कर्नाटकची राणी व्हाया हरखुन गेली कमळाबाई;
मुखात मारुन मटकन बसली हिरमुसलेली कमळाबाई !
पदर धरोनी हिचा जयांनी लुळा-पांगळा प्रवास केला--
'ठिकाण' येताच ते म्हणाले --भरकटलेली कमळाबाई
'ठिकाण' येताच ते म्हणाले --भरकटलेली कमळाबाई
ठरले-तुटले, तुटले-ठरले कुणी कुणाला कितिदा वरले ?
परित्यक्ता ही अखेर झाली नवी-नवेली कमळाबाई !
बाप-लेक ते बनेल कोल्हे काटा-छापा खेळुन गेले;
साधन म्हणुनी वापरली ही --खुळी 'अधेली' कमळाबाई
साधन म्हणुनी वापरली ही --खुळी 'अधेली' कमळाबाई
धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या
पाळी येता गलका झाला -- 'विटाळलेली कमळाबाई' !
सत्ता-डोही न्हाण्याचीही ओढ जिवाला ओढत असता--
कावेरीच्या पाण्याविण ही सुकली वेली कमळाबाई
कावेरीच्या पाण्याविण ही सुकली वेली कमळाबाई
निधर्मवादी मधुमेहींनी छान मतलबी पथ्य पाळले--
चाटुन-चोखुन दूर लोटली ही गुळभेली कमळाबाई
शिवाजी जवरे
दीपनगर - ४२५ ३०७
ता. भुसावळ, जि. जळगाव
( आमचे ज्येष्ठ कविमित्र शिवाजी जवरे ह्यांनी येदियुरप्पा मुख्यमंत्रिपदी आरूढ होण्यापूर्वी ही हझल लिहिली होती. मिसळपाववरील वाचकांना ती नक्कीच आवडेल, असे वाटल्यामुळे इथे देत आहे.)

| लेखनविषय: |
|---|
वाचने
10118
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरा!
मार्मिक
हा हा हा हा
चांगली
कविता आवडली.....
क्या बात है !!!!!!
मेघनाद
सर्कीट
In reply to मेघनाद by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कुशल हाताळणी
उत्तम
अती उत्तम
अप्रतिम
वा
सुंदर कविता!