शक्तिपात
फार पूर्वी कोणीतरी फेकलेला दगड
डोक्याला लागून झालेली जखम दाखवण्यासाठी
मी डॉक्टरकडे गेल्यावर
अचानकच वाढला माझा मेंदू गाठोड्याएवढा
खदाखदा हसला डॉक्टर
आणि बाहेर घेऊन गेला मला
तोपर्यंत वाढला मेंदू अवाढव्य
जोमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये
हवा भरलेल्या फुग्यासारखा
आभाळभर मेंदूच-
लिबलिबित मासाचा सुरकुत्यांसकट
तरीही जड वाटेना मला.