✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आस

व — विशाल कुलकर्णी, Tue, 05/10/2016 - 10:38
बांधावरचा पिंपळ सांगे सोनसावळी दुःखे ओली फांदी-फांदी जीर्ण पर्णिका बांडगुळांची गर्दी सगळी अस्ताईचे सूर अनोळखी शुष्क पान्हा हळवी देवकी कशी रुचावी जगण्यालाही अस्थाईविन बंदिश पोरकी सुकली पाने सुकली माती खिन्न विरहिणी होय पालवी पाणी सुकले बुंध्यापाशी त्राही त्राही अंकुर डोकावी कधी अकस्मित ओल मुळांना कधी मेघांचे हळवे चुंबन लागे जलदांना ओढ भूमीची कधी अचानक अधीरे मिलन नश्वर स्वप्ने, नश्वर दुःखे नश्वरतेचा शाप सुखाला शाश्वत ऐसे इथे न काही श्वासांचा का ध्यास जीवाला ? सोनसावळा पिंपळ वेडा शुष्क डहाळ्या तरीही जपतो आस लाजऱ्या मृगथेंबाची मनी बाळगून जगत राहतो विशाल १०-०५-२०१६

प्रतिक्रिया द्या
4112 वाचन

💬 प्रतिसाद (17)

अजुन एक

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/10/2016 - 11:06 नवीन
अजुन एक सुंदर रचना.. विशालभौ.. जियो...
नश्वर स्वप्ने, नश्वर दुःखे नश्वरतेचा शाप सुखाला शाश्वत ऐसे इथे न काही श्वासांचा का ध्यास जीवाला ?
हे खासचं....
  • Log in or register to post comments

कविता मस्त ..

गणेशा
Tue, 05/10/2016 - 11:14 नवीन
कविता मस्त .. ग्रेस आठवले एकदम
  • Log in or register to post comments

अहाहा, सार्थक झालं. आज

विशाल कुलकर्णी
Tue, 05/10/2016 - 11:27 नवीन
अहाहा, सार्थक झालं. आज ग्रेससरांच्या जयंतीदिवशी कवितेला हि दाद मिळणं यासारखं दुसरं सुख नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

मस्त कविता. आवडली.

विवेकपटाईत
Tue, 05/10/2016 - 11:19 नवीन
मस्त कविता. आवडली. आस लाजऱ्या मृगथेंबाची मनी बाळगून जगत राहतो आपल्या सर्वांचे असेच आहे.
  • Log in or register to post comments

वाह . क्या बात है. आवडली

प्रीत-मोहर
Tue, 05/10/2016 - 11:45 नवीन
वाह . क्या बात है. आवडली कविता विशालदा
  • Log in or register to post comments

अप्रतिम....

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 05/10/2016 - 12:27 नवीन
विलक्षण चित्रदर्शी कविता.... आवडली अतिशय आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

धन्यवाद देवानू !

विशाल कुलकर्णी
Wed, 05/11/2016 - 15:33 नवीन
धन्यवाद देवानू ! इतरांचेही मनःपूर्वक आभार _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

कविता मस्तच!

बोका-ए-आझम
Tue, 05/10/2016 - 12:31 नवीन
रूपक कविता म्हणून लिहिलीय का विशालभौ?
  • Log in or register to post comments

रुपकच आहे बोकाभाऊ, ज्याला जे

विशाल कुलकर्णी
Tue, 05/10/2016 - 12:59 नवीन
रुपकच आहे बोकाभाऊ, ज्याला जे दिसेल तो अर्थ. धन्यवाद मंडळी _/!\_
  • Log in or register to post comments

वाह विशाल दा

एक एकटा एकटाच
Tue, 05/10/2016 - 17:46 नवीन
वाह विशाल दा
  • Log in or register to post comments

मस्त

नाखु
Wed, 05/11/2016 - 11:32 नवीन
कवीराजांनी म्हटलय आम्ही काय आणखी म्हणणार रे !!! पिंपळा खालचा मुंजा नाखु
  • Log in or register to post comments

एक नंबर रे!!! तुमच्या रचना

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 05/11/2016 - 16:36 नवीन
एक नंबर रे!!! तुमच्या रचना सूदिंग असतात विकु! तलम एकदम! जियो पठ्ठे!
  • Log in or register to post comments

विकु दा -.. अस्थाईविन बंदिश पोरकी .. जब्बर्दस्त

निनाव
Fri, 09/16/2016 - 23:13 नवीन
विकु दा -.. अस्थाईविन बंदिश पोरकी .. जब्बर्दस्त
  • Log in or register to post comments

_/\_

रातराणी
Fri, 09/16/2016 - 23:18 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

सुंदर. आवडेश! :)

राघव
Sun, 09/18/2016 - 00:53 नवीन
सुंदर. आवडेश! :)
  • Log in or register to post comments

सोनसावळा पिंपळ वेडा

विवेकपटाईत
Sun, 09/18/2016 - 09:30 नवीन
सोनसावळा पिंपळ वेडा शुष्क डहाळ्या तरीही जपतो आस लाजऱ्या मृगथेंबाची मनी बाळगून जगत राहतो वाह! काय म्हणावे.... आजकाल चुकून बायको लाजली कि मृगथेंबाची आस मनी जागतेच....
  • Log in or register to post comments

अप्रतिम कविता!

पैसा
Sun, 09/18/2016 - 10:06 नवीन
अप्रतिम कविता! हल्ली कुठे गायब आहेस रे विशल्या?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा