तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस
मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना
अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते
ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला
दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून ,
अर्धातास, निमुट उभा रहात,
आमच्या गप्पा ऐकणार्या
तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते
“आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले
दमुन झोपले आहेत बिचारे.
नाही तर आम्ही दोघेच येतो भाजी घ्यायला ”
त्या वेळी मी पण तिला ठसक्यात सांगते
“हा पण काल रात्री दोन वाजता घरी आला आहे”
त्यावेळी तिच्या कडे बघून न बघितल्यासारखे
करणारा तू मला फार म्हणजे फार आवडतोस
शहारुख खान चा सिनेमा
तुझ्या सोबत बघताना
अचानक आपले बाळ
बेंबीच्या देठापासून
जोरात ओरडत रडायला लागते
(तुझ्यावरच गेला आहे तो,
सगळे तुझेच गुण तो आतापासुनच उधळतो आहे)
मला सिनेमा अर्धवट टाकून उठायचा
प्रचंड वैताग आलेला असतो
आणि आजूबाजू चे लोकही
शुक शुक करायला लागलेले असतात
त्या वेळी तू तुझ्या चेहर्यावर दिसणारी
नाराजी लपवत
बाळाला घेउन बाहेर जातोस,
त्याला शांत करतोस,
आणि बाळ झोपल्यावर
आत येताना
न विसरता
माझ्यासाठी पॉपकॉर्न आणि कोक घेउन येतोस
तेव्हा तू मला फार म्हणजे फार आवडतोस
पोळ्या करणारी बाई दोन दिवस आलेली नसते
सासु बाई सुध्दा गावाला गेलेल्या असतात
आता संध्याकाळी जेवायला काय करायचे?
असा प्रश्र्ण् माझ्या पुढे असतो,
कारण कालच खिचडी करुन झालेली असते
आणि त्या नंतर तुला रात्री गुपचुप उठुन ,
किचन मधे डबे शोधताना
मीच पकडलेले असते
अशा वेळी माझा एकंदर रागरंग बघून
तू हॉटेल मधे जाउ म्हणतोस
मी उगाचच “नको रे फार खर्च होतो असे म्हणते”
तेव्हा तू “अग खर्चाचे जाउ दे ग,
एखाद दिवस गेलो हॉटेल मधे
म्हणुन काही फरक पडत नाही”
असे म्हणत गाडी काढतोस
"बघ हं अजून विचार कर
या महिन्यात सहाव्यांदा चाललो आहोत आपण होटेल मध्ये "
असे लटकेच म्हणत मी गाडी तून उतरते
"जाउदे ग असला विचार करता जाऊ नकोस,
एनजॉय् द् एव्हिनिंग "
असे तू म्हणतोस
तेव्हा तू मला फार म्हणजे,
फार म्हणजे फार,
म्हणजे अतिशयच्,
म्हणजे अपरीमित,
म्हणजे अशक्य इतका,
म्हणजे खुपच जास्त,
म्हणजे नको तेवढा,
म्हणजे लैच म्हणजे लैच् आवडतोस.
खादाडमाऊ झोपेशु
क्रमशः (मागच्या जन्माची गोष्ट पुढच्या भागात)
=))
=))
आईशप्पत
.
मजेशीर आहे. धन्यवाद.
हाँटेलिंग पिच्चर गंमत
उत्कट प्रेमविव्हळ कविता..
- भावविवशता कळली, पोचली,
:)
मज्जा आली
पैजारबुवा रॉक्स!
ठ्ठो!
याचीच वाट पाहत होतो. :-))
दंडवत घ्या!
पैजारबुवा
ख्याक
धन्य धन्य माऊली...
पैजारबुवा
मनातील कविता...फारफार आवडली..
कविता आवडली.
खादाडमाऊ झोपेशु हे नाव कै
आवडल..
हीहीहीहीहीहीहीही.