अविनाशीत्व
ग्रीष्माच तप्त ऊन ,
पुरातन काळ्याशार मंदिराचा रणरणता प्रदक्षिणा मार्ग
गावोगावच्या आबाल वृद्धांनी
श्रद्धा , भक्ती , उपचार , सोपस्कार आणि दृढ विश्वासावर जागृत ठेवलेलं देवस्थान
पूजा , आरत्या , फेर्या , लोटांगणे
यांनी तापलेल्या वास्तवाला शमवण्यासाठी देवाला दिलेली हाक
देवाने ऐकली बहुतेक.
कारण ..
यानंतर जवळच्या संगमावरून गार वारे वाहू लागले
नंदादीप उजळले ,
दीप माळांनी तळावलेल्या डोळ्यांचे पारणे फिटले
आरत्या - कीर्तनांच्या आवाजाने कान
तर प्रसादाच्या माधुर्याने जठराग्नी निवळले