अव्यक्त

तप्तमुद्रा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
8 Jan 2021 - 10:30 am

जेव्हा निर्मम कठोर
आसमंतात दाटले
तेव्हा अनाहत आत
खोलवर निनादले

अनाघ्रात अदृृष्टाची
जाणवली रूणझुण
स्पर्श,गंध,रस, रंग
एक झाले कल्लोळून

आकलनाच्या कवेत
आले-आलेसे वाटले
अज्ञेयाच्या धुक्यामध्ये
नकळत वितळले

जाणिवेची नेणीवेशी
जेव्हा थेट भेट झाली
जुन्या जखमेच्या जागी
तप्तमुद्रा उमटली

अव्यक्तकविता

शायरी..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
6 Dec 2020 - 4:19 pm

पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा?
शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही!

शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा
सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही!

अर्थास प्राप्त होता,शब्दास जाग यावी
ऐश्या प्रभावितेची,मी साक्ष मागत नाही!

मी सहजतेचा प्रवासी,असतो तिच्याचपाशी
रचनेत हाव रचितेची ,अशीही मनात नाही!

जावे तिच्या कुशीशी,घेऊन ऊब यावे
सहजता माऊली ही, असते मनात माझी!

भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही?
ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही!

अतृप्त...
०====०====०====०====०====०====०====

अव्यक्तवीररसगझल

आठवण

Prajakta Sarwade's picture
Prajakta Sarwade in जे न देखे रवी...
23 Sep 2020 - 1:01 am

परडीत काढुन ठेवला मोगरा तरी
हातास सुगंध तसाच राही कितीतरी वेळ

तसचं तुला स्मरुन लिहलं मी काही तरी
शब्दास सुगंध तुझाच राही कितीतरी वेळ
-प्राजक्ता

अव्यक्तप्रेम कविताचारोळ्या

पान खाता खाता आठवतं काहीबाही..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
10 Aug 2020 - 8:48 am

पान खाता खाता आठवतं काहीबाही..

अव्यक्तआठवणीमुक्त कवितामुक्तक

सुशांत

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
25 Jun 2020 - 7:26 pm

नव्हते जेव्हा पाहत कुणिही ...
रडलो होतो

झगमगताना पायतळीच्या अंधारी...
तगमगलो होतो

बेमालुमसा प्रतिमेमागे...
दडलो होतो

उजेड नाकारून अंधारा...
भिडलो होतो

श्रेयस प्रेयस तुंबळात..
सापडलो होतो

रुजताना उन्मळलो...
का मी किडलो होतो?

अव्यक्तकरुणमुक्तक

ती अन् पाऊस..

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
19 May 2020 - 8:25 am

ती अन् पाऊस..

खूप दिवस झाले
आता पावसात
चिंब चिंब भिजून
भरलेलं सावळ ते आभाळ
नजरेत सामावणारी ती

भिजावं का थोडतरी?
ह्या येत्या पावसात
चिंब चिंब घेऊ न्हाऊन
असा विचार करणारी ती

गेले कित्येक दिवस
दिवस? छे! कित्येक वर्ष
छत्रीबाहेर हात काढुन
भिजण्याचा प्रयत्न करतीये

हा पाऊस मात्र
द्वाडच फार
भिजवले मलाच फक्त
मन मात्र तसेच कोरडे

मुक्त कविताकवितामुक्तकपाऊसअव्यक्त