 04/30/2016 - 15:58 नवीन
मजेशीर आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

हाँटेलिंग पिच्चर गंमत

स्पा
Sat, 04/30/2016 - 16:02 नवीन
हाँटेलिंग पिच्चर गंमत IT couple दिसतय
  • Log in or register to post comments

उत्कट प्रेमविव्हळ कविता..

नीलमोहर
Sat, 04/30/2016 - 16:12 नवीन
'तेव्हा तू मला फार म्हणजे, फार म्हणजे फार, म्हणजे अतिशयच्, म्हणजे अपरीमित, म्हणजे अशक्य इतका, म्हणजे खुपच जास्त, म्हणजे नको तेवढा, म्हणजे लैच म्हणजे लैच् आवडतोस.' - भावविवशता कळली, पोचली, टोचली.
  • Log in or register to post comments

- भावविवशता कळली, पोचली,

कानडाऊ योगेशु
Sat, 04/30/2016 - 16:24 नवीन
- भावविवशता कळली, पोचली, टोचली.
+ १ हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/30/2016 - 16:15 नवीन
आशय मला प्रामाणिक वाटला. - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मज्जा आली

नाखु
Sat, 04/30/2016 - 16:19 नवीन
आणि योग्य अनुक्रमे आल्याने पोहोचली. dive aagar अदभूत अनर्थशास्त्र अभंग अविश्वसनीय आरोग्यदायी पाककृती काणकोण काहीच्या काही कविता कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड जिलबी नागद्वार प्रेम कविता फ्री स्टाइल भूछत्री रोमांचकारी. शृंगार करुण पुढील भागाच्या प्रतिक्षेतल्या परिक्षेत....
  • Log in or register to post comments

पैजारबुवा रॉक्स!

वैभव जाधव
Sat, 04/30/2016 - 16:20 नवीन
पैजारबुवा रॉक्स!
  • Log in or register to post comments

ठ्ठो!

चांदणे संदीप
Sat, 04/30/2016 - 16:26 नवीन
फुटलो! =)) =)) लैच! Sandy
  • Log in or register to post comments

याचीच वाट पाहत होतो. :-))

एस
Sat, 04/30/2016 - 16:53 नवीन
याचीच वाट पाहत होतो. :-))
  • Log in or register to post comments

दंडवत घ्या!

DEADPOOL
Sat, 04/30/2016 - 17:56 नवीन
दंडवत घ्या!
  • Log in or register to post comments

पैजारबुवा

बाबा योगीराज
Sat, 04/30/2016 - 18:07 नवीन
तुमच्या लेखनास आमचा (सदा) एकच प्रतिसाद, _____/\____
  • Log in or register to post comments

ख्याक

टवाळ कार्टा
Sat, 04/30/2016 - 18:36 नवीन
ख्याक
  • Log in or register to post comments

धन्य धन्य माऊली...

विजय पुरोहित
Sat, 04/30/2016 - 19:43 नवीन
धन्य धन्य माऊली...
  • Log in or register to post comments

पैजारबुवा

मितभाषी
Sat, 04/30/2016 - 20:09 नवीन
भारी.
  • Log in or register to post comments

मनातील कविता...फारफार आवडली..

खटपट्या
Sat, 04/30/2016 - 22:15 नवीन
मनातील कविता...फारफार आवडली..
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

रेवती
Sun, 05/01/2016 - 08:49 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

खादाडमाऊ झोपेशु हे नाव कै

रातराणी
Sun, 05/01/2016 - 10:09 नवीन
खादाडमाऊ झोपेशु हे नाव कै च्या कै म्हणजे लईच ब्येक्कार आवडल्या गेल्या आहे. कवितेबद्दल काय बोलणार! नेहमीप्रमाणे १ नंबर!!
  • Log in or register to post comments

आवडल..

जेपी
Sun, 05/01/2016 - 10:11 नवीन
आवडल..
  • Log in or register to post comments

हीहीहीहीहीहीहीही.

अभ्या..
Sun, 05/01/2016 - 19:19 नवीन
हीहीहीहीहीहीहीही. माउलीनी घडवलाच सत्संग. दंडवत हो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा