श्री. केळकरांशी सहमत!
मी गेली ८ वर्षं सदाशिव / शनवार पेठेत राहून अगदी पक्का नसलो तरी ८०-९० % पुणेरी झालो आहे असं बरेचजण म्हणतात.
त्या अनुशंगाने बोलायचं झालं तर.... गेल्या ६ महिन्यांपासून मी मुंबईत आहे, पण मला ओळख-पाळख नसतानाही रस्त्यात चालता चालता येणारे जाणारे मदत करणारे बरेच भेटले.
अगदी आजच उदाहरण सांगतो, बस-स्टॉपवर रांगेत उभा होतो, रांग बरीच मोठी असल्याने स्टॉपच्या शेडबाहेर बरीच पसरली होती. अचानक पाऊस यायला लागला, मी छत्री / रेनकोट काहीच बरोबर आणलं नव्हतं! भिजायला लागल्यावर वैतागून मी "आयच्चा घो! " असं पुर्ण म्हणेपर्यंत डोक्यावरचा पाऊस थांबला, वर पाहिलं तर छत्री! वळून पाहिलं तर रांगेतला मागचा माणूस स्वतःची छत्री माझ्याही डोक्यावर ऍडजेस्ट करुन मंद हसत माझ्याकडे पहात होता....
अगदी असाच पण उलटा अनुभव मला एकदा टिळक रोडवर आला होता. पावसात भिजायला लागलो म्हणून मागच्या काकांना म्हणालो, "तुमच्या छत्रीखाली मीही थांबू का २ मिनिटं?" एकाही अक्षरानं उत्तर न देता म्हातारा माझ्याकडं चपलेखाली चिरडलेला झुरळाकडं पहावं तसा पहात राहिला....छत्री थोडीशी माझ्यापासून दूर घेऊन...
:) चलता है! गावागावाची पध्दत आपली. कोल्हापूर-सातारा-सांगली भागात गेलात तर आदरातिथ्य म्हणजे नेमकं काय ह्याचा अर्थ उमगतो, तर मुंबईत आल्यावर "वेळ" किती महत्वाची असते ते कळतं. मराठी सांस्कृतिक जगतात वावरायचं असेल तर पुण्याशिवाय पर्याय नाही :)
अन् जोरदार भाऊबंदकी बघायची असेल तर या आमच्या बारामतीला. एकरभर बागायतीसाठी कसे भाऊ भावाच्या डोक्यात कुर्हाडी घालतात दाखवतो :)
बाकी बर्याच मुंबईकरांचे अमेरिकनांसारखे असते, आपल्यापलीकडे जग असते हे त्यांना पटतच/मान्यच/समजतच नाही.
=======================================================
मनिष भाउ,
बाकि काहिंचे माहित नाही, परंतु ज्यानी २६ जुलॅ व बोम्ब्स्फोटाच्या वेळी रस्त्यावर येउन अनुभव घेतला असेल ते कदाचीत आपल्या मतांशी सहमत होणार नाहीत.
मनिष भौ
एक विनंती; उठसुठ पुण्याला शिव्या घालू नका
शिव्या नाही घालत हो मीही पक्का पुणेकर आहे.
त्या 'फरका' ला सतत 'उणीवा' म्हणून हिणवू नये.
पुण्यात काहीही उणे नाही.मी पुण्यात रहाणे एन्जॉय करतो.
हिणवणे वगैरे माझ्या मनात नाही.
पुण्याची वैषिष्ठ्ये मला आवडतात. तरीही तुमची सूचना सर आखोंपर....
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
सायंकाळच्या अचानक मिपाकट्ट्याला शुभेच्छा !!!
पुण्याची वैषिष्ठ्ये मला आवडतात. तरीही तुमची सूचना सर आखोंपर....
रुकनेका नै विजुभौ, आम्हाला पुण्याची खरी ओळख होते आहे. येऊ द्या अजून पुण्याची काही वैशिष्टे :)
( आमचे येथे घोडे/ टांगे/लग्नाचा हॉल/तेराव्याचे महाभोजन/ श्राद्धाचे स्पेश्यल मेनु मिळेल ( वडे /तांदळाच्या खिरीसह) ,पिंडासाठी चांगले कावळे भाड्याने मिळतील) पुणे ३०
हाहाहाहाहा :)
संध्याकाळी साडेसात वाजता पुरेपुर कोल्हापुर समोर भेटूया. त्या नंतर ठरवूया की कुठे जायचे ते. कोण कोण येतंय ते सांगा म्हणजे उशीर झाल्यास ठरलेल्या जागेवरच येता येईल. तात्या, इनोबा ,डॉ. प्रसाद दाढे किंवा मला फोन करू शकता.
पुरेपुर कोल्हापुर समोरचे डॉ. दाढेंनी सुचवलेले हॉटेल किंवा मग चांदणी चौकातील कुठलेही हॉटेल असा काहीसा विचार आहे. तुमचं मत काय?
नीलकांत
प्रिय तात्या,
आपण येणार आहात हे वाचुन बरे वाटले. गप्पा टप्पाच्या दृष्टिने चांदणी चौक बरे पडेल. तेथे बावधन चौपाटी आहे आणि निवांत गप्पाही मारता येतील.
कार्यक्रम पत्रिका वितरीत केली तर अजून बरे होईल.
१००% भेटणार.
कलंत्री
काल आम्हाला आमचे पुण्यातले काही मिपाकर मित्र वेळात वेळ काढून भेटले याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
प्राजू, डॉ प्रसाद दाढे, भडकमकर मास्तर, इनोबा, गमभनकार ओंकार जोशी, मनिष, नीलकांत, आणि विजूभाऊ या मंडळींचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. या सर्व मित्रांना भेटून आम्हास आम्हास अत्यंत आनंद झाला. मिसळपावबद्दल सर्वांनी भरभरून प्रेम व्यक्त केले ही गोष्ट आम्ही मोलाची समजतो!
काल जेवत असतांनाच अमेरिकेहून डांबिसकाकांचा फोन आला व त्यांनी प्रेमाने सर्वांची चौकशी केली. त्याचप्रमाणे धमालमुलगा व आनंदयात्री यांनीही सर्व कट्टेकरींची चौकशी केली! :)
सध्या डॉक्टरांनी पूर्ण बंदी केली असून अण्णांना कुणासही भेटू देत नाहीयेत. तरीही त्यांच्या घरच्यांनी आम्हाला विशेष परवानगी दिली आणि आम्हाला आमचे मानसगुरू भीमण्णा यांचे दर्शन मिळाले. अण्णांनी हातात हात घेऊन आमची विचारपूस केली, जरा वेळ शेजारी बसवलं, यापरीस दुसरे भाग्य ते कोणते?
असो..
एक दोन महत्वाची कामे आटपून आज संध्याकाळपर्यंत संत तात्याबा ठाण्याला परततील. पुन्हा एकवार सर्व मिपाकर पुणेकरांचे मनापासून आभार...
तात्या.
मलाही स॑त तात्याबा महाराजा॑चे सदेह दर्शन प्रथमच घडले, त्याचप्रमाणे नीलका॑त, मनिष व सर्वव्यापी प्राजूही पहिल्या॑दाच भेटले. विजूभाऊ॑नी रजनिशा॑चेही प्रत्यक्ष दर्शन घडविले (आता ते सर्व मिपाकरा॑नाही ते लवकरच मिळणार आहे. मला ठाऊक आहे, आ॑बटशौकीन आता जिभल्या चाटत असतील.. :)
काल फक्त एकाच गोष्टीची रूखरूख लागली. तात्या॑चे गाणे राहूनच गेले.. ते स्थळ गाण्याच्या मैफिलीला योग्य नव्हते हे खरे आहे पण पुढच्या वेळेस मात्र ही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पण गप्पा मात्र पुष्कळ झाल्या (सविस्तर वृत्ता॑ताचा पोवाडा शाहिर ओमकार सादर करणारच आहेत..)
बरीच म॑डळी काल फोटू काढत होती.. टाका की राव
प्रतिक्रिया
श्री.
छान
बाकी
तुमची सूचना सर आखोंपर....
शुभेच्छा !!!
संध्याकाळी
चांदणी चौकाला प्रथम पर्याय द्या.
आभार..!
कृतज्ञता.... !!!
आयला, इनोबा
मलाही स॑त
हेच म्हणतो...
भेटलात
अरेरे !
'पुरेपूर कोल्हापूर' या नावाचे एक हॉटेल पुण्यात आहे. संध्याकाळचे