दिगंबर - फसलेला संन्याशी अन थकलेला संसारी
'स्वामी दया करा.
आता या वयात हे करायला सांगू नकात.
कळत नव्हतं, तेव्हापासून तुमच्या पंखाखाली घेतलंत मला!
चार चांगल्या गोष्टी शिकवल्या!
ब्राह्मण नव्हतो तरी, संध्या शिकावलीत.
येत नव्हतं तरी, घासून पुसून संस्कृत शिकवलेत.
चार घरी अनवाणी पायांनी भिक्षा मागायला शिकवलीत.
प्रसंगी, स्वतः रांधून एकटच जेवायला शिकवलंत.
स्वामी, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंत,
पण आता हे करायला सांगू नकात!