काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी!!

लेखनप्रकार
पुर्वी मला वाटायचे की कसली प्रायव्हसी? काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी! माझ्या सर्च त्या काय असणार आणि त्यातून कुणाला काय फायदा असणार? पण एकदा सहज आपला गुगल इतिहास पाहिला आणि हादरलोच! माझ्या काय वाटेल त्या सर्चेस तेथे तरिखवार जपून ठेवलेल्या होत्या. अगदी एयरक्रॅश इन्वेस्टिगेशन ते नर्मदा परिक्रमा. तरी विचार केला की मग काय बिघडले? बिघडले हे की मी काय आणि कसा विचार करतो यावरून या कंपन्या माझे प्रोफाईल तयार करतात. मग मला जे 'आवडेल' तेच मला जालावर पुरवतात.

तुती, कैर्‍या आणि संत्री

लेखनविषय:
लेखनप्रकार
परवा अचानकच फळांच्या दुकानात दोन तुतीचे बॉक्स दिसले आणि मी एकदमच खुष झालो. मध्यंतरी महाबळेश्वरला खाल्ल्या होत्या, पण एकुणच नाजूक फळ आणि त्यामानाने नॉन-ग्लॅमरस, त्यामुळे स्ट्राबेरीसारखे सहजपणे मिळत नाही. त्या तुती अचानकच मिळाल्याने हरखूनच गेलो आणि उड्या मारतच लहानपणीच्या तुतीच्या झाडांवर पोहोचलो. ९-१० वर्षांचा होतो तेंव्हाची गोष्ट आहे…आम्ही रहायचो आणि त्यानंतर २-३ घरे सोडून उपाध्यांचा बंगला होता…मला वाटते ते तेंव्हा गाणे आणि violin शिकवायचे.

माहिती हवी आहे.......इंदूर ( म प) येथील मिपाकराची ..

लेखनविषय:
लेखनप्रकार
इंदूर मध्यप्रदेश येथील काही माहिती हवी आहे. विशेषत: जागा भाड्याने घेण्यासंबंधी... कोणी मिपाकर इंदुरात स्थायिक असल्यास मला कृपया त्वरित व्यनि करावा ही नम्र विनंति.

माझी बायपोलर डिसॉर्डर

लेखनप्रकार
मी डॉक्टर नाही, हे एक प्रांजळ आत्मकथन आहे केवळ या २ हेतूनी केलेल (१) की जर कोणी अशी लक्षणे अनुभवत असेल तर त्यांना मदत व्हावी (२) माझ्या समाधानाकरता की माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली या धाग्यावर अवांतर न केल्यास उपकार होतील ____________________________________________
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."
आजवरच्या आयुष्यात मी ऐकलेले सर्वात प्रभावी अन निर्वाणीचे वाक्य/संवाद.

पुणे रनिंग

पुणे रनिंग धावण्याचं एवढं वेड लागु शकतं हे मला पुणे रनिंगशी संबंध येईपर्यंत कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पुणे रनिंग (https://www.facebook.com/PuneRunning) हा एक धावण्याची आवड असलेल्या पुण्यातील लोकांचा ग्रुप आहे. धावपटू घडवून भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देणे वगैरे मोठी स्वप्न नाहीत, घटना नाही, पदाधिकारी नाहित, राजकीय पाठींबा नाही पण सामान्य लोकांना धावण्यासारखी आरोग्यदायी सवय लावणे हा साधा स्वच्छ हेतु. एकट्याने खूप वेळ धावणे बहुदा कंटाळवाणे होते म्हणून ग्रुपमधे धावले जाते. या एका पॅशनसाठी पुण्याच्या कानाकोपर्‍यात लोकं धावतात, नवीन लोकांना धावायला उद्युक्त करतात, मॅरॅथॉन इव्हेंट भरवतात.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल! ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!

विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग २

लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग २ ... ...पुर्वीच्या लोकांना टिवल्याबावल्या करत बसायला वेळ पण होता. बिनविजेच्या मिणमिणत्या अंधाऱ्या रात्रीत, जंगलातील श्वापदांच्या भयंकर संगतीत, पाण्यासाठी वणवण भटकत फिरणाऱ्या, आक्रमणांच्या लढायांना तोंड देत देत जीवन रहाटणी करणाऱ्या जुन्या काळी, त्या लोकांना त्यांच्या दुःखी जीवनाची रहाटणी ध्यानाला प्रेरक असावी. आता फारसा कोणी या वाटेला जायला धजणार नाही व बुद्ध बनायला जाता जाता बुद्धु बनायला तयार होणार नाही. ... ...सध्याच्या या धावत्या जगात कोणाला आहे इतका वेळ द्यायला व कोणाला हवी आहे मानसिक, अध्यात्मिक प्रगती? आहे ते ठीक आहे.

लोकायत आणि चार्वाक

लेखनप्रकार
लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे की ज्यात वेद, परलोक व देव या तिघांनाही फेटाळून लावले आहे. चेतनावाद हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे. शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद.

जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन

लेखनप्रकार
एक रेषा असते जी जनुकांनी बद्ध असते. त्या किमान बंधनांपलीकडे तीने मला अमर्याद स्वातंत्र्य दिलेल असतं. पण या स्वातंत्र्यावरही बंधन येत असतात. काही मी माझी घालून घेतलेली असतात, काही काळ आणि परीस्थितीने येणारी असतात, काही कुटूंबातील, समाजातील, संस्कृतीतील, राज्य आणि धर्म संस्थेतील घटकांनी कधी कळत, कधी नकळत घातलेली असतात.
Subscribe to राहणी