Skip to main content

बसते बिचारी एकटी आजी -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 01/03/2016 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
बसते बिचारी एकटी आजी देवापुढती वाती वळत असते मुखात नामस्मरण कधी तिचे ना कंटाळत.. गत आयुष्याचा पाढा असते स्वत:शीच उगाळत गालावर एखादा अश्रू नकळत येई ओघळत.. सोसले जे आयुष्यभरात जाईे डोळ्यासमोर तरळत वेग वाती वळण्याचाही जाई वाढत तसाच नकळत.. सखा जीवनातुन का गेला सोडून अर्ध्यावरुनी पळत आसवात का भिजती वाती जिणे रोजचे राहीे छळत.. .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5752
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

मुक्त विहारि, नील मोहर, एक एकटा एकटाच, भरत_पलुसकर ... प्रतिसादासाठी धन्यवाद !

सुदैवाने माझ्या आज्यांवर ही वेळ आली नाही पण एखादा एकाकी वृद्ध माणूस पाहिला की उदास वाटतं.

आमच्या समोरचे आजोबा परवाच गेले. खूप मनमिळावू, चांगले होते स्वभावाने. आजीही तशाच. दोघे कधीही कुठे जायचे असेल तर सोबतच जायचे. नेमके परवा कधी नव्हे ते आजोबा एकटेच कुठल्या तरी गावाला वर्षश्राद्धानिमित्त गेले, तिकडेच हार्टअ‍टॅक येउन गेले. घरच्यांना कुणालाही भेटायला चान्स मिळाला नाही. त्या आजींची अवस्था शब्दांपलिकडली आहे. :(

In reply to by तर्राट जोकर

अस काही वाचल.. पाहिल की खुप वाईट वाटते .. ---- कविता पुन्हा वाचली आणि ह्या ओळी आता हेलावून गेल्या सखा जीवनातुन का गेला सोडून अर्ध्यावरुनी पळत आसवात का भिजती वाती जिणे रोजचे राहीे छळत.. .

सोसले जे आयुष्यभरात जाईे डोळ्यासमोर तरळत वेग वाती वळण्याचाही जाई वाढत तसाच नकळत..
एक नंबर..

गणेशा, तर्राट जोकर , निशांत_खाडे , आत्मबंध , जव्हेरगंज , सुरन्गी - सर्वांचे मनापासून आभार !

सुदैवाने आज्ज्यांवर ही वेळ आली नाही पण दोन्ही आजोबा नंतर एकटेपणात हरवून गेले. ही कविता वाचून चौघेही डोळ्यासमोर आले. कविता आवडली. एकदम मनात सय दाटून आली.