खडकात काही मोहवणारं ?
कदापि नाही
खडकात काही लूभावणारं ?
मूळीच नाही
खडक राकट
काळा कभिन्न
काष्ठ कठोर
पण खडकातलं पाणी
असतं गोड
खडकातलं पाणी
असतं कायम
काही माणसं अशीच
असतात खडकासारखी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
786
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया