काही सुचत नाही
काही टोचत नाही
रस्त्यावरच्या छोट्या मुलीने विकलेली फुलं बोचायची
मनाला सवय तरी होती दुसर्याचा विचार करायची
पण हल्ली मी असले विचारही वेचत नाही
हल्ली मनाला फार काही टोचतही नाही
जरडच झालोय मी, तुटल्यासारखा,
जख्ख म्हातार्या वाळल्या खोडासारखा
तरी आशा आहेच, कधी तरी खोडाला पान येईल
जरड झालेल्या मला, एक विचार करणारं मन येईल.
मग मलाही कणव येईल त्या रस्त्यावरच्या छोट्या मुलीची
मी ही काही तरी करणे लागतो रे, ही उभारी येईल मनाची.
मला काही टोचत नाही, ही निर्लज्ज भावनाही संपुन जाईल
एक दिवस कुणासाठी काही करण्याचे सुख घेवून येईल
पण तोवर सत्य हेच... मी एक जरड जख्ख... बोथट बनचूका!
--------------------------------------- १०-१२-२००७
------------------------------------------------------
कशानेच काही फरक पडत नाही मनाला असे का?
सगळे जग गांडू आहे हे म्हणण्याआधी आत डोकावून पाहिले की मग दिसते,
आपण किती षंढ झालो आहोत. किती जग बदलावे? काय करावे...
ही बोचरी भावना मनातून जात नाही हेच खरे, या भूमिकेतून वरचे शब्द उतरले.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8689
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता...
मनाला त्या क्षणी लाज वाटली नाही
In reply to सुंदर कविता... by विसोबा खेचर
नीलकांताला/ओंकारला पोष्टकार्ड!
In reply to मनाला त्या क्षणी लाज वाटली नाही by गुंडोपंत
सहमत !!!
In reply to नीलकांताला/ओंकारला पोष्टकार्ड! by विसोबा खेचर
व्यायामशाळेतल्या कविता
व्यायाम
In reply to व्यायामशाळेतल्या कविता by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कविता आवडली.
काय सांगु सर...
In reply to कविता आवडली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या बी कविता
येवू द्या ना!
In reply to आमच्या बी कविता by प्रकाश घाटपांडे
वा,"पण
कोणती गझल?
In reply to वा,"पण by राजे (verified= न पडताळणी केलेला)
अहो
In reply to कोणती गझल? by गुंडोपंत