लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे

खटासि खट's picture
खटासि खट in जनातलं, मनातलं
25 Feb 2015 - 1:52 pm

सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो

हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले.
तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ)

१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?
२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?
४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?)
५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?
६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ?
७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?)
९. इतर शंका हळू हळू

राहणीचौकशी

प्रतिक्रिया

खटासि खट's picture

25 Feb 2015 - 1:54 pm | खटासि खट

लिइरि मधे ही पाकीटातून पैसे कमी होतात का ?
हा अधिकार यातही मैलामंडळाकडेच राहतो काय ?

बॅटमॅन's picture

25 Feb 2015 - 3:26 pm | बॅटमॅन

मैलामंडळ>>>>>>>>>>>> अहो लिव्ह इन करायचे आहे की दुसरे काही =)) =)) =))

अनुभवशून्य असल्याने पास!! तीन तीन अनुभव असलेल्या यमगर्निकरांस विचारुन पाहावे, असे सुचवितो.

अनुभवशून्य असल्याने >> अरेरे ! सर्वांनीच असे हातपाय गाळून कसे चालेल ? मोदींनी आता लिव्ह इन इंडीया चे मनावर घ्यावे

आशु जोग's picture

26 Feb 2015 - 2:41 pm | आशु जोग

लिव्ह इन इंडीया मोदी

झकास

टवाळ कार्टा's picture

25 Feb 2015 - 2:08 pm | टवाळ कार्टा

आईच्चा घो.... १०० तर कुठेच नाहीत =))

अत्रन्गि पाउस's picture

25 Feb 2015 - 2:20 pm | अत्रन्गि पाउस

अहो वधूवरांचे 'लिव्ह इन' होणार का काय ???
*JOKINGLY*
:D
*lol*

_मनश्री_'s picture

25 Feb 2015 - 2:11 pm | _मनश्री_

........
.

स्वप्नांची राणी's picture

25 Feb 2015 - 2:25 pm | स्वप्नांची राणी

३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?

अशी काही अट-बीट नाही, पण शक्यतो अविवाहीत असावेत. त्याच काय आहे की, विवाहीत लोक रात्री आपापल्या घरी जातात. मग काय डोंबल लिइरि करणार..?

विवाहीत जोड्यांमधले दोघेही लिअरी शोधू लागले तर काय प्रोब्ळेम हो ? संध्याकाळी "आपापल्या" घरीच जातील की.. ;)

स्वप्नांची राणी's picture

25 Feb 2015 - 2:27 pm | स्वप्नांची राणी

५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?

तुम्ही फक्त लिईरी च जमवा हो, मानपान आणि मानापमान आपोआपच सुरु होतील.

विजुभाऊ's picture

25 Feb 2015 - 2:30 pm | विजुभाऊ

लिव इन रीलेशन या विषयावर उत्तम व्यासंग म्हणजे : सखाराम बाइंडर

स्वप्नांची राणी's picture

25 Feb 2015 - 2:30 pm | स्वप्नांची राणी

८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?)

अजिंक्य रहाणे.

वेल्लाभट's picture

25 Feb 2015 - 3:27 pm | वेल्लाभट

या प्रतिसादाला माझ्याकडून बक्षिस ! ! ! !!
जोरदार टाळ्या !

आदूबाळ's picture

25 Feb 2015 - 3:37 pm | आदूबाळ

जबरदस्त उत्तर! टाळ्यांचा कडकडाट!

निमिष ध.'s picture

25 Feb 2015 - 8:47 pm | निमिष ध.

रहाणेची आणि तुमची बॅटिंग जोरात चालू असू द्या. लवकरच तुम्हाला एक गंधर्वी प्राप्त होईल :clapping:

आशु जोग's picture

26 Feb 2015 - 2:43 pm | आशु जोग

अजिंक्य रहाणे अति झकास... या प्रतिसादाला जादूची झप्पी

आगाऊ म्हादया......'s picture

4 Aug 2015 - 1:58 pm | आगाऊ म्हादया......

खी व्खी खी

हाडक्या's picture

25 Feb 2015 - 4:21 pm | हाडक्या

अगाग्गा.. :)))

स्वरा, दिवसेंदिवस तुमची "बॅटिंग" सुधारत चालली आहे असे नमूद कर्तो हा.. ;)
(बादवे, its good!)

स्वप्नांची राणी's picture

25 Feb 2015 - 5:18 pm | स्वप्नांची राणी

*blush* :-[ :[ ;'> ;-. :blush:

अत्रुप्त आत्मा's picture

25 Feb 2015 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा

अजिंक्य रहाणे. =))))) वारलो रे...वारलो! =)))))
कोण नक्की अ जिंक्य रहाणार म्हणे यात! =))

बॅटमॅन's picture

25 Feb 2015 - 4:52 pm | बॅटमॅन

क्या बात!!!!!!!!!

तुमची ब्याटिंग खरेच मस्ताड होऊ लागलीये. वेल्कम टु दि क्लब!

पिशी अबोली's picture

26 Feb 2015 - 12:13 pm | पिशी अबोली

=))

सविता००१'s picture

26 Feb 2015 - 4:23 pm | सविता००१

:))
:))
:))

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लिइरिचं एखादं पुण्यफळ येऊ घातलं तर ते दोघांपैकी कोणाच्या पदरात/सदर्‍यात टाकायचं?

दोन पुण्यफळं होऊ द्यावी.एक पदरासाठी एक सदर्यासाठी.स्रीपुरुष समानता,यु नो!

एवढा उपद्व्याप? नको ते लिइरि..!!

७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
हे पत्नीस / पतीस कल्पना द्यावी काय ? असे असायला हवे होते नै ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

टवाळ कार्टा's picture

25 Feb 2015 - 2:42 pm | टवाळ कार्टा

"आपल्याच" हा शब्द सुध्धा राहीला की :)

"आपल्याच"

नोत नेचेस्सर्य!!

खटासि खट's picture

25 Feb 2015 - 11:04 pm | खटासि खट

अहो,
मी माझ्याबद्दल लिहीत असल्याने पत्नीस कल्पना असे म्हटले.
आता मला काय माहीत की .....what is most personal is also universal

तिमा's picture

25 Feb 2015 - 2:38 pm | तिमा

ते लिइरी वाचायला कसंतरीच वाटतंय! चुकून 'लिंगरी' असंही वाचलं जाण्याची शक्यता आहे.
बाकी चालू द्या.

एस's picture

25 Feb 2015 - 3:21 pm | एस

सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो

आम्ही दोन्हींमध्ये मोडत नसल्याने (म्हणजे गृहस्थ जरी असलो तरी सभ्यतेचे वावडे असल्याने, उगाच भंकसपणा केलेला चालणार नाही) आमच्याकडे चवकशी करू नये. तरीही केल्यास दर प्रश्नाच्या उत्तरामागे स्ट्याण्डर्ड दर आकारला जाईल. (दरपत्रकाची चवकशी करण्याआधीही पैसे द्यावे लागतील. तेवढेही फुक्कट मिळणार नाही.)

(अवांतर - चला, यानिमित्ताने भंकस सभ्यपणापेक्षा सभ्य भंकसपणा कसा चांगला यावर नवीन काथ्या कुटता येईल एखाद्या कट्ट्याला!)

वेल्लाभट's picture

25 Feb 2015 - 3:22 pm | वेल्लाभट

या प्रतिसादाला माझ्याकडून बक्षिस ! ! ! !!
जोरदार टाळ्या !

अन्या दातार's picture

25 Feb 2015 - 3:35 pm | अन्या दातार

किती बक्षिसे ठेवलीत?? बक्षिसाची रक्कमसुद्धा सांगितलीत तर बरे.

अरे खुळां की कांय तूं अन्या? बक्षिस कसलें, एखादें सर्किट ट्रेनिंग लिहून देतील तें. कांय समजलांस !! ;)

वेल्लाभट's picture

25 Feb 2015 - 3:59 pm | वेल्लाभट

ळोळ !

सस्नेह's picture

25 Feb 2015 - 4:06 pm | सस्नेह

एका वाक्यात नऊ अनुस्वार वापरल्याबद्दल आपल्याला एक अनुस्वार बक्षिस देण्यात येत आहे ;)

एका वाक्यात नऊ अनुस्वार

एका चार ओळींच्या प्रतिसादात १२ मी, ३ मला, २ माझे/माझ्या आणि एक आम्ही वापरण्यापेक्षा ९ अनुस्वार म्हणजे सस्त्यात भागलं हो!! शिवाय विशिष्ट बोलीची छाप पडण्याच्या दृष्टीने केलं होतं ते, त्यामुळे आपला एक अनुस्वार स्वीकारुन येथें लावीत आहोत. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Feb 2015 - 5:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुंर्णंविंरांमं कांयं किंवां एंकुंणं संर्वं विंरांमंचिंन्हांवंरंहीं अंनुंस्वांरं उंमंटंवांयंचीं सोंयं व्हांयंलां हंवीं. (आता मो(जी)जा)

सस्नेह's picture

25 Feb 2015 - 5:14 pm | सस्नेह

आता मो(जी)जा)

+))
नाय हो, येवड गणित पक्कं नाय माझं !

२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?

टिंडरसारख्या सैटींवर नाव नोंदवावे लागते असे ऐकून आहे. पण तिथेही वाचनमात्र राहून चालत नै बर्का.

पैसा's picture

25 Feb 2015 - 4:17 pm | पैसा

४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?)
५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?
६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ?

मग लग्नच करावे की!

७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?

न दिल्यास रात्री कुठे होतात याची रोज नवी उत्तरे देण्याइतकी प्रतिभा असणे आवश्यक आहे.

३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?

अटीचं कै म्हैत नै, पण त्यातल्या महिलेचा नव्रा सन्नी देवल टैप असल्यास जिवावर बेतू शकेल.

१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे किमान एक महिला/पुरुष साथीदार मिळवणे आवश्यक असावे. एकट्याने लिव्ह इन रिलेशन ठेवल्याचे कधी ऐकले नाय ब्वा.

त्रिवेणी's picture

25 Feb 2015 - 8:38 pm | त्रिवेणी

तायडे प्रतिभा नाव वाचुन डोळे पाणावले.

खटासि खट's picture

25 Feb 2015 - 11:12 pm | खटासि खट

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे किमान एक महिला/पुरुष साथीदार मिळवणे आवश्यक असावे. एकट्याने लिव्ह इन रिलेशन ठेवल्याचे कधी ऐकले नाय ब्वा. >>>>> लोळलो.

पण तायबाय एक सांगा की, हा / ही साथीदार मिळवण्यासाठी पहायचा कार्यक्रम करायचा की रस्त्याने जाणा-या येणा-याला ते खाजगी बसच्या बाहेर दबक्या आवाजात कोल्हापूर कोल्हापूर म्हणतात तसं ए लिव्ह इन, लिव्ह इन असे भजावे की ,
रीतसर पाहण्याचा कार्यक्रम ठेवून कांदेपोहे हापसत पसंती नापसती कळवतो नंतर असे म्हणावे ?

आदूबाळ's picture

25 Feb 2015 - 11:13 pm | आदूबाळ

"ए लिवीन येती / येतो का?" असे आपापल्या वकुबाप्रमाणे म्हणावे.

समोरासमोर विचारणे फार धोक्याचे हो!

http://mumbai.quikr.com/I-want-to-relationship-with-girl-W0QQAdIdZ202302639

quikr.com/ किंवा olx.in/ या भंगार विकणार्‍या सायटींवर झैरात दिल्यावर कायतरी मिळत असावे बहुधा.

मिपाच्याच भाषेत बोलायचे झाले तर.....लिविन्शिप कर्न्र/देन्र कं?

अत्रुप्त आत्मा's picture

25 Feb 2015 - 4:26 pm | अत्रुप्त आत्मा

अहो...अहो.... लो क हो!

.....................थांबा!!! :stop:

आम्ही अत्ताच एक नविन कर्म कांडं प्रसविले आहे.

परस्पारिक स्वेच्छा सहजीवन विधी

नावाचे!!!!

आमच्या कडून सदर विधी करवून घेऊन(च) या नात्याची सुरवात करा. म्हणजे(सहजीवनाला..) भरपूर यश हाती लागेल...

बुकिंग सुरु
*MAIL*
भेटा:- आत्मूभट (लि.इ.रि.(धर्मविधी)..स्पेशालिश्टं.. ;) )
म्यारेजकोर्टाच्या बाजूला...ग्यारेज चाळीत..तिसरा मजला...तुटक्या विटेची चवथी खोली!

टवाळ कार्टा's picture

25 Feb 2015 - 5:25 pm | टवाळ कार्टा

अर्रे हो...लिवीन मुळे धंदा व्यवसाय बसेल नै बर्याच जणांचा
रच्याकने लिवीन सुरु करायच्या आधी पत्रिका जुळवावी कै?

अत्रन्गि पाउस's picture

25 Feb 2015 - 8:23 pm | अत्रन्गि पाउस

हसून फुटलो आहे
*lol*

सांजसंध्या's picture

4 Mar 2015 - 7:26 am | सांजसंध्या

परस्पारिक स्वेच्छा सहजीवन विधी >>> :D

कुणाचं काय, तर कुणाचं काय

सूड's picture

4 Mar 2015 - 2:15 pm | सूड

हो नं!!

लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? >>> गांधर्वनाते...
तसे, 'गर्दभनाते' हेही चालू शकेल +D

अत्रुप्त आत्मा's picture

25 Feb 2015 - 4:46 pm | अत्रुप्त आत्मा

@गर्दभनाते'>>> =)))))

खटपट्या's picture

26 Feb 2015 - 2:23 am | खटपट्या

आमच्या भाषेत "लफडे" म्हनतेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Feb 2015 - 5:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहकारीसहजीवन (सहकार म्हणलं की घोटाळा आलाचं) ;)

खटासि खट's picture

25 Feb 2015 - 11:13 pm | खटासि खट

नाव नका काढू त्या सहकाराचं, राजू शेट्टीच आठवतात डायरेक्ट ! इथं पण घुस्ले म्हणजे ?

मराठीत माहेत नाही पण
अकाऊंट भाषेत "हायर परचेस" म्हणू शकता.

आवश्यक व आवाक्यातील वाटल्यासच शेवटचा हप्ता भरलावर वस्तू मालकी हक्क प्राप्त होतो

"हायर" हे फायरलायर ला फक्त इथेच समानार्थी आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2015 - 7:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

लिईरि म्हणे लिईरि, ह्याँ...

शालिवाहन काळात भटकत भारतात नशीब काढायला आलेल्या एका युरोपियनाने एक पुरातन संस्कृत ग्रंथ चोरून नेला. त्यात दहा प्रकारचे विवाहविधी लिहीलेले होते... वैदीक, राक्षस, गांधर्व, इ इ इ. त्यातला गांधर्वविवाह त्याला फारच आवडला आणि त्याने युरोपमध्ये एक भूमीगत "गांधर्वसर्कल" स्थापन केले. ते उघडकीस आल्यावर तो जीव वाचविण्यासाठी कोलंबसच्या जहाजाच्या वाणसामान ठेवण्याच्या खोलीत लपून अमेरिकेला गेला आणि तेथे त्याने सिसिली माफियाच्या सहकार्याने "जागतिक (अमेरिकेत पहिल्यापासून जे काय असतं ते सगळं जागतीकच असतं) अंडरग्राऊंड गांधर्वसर्कल" स्थापन केले. ते कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणुन त्याने आपल्या संघटनेचे नांव तिथल्या कॅलिफोर्नियामधिल मूल अमेरिकन (रेड इंडियन) भाषेत भांषांतरीत करून ते सांकेतीक नाव म्हणून वापरायला सुरुवात केली, ते असे होते: जागतिक = लिव, अंडरग्राऊंड = इन, गांधर्वसर्कल = रिलेशन; म्हणुन त्या जीवन पद्धतीला "लिव इन रिलेशन" उर्फ "लिईरि" असे नाव पडले. ही चलाखी सुरुवातीला कोणाच्याच ध्यानात आली नाही आणि जेव्हा ते उघड झाले तेव्हा ते लोकांना इतके आवडले की त्याला विरोध करण्याऐवजी त्यांनी लिईरि ला कायदेशीर गोष्ट करून टाकली (कॅलिफोर्नियामध्ये असे खूपदा होते).

तोच प्राचीन भारतिय गांधर्वविवाह आता पाश्चिमात्य देशांतून परत भारतात (योग चा योगा होऊन आला तंस्सांच्चं अग्दी) आल्यावर ही नविन शिंगे आलेली नविन पिढी त्याला डोक्यावर घेऊन त्याचे आचरण करायला लागली आहे... आणि आचरण न जमणारे आचरट धागे टाकून दुधाची तहान ताकावर भागवताहेत :) ;)

सुबोध खरे's picture

25 Feb 2015 - 7:45 pm | सुबोध खरे

एक्का साहेब धंद्यात भागीदारी घेणार काय ?
जसे लग्नपूर्वक चाचणी आणि समुपदेशन (premarital counselling) असते तसे सहजीवन पूर्व(pre LIR counselling) समुपदेशनचे दवाखाने काढू या. पुण्यात तुम्ही आणि मुंबईत आम्ही.( आमची कोठेही शाखा नाही हा प्रतिवाद नको).
प्याकेजेस पण देता येतील. गरोदरपण असेल तर वेगळे. आजार झाले तर वेगळे प्याकेज. ब्रेक अप झाल्यास मानसिक समुपदेशनाचे वेगळे.
त्यातून गर्भपाताचे पैसे वायले इ इ.
वर जमले तर SME चे फायदे घेत येतील का ते हि पाहू.

टवाळ कार्टा's picture

25 Feb 2015 - 8:28 pm | टवाळ कार्टा

_/|\_
मला मार्केटिंग साठी घेणार का? :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 10:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या साठी जुनी नोकरी बदलायची आवश्यकता नाही. असलेल्या नोकरीमधली २-४ प्रकर्णे हाताळता येतील. माउथ टु माउथ (द्वयार्थ नं काढणे) प्रसिद्धीमुळे धंदा आपोआप वाढेल. त्यामुळे मार्केटींग जॉब पहाण्यापेक्षा एखादी फ्रांचायझी घेउन टाक की. हाकानाका..

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2015 - 8:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

आमचे एक जुने सहाध्यायी म्हणायचे तसे, "प्रयोग करून पाहण्यासारखा आहे" :)

पुण्यात तुम्ही आणि मुंबईत आम्ही.( आमची कोठेही शाखा नाही हा प्रतिवाद नको).

छे,छे. व्यवसाय सुरू केलाच तर "आमची इतर कोठेही शाखा नाही." अशी कूपमंडूक प्रवृत्ती आजाबात दाखवायची नाय. केवळ पुण्यामुंबैत केवळ इनमिन दोन शाखा ?? ह्या, ह्या, ह्या... हे आमच्या स्ट्रॅटेजिक थिंकींग विरुद्ध आहे. अहो सर्व भारतातच नाही तर आलम दुनियेत फ्रँचायजी सिस्टिमचे जाळे उभारू. पॅकेजेसची त्सुनामी तयार करू, एकावर दोन फ्री देऊ (फक्त पहिल्याची किंमत चारपाच पट ठेवली म्हणजे झालं ;) ). आख्ख्या होल दुनियेत टीव्ही-बिव्हीवरून जाहिरांतीचा भडीमार करू, सेमिनार घेऊ, आपण तयार केलेल्या तज्ञांची फौज जगावर सोडू, जगाला पळता भूई थोडी करून सोडू. लिईरि मध्ये न राहणार्‍या एकदम भारी न्युनगंड आला पायजेल... मग ते आपल्या समुपदेशन-शिक्षण-उपचार यापासून दूर पळूच शकणार नाहीत ! :) . आख्खी होल बिलियन डॉलर विंटरन्याशनल विंडष्ट्री हाय सायेब !

आमची प्राचीन आयड्या चोरतात काय ? दाखवूच त्या गोर्‍यांना विंढेन हिस्का, ढिष्कॅंवsss !!! =))

(गुप्त बातमी : सांगू नका कोणाला. बोहोनीसाठी कन्फूsssस झालेले पहिले चार पाच बकरे या धाग्यावरच हेरून ठेवले आहेत ;) )

सूड's picture

25 Feb 2015 - 9:22 pm | सूड

नो चीटींग, कितलें फावट चेंज करतां!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2015 - 9:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हंजे काय ?

किती वेळा बदलताय तो प्रतिसाद? नवीन म्हणून उघडून पाह्यलं तर, जुन्याच प्रतिसादावर नवीनचा टॅग दिसला. आयदर काहीतरी चेंज झालंय किंवा मिपा गंडलंय. जुन्या मिपावर प्रतिसाद बदलता येऊ नये म्हणून उपप्रतिसाद देऊन ठेवायची पद्धत होती, तेच केलं. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2015 - 12:48 am | डॉ सुहास म्हात्रे

फक्त स्पेलींग / व्याकरण चुका दुरुस्त केल्या हो :) ही विनंती करून कोणीही करू शकते !

खटासि खट's picture

25 Feb 2015 - 11:15 pm | खटासि खट

पुना ओक विद्यापीठाचे विद्यार्थी इकडे पण ? काय खारं नाय ब्वॉ !

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2015 - 12:49 am | डॉ सुहास म्हात्रे

उपरोध पुरेसा व्यक्त झालेला नाही काय ?!

खटासि खट's picture

26 Feb 2015 - 12:20 pm | खटासि खट

उपरोधावर उपरोध हा रिव्हर्स उपरोध आहे, रिव्हर्स स्विंग सारखा ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2015 - 2:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

उपरोधावर उपरोध = रिव्हर्स उपरोध = खरे मत !!! +D

संदीप डांगे's picture

26 Feb 2015 - 3:19 am | संदीप डांगे

१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?
२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?

तुम्ही अजून प्रेषित प्रगो यांच्या पोप संप्रदायाचे सदस्य झालेले दिसत नाही आहात? लौकर दिक्षा घ्या म्हणजे वरिल दोन्ही प्रश्न चटकन सुटतील. मग पुढच्या प्रश्नांची काही आवश्यकता वाटणार नाही कारण पुढची उत्तरे आपोआप निर्माण होतात.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2015 - 6:55 am | अत्रुप्त आत्मा

@प्रेषित प्रगो >>> =))))) योग्य! अगदी योग्य शब्दरचना! =))

टवाळ कार्टा's picture

26 Feb 2015 - 11:36 am | टवाळ कार्टा

rofl

एकदा सर्व ठरले की लि.री.चा बस्ता मात्र लिरिल सारीज अ‍ॅड कटपीस सेंटर, लाजरा रोड, अंमळनेस या ठिकाणीच. तीन पिढ्यांपासून विश्वासाचं अतूट नातं.

पिशी अबोली's picture

26 Feb 2015 - 12:13 pm | पिशी अबोली

तीन पिढ्यांपासून विश्वासाचं अतूट नातं.

१.या तीन पिढ्या लिइरि मधून जन्मलेल्या पुण्यफळांच्या का?
२.कधीही तुटू शकतं हा लिइरिचा विश्वास आहे. तो तुमच्याकडे अतूट कसा काय?

खटासि खट's picture

26 Feb 2015 - 12:22 pm | खटासि खट

तीन पिढ्यांपासून ?
आशिर्वाद द्यावा सर जी.

अहो अतूट नातं कापडखरेदीविषयक आहे हो.. आशीर्वाद आहेतच. बिलातही सूट देऊ. लिरीचे ठरले की जोडीने या.

विजुभाऊ's picture

26 Feb 2015 - 12:24 pm | विजुभाऊ

नव्या सिरीयल्स चे नाव " लिव्हीन बन्धन" , गोष्ट एका लिव्हीन ची

विजुभाऊ's picture

26 Feb 2015 - 12:26 pm | विजुभाऊ

नवे गाणी
" निघाले आज.....लिव्हीन च्या घरी "
" लेक लाडकी या घरची.होणार लिव्हीन मी त्या घरची "

तिमा's picture

26 Feb 2015 - 7:22 pm | तिमा

मग तिची आई हे गाणं म्हणेल,
ओटीत घातली मुलगी लिव्हिण बाई!

हो!! तसंही, लिव्हिणबुवाच असला पाह्यजे असं काही नाही ना. फक्त, 'लाडकी लेक ही माझी पहिली वहिली, भाग्येच तियेच्या ??? आपली झाली'

नाय म्हणजे रिकाम्या जागी लिहीणार काय?

विजुभाऊ's picture

26 Feb 2015 - 12:27 pm | विजुभाऊ

आणखी एक.
नेसली....ईईईईईईईईईई लिव्हीन ची साडी.......

खटासि खट's picture

26 Feb 2015 - 12:39 pm | खटासि खट

बरं अजून एक आठवले

जर लग्न गावाकडे किंवा मुलीच्या घरी झाले तर शहरात पोहोचल्यावर रिसेप्शन द्यावे लागते का ?
मंगळागौर, हळदीकुंकू करावे लागते का ?
झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय करतात ?

झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय करतात ?

डोहाळजेवण चांदण्यातलं करायचं!! दोघांनीही पांढरे कपडे घालायचे. पदार्थही पांढरे...उकडीचे मोदक, दहीभात, दूधभात. नारळीभात, बासुंदी केली तरी त्यात केशर घालायचं नाही. मुळा, पांढरा कांदा हे भाजीत वापरायचं आणि सगळी चांदण्याशी संबंधित गाणी ऐकत बसायचं!! ;)

काळा पहाड's picture

26 Feb 2015 - 2:22 pm | काळा पहाड

कै च्या कै. मुलगी काय चि.सौ.कां. होती का हे सगळं करायला?

खटासि खट's picture

26 Feb 2015 - 7:51 pm | खटासि खट

चि.लि.कां म्हणा की

नाखु's picture

26 Feb 2015 - 3:27 pm | नाखु

लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे

मार्गदर्शन ला हसवाफसवी मधला शब्द "मागल दर्शन " वापरून लिहा आनि मग बघा....

कशी रांग लागेल.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
दर्शन नव्हे सल्ला देणार्यांची..