मदतकेंद्र: सल्ला , मार्गदर्शन, साहाय्य, समुपदेशन

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
27 Feb 2015 - 11:03 am

माझ्या लग्नाला १० वर्षे झालीत मला दोन मुले आहेत माझे मि खूप दारू पितात घरात सारखे तणाव राहतात मि ग्राम प कामाला आहे मि शाळे वर कामाला जाते पार्लर टाकले पण चालत नाही ते घरात आम्हाला पैसे देत नाहीत आई वडील काही म्हणत नाहीत माझे सासरे देखील दारू पितात गांजा पितात पता खेड तात तसेच मासाहार करतात पै कमी पडले कि बहिण आई त्या दोघांना देते .कृपया मला मदत करा त्यावर उपाय सागा सेवा काय करू कि वाद होणार नाहीत माझ्या जवळ पैसे येतील .

-सौ स. श. रा. ( मराठी विकिपीडियातील संदेशात पूर्ण नाव होते पण येथे ते संक्षीप्त केले आहे.)

मराठी विकिपीडियावर संपादन करण्याच्या अडचणी पुरतेच एक मदतकेंद्र नावाचे पान आहे ज्यावर व्यक्तीगत अडी अडचणींच्या संदर्भाने कोणतीच मदत सल्ला मार्गदर्शन उपलब्ध नसते. सर्वसामान्य वाचकाला हे लक्षात न येता ते बर्‍याचदा व्यक्तीगत अडीअडचणी मोठ्या प्रमाणावर तिथे मांडण्याचा प्रयत्न करत असतात पण त्या मराठी विकिपीडियाच्या परिघाबाहेरच्या विषयांबद्दल संपादन गाळणी लावून थांबवणे अथवा नित्याने वगळणे या पलिकडे काहीच करु शकत नाही. मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर आलेला असाच एक संदेश वर नोंदवला आहे. बर्‍याचदा अत्यंत निराश परिस्थितीतील संदेशांचाही त्यात समावेश असतो पण मराठी विकिपीडिया ऐवजी मिपासारखी मराठी संकेतस्थळे अधिक साहाय्यकारी असू शकतील असे वाटते.

या धाग्याचा उद्देश मिपावर मदतकेंद्र नावाचा धागा असावा. ज्या मिपाकरांचे ब्लॉग्स आहेत त्यांनी जमल्यास या धाग्यास त्यांच्या ब्लॉगवरून दुवा द्यावा जेणे करुन हा धागा गूगलसर्चात बर्‍यापैकी हा धागा येऊ शकेल आणि मिपा अधिक प्रमाणात सामान्य जनतेशी जोडलाही जाईल आणि सर्वसामान्य जनतेस आपापसात चांगले मार्गदर्शनही देता घेता येऊ शकेल. एकदा हा धागा परस्पर चांगला चालू लागला की या धागा लेखातून मराठी विकिपीडियाचा उल्लेखाचा वरील परीच्छेद संपादकांनी काढून टाकावा हि विनंती.

समाजजीवनमानराहणीसल्लामदत

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

27 Feb 2015 - 12:12 pm | बहुगुणी

कुणी अडचणी मांडलेल्या दिसल्या की मिपाकर उत्साहाने crowdsourcing करून मदत पुरवायचा प्रयत्न करतात हे अनेकदा दिसलं आहे, तेंव्हा ही नक्कीच स्वागतार्ह सूचना आहे.

एस's picture

27 Feb 2015 - 12:44 pm | एस

मला यात दोन धोके जाणवतात. एक म्हणजे अशा तक्रारी निनावी असल्याने त्यात खोट्या स्पॅम तक्रारी जास्त असतात. आणि दुसरे म्हणजे या तक्रारींवर किंवा मदत मागण्यावर योग्य सल्ला हा शक्यतो समुपदेशकांसारख्या त्या विषयातील तज्ञ स्रोतांकडून यायला हवा. वैयक्तिक समुपदेशनासाठी किंवा मोकळे होण्यासाठी त्या विषयाला वाहिलेल्या संकेतस्थळांचा उपयोग करणे जास्त योग्य ठरेल. मिपाचा सहभाग हा अशा संस्थळांची माहिती संकलित केलेला धागा काढण्यापुरता असावा असे माझे मत आहे.

वैयक्तिक समुपदेशनासाठी किंवा मोकळे होण्यासाठी त्या विषयाला वाहिलेल्या संकेतस्थळांचा उपयोग करणे जास्त योग्य ठरेल.

होय अशा विश्वासार्ह/पडताळलेल्या/ दुजोरा मिळालेल्या सुविधा आणि संकेतस्थळांची माहिती संपादकांनी वेळोवेळी धागा लेखात बदल करून जोडल्यास बरे पडेल पण संबंधीत माहितीस प्रतिसादात्न दुजोरा मिळाला आहे अथवा खात्री केलेली आहे हे तत्पुर्वी पहावे हे बरे नाही तर आगीतून फोफाट्यात अशी स्थिती येऊ नये.

जो पर्यंत अशी विशेष मराठी संकेतस्थळे नाहीत तो पर्यंत किंवा काही रायडर्स ठेऊन मिपावरही हि सुविधा चालू ठेवण्यास हरकत नसावी. त्या शिवाय कोणत्या समुपदेशकाची सेवा कशी आहे या बद्दलही चर्चा होऊ शकेल.

तक्रारी निनावी असल्याने त्यात खोट्या स्पॅम तक्रारी

सर्वच तक्रारी निनावी असतात असे नव्हे. ९ पैकी ६ जण सर्वसाधारणपणे नावासहीत लेखन करतात उर्वरीत ३ जणांचा प्रिफरन्स टोपणनावाला असतो (या आकडेवारीत तोतयांचा समावेश नाही) असे माझी लक्ष ठेवलेलेलि मराठी लोकांबद्दलची आकडेवारी सांगते. सर्वच टोपणनावी तक्रारी खोट्या असतील असे नाही. उलटपक्षी काही वेळा निनावी/टोपण नावाने लेखन व्यक्तीगत सुरक्षीततेच्या दृष्टीने संबंधीत व्यक्तीस उपयूक्त असू शकते. एखादी तक्रार खोटी असेल तर फार फार तर दिलेल्या सल्ल्यांचा त्याच व्यक्तीला उपयोग होणार नाही पण बाकीच्या लोकांना उपयोग होऊ शकतोच. शिवाय एकदा डोळे मुरले कि एकंदर लेखनशैलीवरून जेनुआईन किती आहे याचा अंदाजा समुपदेशकास येऊ शकेलच असे वाटते.

अशा तक्रारी खऱ्या असतात असं समजायला भरपूर वाव आहे. परंतू या दारूड्या जुगारी आणि मारकुट्या लोकांना वठणीवर आणण्यास मनाचे श्लोक ,असं कलू नये वगैरे सांगणेछाप केंद्रांचा काही उपयोग होत नाही. पूर्वी गावकी ,पंच मंडळी ,चावडीवर पाटलांनी बोलावलं इत्यादीँचा दरारा होता तसा आता राहिलेला नाही चार धटिंगण बखोटीला धरून आणायचे आणि हाग्यादम देत असत.हे उंटगे लोक आता कोणालाच घाबरत नाहीत.