मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सणासुदीची सफाई

माहितगार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निमित्ताने साफसफाई केली की मनही निवतं, आनंद दुणावतो. मग नास्तिक असो वा आस्तिक — सण साजरा होतोच उत्साहात, समाधानात. - (अज्ञेय) माहितगार

वाचने 653 वाचनखूण प्रतिक्रिया 0