Skip to main content

आस

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 10/05/2016 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
बांधावरचा पिंपळ सांगे सोनसावळी दुःखे ओली फांदी-फांदी जीर्ण पर्णिका बांडगुळांची गर्दी सगळी अस्ताईचे सूर अनोळखी शुष्क पान्हा हळवी देवकी कशी रुचावी जगण्यालाही अस्थाईविन बंदिश पोरकी सुकली पाने सुकली माती खिन्न विरहिणी होय पालवी पाणी सुकले बुंध्यापाशी त्राही त्राही अंकुर डोकावी कधी अकस्मित ओल मुळांना कधी मेघांचे हळवे चुंबन लागे जलदांना ओढ भूमीची कधी अचानक अधीरे मिलन नश्वर स्वप्ने, नश्वर दुःखे नश्वरतेचा शाप सुखाला शाश्वत ऐसे इथे न काही श्वासांचा का ध्यास जीवाला ? सोनसावळा पिंपळ वेडा शुष्क डहाळ्या तरीही जपतो आस लाजऱ्या मृगथेंबाची मनी बाळगून जगत राहतो विशाल १०-०५-२०१६
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4140
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

अजुन एक सुंदर रचना.. विशालभौ.. जियो...
नश्वर स्वप्ने, नश्वर दुःखे नश्वरतेचा शाप सुखाला शाश्वत ऐसे इथे न काही श्वासांचा का ध्यास जीवाला ?
हे खासचं....

In reply to by गणेशा

अहाहा, सार्थक झालं. आज ग्रेससरांच्या जयंतीदिवशी कवितेला हि दाद मिळणं यासारखं दुसरं सुख नाही. धन्यवाद.

मस्त कविता. आवडली. आस लाजऱ्या मृगथेंबाची मनी बाळगून जगत राहतो आपल्या सर्वांचे असेच आहे.

विलक्षण चित्रदर्शी कविता.... आवडली अतिशय आवडली पैजारबुवा,

रूपक कविता म्हणून लिहिलीय का विशालभौ?

कवीराजांनी म्हटलय आम्ही काय आणखी म्हणणार रे !!! पिंपळा खालचा मुंजा नाखु

_/\_

सोनसावळा पिंपळ वेडा शुष्क डहाळ्या तरीही जपतो आस लाजऱ्या मृगथेंबाची मनी बाळगून जगत राहतो वाह! काय म्हणावे.... आजकाल चुकून बायको लाजली कि मृगथेंबाची आस मनी जागतेच....