जर्द पिवळी विजार
जर्द पिवळी विजार, तीतून
द्वार ठोठावत आलेले
आतड्यांतुनी साठलेले
पोटी आवळून धरलेले
संधी मिळाली नाही तेंव्हा
आडोशाला बसण्याची
जे त्याज्य ते त्याग करूनी
मोकलाया दाही दिश्यांची
आधी असं झालं नाही
कधी पिवळं झालं नाही
त्या कातर वेळी मात्र
रोखून धरणं झालं नाही
मग जनाची ना मनाची
कसली लाज कुणाची
निसर्ग-हाकेला ओ देऊन
क्लांत शांत होण्याची
- (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्