✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अण्णा गायले!

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 12/09/2007 - 19:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11363 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

न
नंदन Sun, 12/09/2007 - 20:00 नवीन

वा!

प्रसन्न करणारी बातमी. 'अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक', हे तर भीमसेनांच्या गाण्याचेच उद्दिष्ट म्हणता येईल असं त्यांचं गाणं ऐकून वाटत राहतं. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 12/09/2007 - 20:13 नवीन

वा वा वा वा

तात्या, तुमचा हा लेख वाचून आमची अवस्था 'आनंद पोटात माझ्या माईना" अशी झाली आहे. चित्तोपंतांनी ही बातमी देऊन अवध्या मिसळपावावर आनंद निर्माण केला आहे. श्री. अण्णांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या सुरांनी सर्व रसिक असेच मंत्रमुग्ध राहोत ही श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना. आपला, (भाग्यवंत) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 12/09/2007 - 20:34 नवीन

"श्री.

"श्री. अण्णांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या सुरांनी सर्व रसिक असेच मंत्रमुग्ध राहोत ही श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना." हेच म्हणतो. तात्या, एखादा चांगला दुवा येथे लिहा पाहू ज्यामध्ये अण्णा एकदम अवघड अशी एखादी बंदीश गात असतील असा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
आ
आजानुकर्ण Sun, 12/09/2007 - 20:38 नवीन

वा!

आनंदी व्हावे अशीच बातमी आहे ही. आम्हाला शास्त्रीय काही कळत नाही पण "पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे" किंवा "आरंभी वंदीन अयोध्येचा राजा" सारख्या अभंगांतून भीमसेनअण्णांच्या आवाजाचे ऋण आपल्या आयुष्यावर कायमचे झाले आहे. आण्णांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. -(ऋणी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 12/10/2007 - 07:06 नवीन

पूर्ण सहमत

आम्हाला शास्त्रीय काही कळत नाही पण.. तो जबरदस्त आवाज मात्र आमच्या सारख्या अनभिज्ञ लोकांना देखील भारावून टाकतो. अभंग गायन म्हणले की अण्णा (व लता मंगेशकर) यांच्या शिवाय इतर कुणी गायलेले आठवतच नाहीत. आण्णांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्रमोद देव Sun, 12/09/2007 - 23:20 नवीन

अलभ्य लाभ!

ही बातमी खूपच मस्त आहे. ह्या वर्षी सवाईला जाण्याचा योग होता पण काही कारणाने तो पुर्ण होऊ शकला नाही. आता भीमसेनअण्णा गायले हे ऐकून खूप आनंद झाला आणि हा योग मी साधु शकलो नाही त्याबद्दल मात्र खूप वाईटही वाटतेय. ते असेच अखंड गात राहोत आणि आम्हा रसिकांना मनमुराद आनंद देवोत अशी प्रार्थना करतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 12/09/2007 - 23:33 नवीन

सिद्धी

भीमसेन अण्णांचे गाणे सवाईला ऐकून एक दशकापेक्षा जास्त काळ आता उलटला. पण स्मृती अजून ताज्या आहेत. आजही जेव्हा काहीतरी अस्सल आणि अव्वल ऐकावेसे वाटते तेव्हा "सिद्धी"मधली एखादी सीडी लावतो. ज्यांच्याबद्दलच्या नुसत्या विचाराने मनावरचा मलिन कचरा निघून जातो असे हे एक नाव. उनको हमारी उमर लग जाये :-)
  • Log in or register to post comments
न
नात्या Mon, 12/10/2007 - 06:01 नवीन

झलक

याची छोटीशी झलक इथे बघा... http://www.esakal.com/features/bhimsen/index.html
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/10/2007 - 07:12 नवीन

नात्यासाहेब,

झलक पाहिली. मनापासून धन्यवाद... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नात्या
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 12/11/2007 - 03:40 नवीन

निखळलेले चिरे

भीमसेनजींचे गाणे सकाळच्या संकेतस्थळावर ऐकले. कानांनी निखळलेले चिरे भरून काढले, आणि त्या गडाची भक्कम तटबंदी आजही जाणवली. - नतमस्तक सर्किट
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Wed, 12/12/2007 - 15:55 नवीन

काय सांगू !

ह्या वर्षीदेखील सुदैवाने सवाईला हजेरी लावता आली आणि त्याचं चीज झालं !! तीनेक वर्षांपूर्वी बुवा गायले होते आणि तेव्हापासून खरे तर आशाच सोडून दिली होती की ते पुन्हा गातील ! पण अनेक रसिकांच्या प्रेमाचाच परिणाम म्हणू, अण्णा गायले ! आनंद अभ्यंकरांनी ही सूचना देताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला . मग मात्र मंडपात एसेमेस आणि फोन कॉल्स सुरू झाले, ओळखीच्यांना बोलवायला आणि ही बातमी ऐकवायला ! त्यानंतर अजय पोहनकर ह्यांचं गाणं होतं, परंतु तेही इतके उत्सुक होते की, एकदा त्यांनी गाणं मध्यावर थांबवून विचारलं देखिल की अण्णा कधी येणार आहेत !! आणि मग अण्णांचं आगमन झालं !! मला नाही वाटत तेव्हा मंडपात असा एकही जण असेल ज्याचे डोळे पाणावले नसतील !! आनंद अभ्यंकरांचा आवाजही भरून आला होता ! गाण्यानंतर अण्णांची ज्यांनी आजारपणात सेवा केली त्यांचा सत्कारही झाला !!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/12/2007 - 16:41 नवीन

धन्यवाद,

विस्तृत बातमीबद्दल धन्यवाद आवडाबाई, परंतु एक सुधारणा. माझ्या माहितीप्रमाणे निवेदकाचं नांव आनंद अभ्यंकर नसून आनंद देशमूख आहे. आज अनेक वर्ष तो सवाईचं सूत्रसंचालन करतो आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडाबाई
आ
आवडाबाई Fri, 12/14/2007 - 16:17 नवीन

अरेच्या !!

बरोबर तात्या, देशमुखच ते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
ध्रुव Wed, 12/12/2007 - 19:52 नवीन

प्रत्यक्ष

प्रत्यक्ष सवाईला न येण्याचे वाईट तर वाटले, पण आपण सांगताना खरच डोळ्यात पाणी आले. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडाबाई
न
नाना फडणवीस Fri, 12/14/2007 - 13:40 नवीन

होय

होय, अण्णांना पुन्हा ऐकण्याचे भाग्य आम्हाला त्या दिवशी लाभले. हा योग आमच्या जीवनात आला याचा आनंद आहे. यावर्षीचा सवाई कधीही विसरला जाणार नाही. नाना फडणवीस
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा