कलगीतुरा - पूर्वार्ध
आजकाल पुण्याचा ऊन्हाळा नकोसा झालाय. मला जेव्ह्ढा पुण्याचा हिवाळा प्रिय, तेव्ह्ढाच ऊन्हाळा अप्रिय. सुट्टीच्या दिवशी दुपारी बाहेर जायला नकोसं वाटतं. आज रविवार. इतर वेळी मी घरी नसतो सापडलो पण या उकाडयामुळे घरीच थांबलो होतो. टाईमपास म्हणून टी. व्ही. लावला तर फिरून फिरून त्याच त्याच बातम्या. कारण लोकसभेची निवडणूक ! लोकसभेच्या प्रचाराची सगळीकडे रणधुमाळी चालू होती. प्रत्येक पक्ष, अपक्ष आपलाच उमेदवार्/उमेदवारी कशी जनतेच्या भल्यासाठी आहे हे मतदारांवर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.राष्ट्रीय प्रश्न , विकासाचा अजेंडा यापेक्षा वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्यांना अक्षरशः ऊत आला होता.