नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने !
नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने
नोकरीशी जुंपणेही फिरुनी ते, नव्या दमाने ।
राहीले मनात गाणे, वर बॉसचे जोडे नव्याने,
काय पडलो मी भरीला, बिल्डरांच्या सुक्या दमाने ।
कोणत्या शैय्येवरी असते मजा सांगा गड्यांनो,
छळे इएमाय वेळी-अवेळी, रोजचा नव्या बळाने ।
भूक तगडी पण रोमान्सही, का जमेना रोज आता ?
रेंटातूनी हप्ता वळविणे माथी का, पुन्हा नव्याने ।
तू मला कुरवाळणेही सोडले आहे अताशा,
टेक-होम झाला कमी का? व्हिलनी नव्या लोनाने ।
भाडेकरी मी शोधतो पण, रेंट पाडूनी मागती,
मुजोर कामवालीचाही रेट, वाढतो नव्या दराने ।
मोल उसंतीला ना उरले, बिल्डराने पुन्हा काढली ,
नदीकाठची स्कीम देखणी, नव्या मुहूर्ती, नव्या दराने ।
आभार्स !
जब्बरदस्त हो संजयजी.
लै भारी देवा... जबराटच !
ह्ही ही ही ही! =))
अर्र..... आवरा संक्षिना या,
कं लिवलंय! कं लिवलंय!!
सुरेख संक्षी
अगागा! पाणीच आणलात राव डोळ्यात! :P
व्वा !
हा हा भारी! पण विडंबनाच्या
कंसामुळे विस्ताराच्या मर्यादा येतात
तो लॉलीपॉपचं काय झालं याचा
ओहो !
मस्त लिहिलंय...