मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुण्यात जरा ऊदासच वाटलं

जव्हेरगंज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पुण्यात जरा ऊदासच वाटलं शुक्रवार पेठेत एक माकड मारलं रेल्वेने मग कोल्हापूरला गेलो महालक्ष्मी मंदिरात एक विंचू ठेचला मग बसस्टँडवर बिस्किटाचा पुडा खाल्ला चालत चालत मिरजेला गेलो वाटेत रुकडीला मुक्काम ठोकला सांगोल्याला मावशीच्या घरी तुऱ्याचा कोंबडा कापून खाल्ला पंढरपुरात जेव्हा पोहोचलो विठ्ठलाच्या नावानं टाळ कुटला चंद्रभागेत बुडी मारुन पुन्हा परतीचा रस्ता शोधला पुण्यात आल्यावर जरा ऊदासच वाटलं _________________ (आधारीत )

वाचने 8195 वाचनखूण प्रतिक्रिया 33

In reply to by संदीप डांगे

आदूबाळ Sun, 02/07/2016 - 13:16
यावर आधारित आहे: मुंबईनं भिकेस लावलं कल्याणला गूळ खाल्ला ज्या गावाला नाव नव्हतं पण एक धबधबा होता तिथं एक ब्लँकेट विकलं अन पोटभर पाणी प्यालो पिंपळाची पानं चघळत नाशकापर्यंत आलो तिथं तुकाराम विकला अन् वर खिमापाव खाल्ला जेव्हा आग्रारोड सोडला तेव्हा एक चप्पल तुटलं न मागता मिळालेली कांदाभाकर खाऊन ऊठलो ढुंगणाखालची हॅवरसॅक उचलून पाठीवर घेतली मग दोन मैल विचार केला अन परतायचं ठरवलं - अरुण कोलटकर

In reply to by आदूबाळ

भक्त प्रल्हाद Sun, 02/07/2016 - 15:37
मुंबईने भिकेस लावल्यावर पुण्याला आलात. मग उदास वाटणारच! असो. तुमची कविता समजली नव्हती. हि कविता दिल्यावर आता न समज्लेल्या दोन कविता झाल्या.

पैसा Sun, 02/07/2016 - 14:14
पुणे आवडलं नै तर हुंबैला चला. विचार करायला पण वेळ भेटणार नाय. अरुण कोलटकरांच्या कविता वाचणार्‍या सर्वांना लांबूनच साष्टांग नमस्कार.

कंजूस Sun, 02/07/2016 - 14:27
माकड मारल्याचं ( एका हुच्चभ्रूला सुनावलं) त्याचं प्रायश्चित्त घेऊन परत आल्यावरसुद्धा शुक्रवारपेठेत स्वागतच झालं "या एकदा सवड काढून."

सतिश गावडे Sun, 02/07/2016 - 15:25
पुण्यात उदास वाटले तर बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीला जेवायला जावे. तिथल्या स्वर्गिय वातावरणाने आणि जेवणाने उदासिनता कुठल्या कुठे पळून जाते. निदान तिथल्या बिलाने तरी नक्कीच जाईल.

In reply to by सतिश गावडे

कपिलमुनी Sun, 02/07/2016 - 17:16
बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीला जेवायला जावे, आल्यावर त्यावर धागे काढावेत मग आपला आणि बऱ्याच मिपाकरांचा उदासपणा नक्की जातो

In reply to by कपिलमुनी

नाखु Mon, 02/08/2016 - 10:00
सूज्ञ मिपाकर "उदास"(आडनाव नाही चित्तवृत्ती) झालेले लोकच बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीला जातात असा जावईअशोधाच्या धाग्याच्या प्रतीक्षेत रहावे लागेल आम्हाला !!! नाखु वाटपहाणे

जव्हेरगंज Sun, 02/07/2016 - 18:12
मै भाभीको बोला क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ? भड़क गयी साली रहमान बोला गोली चलाऊँगा मै बोला एक रंडीके वास्ते? चलाव गोली गांडू. - अरुण कोलटकर

In reply to by जव्हेरगंज

मारवा Mon, 02/08/2016 - 14:30
हे विडंबन वा अजुन जे काय तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय ते अजिबात आवडल नाही. मुळ कविच्या वहीवर विनाकारण चिंखडण्यासारख वाटलं. असो.

नीलमोहर Mon, 02/08/2016 - 10:20
एकतर पुणं.. त्यात पेठ.. तीही.. असो. पुण्यात सर्वाधिक माकडं स... आणि श... पेठेत आढळून येतात बहुधा.

In reply to by टवाळ कार्टा

नीलमोहर Mon, 02/08/2016 - 14:08
मी खर्‍र्रया - खुर्‍र्या शेपटीवाल्या प्राण्यांबद्दल (स्वतः पाहिलेले) लिहीले आहे. आपण कशाबद्दल म्हणताय ;) (पेठ निवासी)