तुझ्या घरासमोरचा रस्ता, अजून तसाच वळतो का गं?
कोपर्यावरचा गुलमोहर, अजून तसाच जळतो का गं?
तसाच आहे का गं अजून, नदीकाठचा काळा पत्थर?
हात हातात घेता क्षणीच, सूर्य तसाच ढळतो का गं?
डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्तास
न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं?
पार आणखी पिंपळ तिथला, अजून आहे तसाच तेथे?
मनात येता उत्कट काही, तसाच तो सळसळतो का गं?
वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी
असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं?
-अविनाश ओगले
ह्या जगात
सुंदर शिल्प -
काय मस्त
आभारी मास्तर !!!
मस्त
उत्तम!
अप्रतिम!!!!!!!!
सुरेख
वा..
मास्तुरे, लई झ्याक!
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
या
मस्तच...
सलाम...
छानच.
शिल्पकला गुरु
मला वाटले
https://www.youtube.com/watch
In reply to https://www.youtube.com/watch by भडकमकर मास्तर
ऑ...
वाह, खुप सुंदर ... अप्रतिम !
भडकमकर मास्तर... येत रहा आणि
भारी योग आला ... जोशी सर
हे तेच का ?
In reply to हे तेच का ? by प्रसाद गोडबोले
हे ते नाहीत. हे चंदु जोशी या