Skip to main content

खाना खजाना

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 10/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
खाना खजाना आजकाल टी व्ही वर कुठलीही चॅनेल लावली की हटकून कोणी एक बाबा किंवा बाबी झटपट स्वयंपाकाचे धडे धडाधड देतांना दिसतात. हे सारे पदार्थ सारखे सारखे पाहून काय होते, की आमच्या बीबीला बरेच इन्स्पीरेशन मिळते. तुम्ही म्हणाल, खुषनसीब आहात! वेगवेगळे पदार्थ खायला मिळत असतील!. तुमचा काही गैरसमज होण्याआधीच सांगून टाकतो. चमचमीत पदार्थ तर राहीले दूरच, पण नुसता डाळभात जरी मिळाला तरी खूप अशी स्थिती असते. (मिपावर चमचमीत पाककृतींचे फोटो असतात हे एक बरे आहे!) टी व्ही वर इतक्या पाककृती दाखवतात, त्यातली नेमकी कोणती करायची ह्याचेच डीसीजन बीबीला घेता येत नाही.

अमराठी मुलखात अस्सल मराठी बालनाट्य

लेखक विसुनाना यांनी मंगळवार, 10/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हैदराबाद: येथील 'रंगधारा' या नाट्यसंस्थेच्या वतीने दि. १२ मे २००८ पासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यात भाग घेणारी सर्व मुले अमराठी शाळेत शिकतात. त्यांना मराठी नीटसे बोलताही येत नाही. कारण घराबाहेर (क्वचित घरातही) असलेले अमराठी वातावरण. (मराठी वाचण्याची तर बातच सोडा. ) परंतु तरीही ती ८ ते १३ वर्षे वयाची मुले एक अस्सल मराठी बालनाट्य सादर करणार आहेत. ते आहे -"राजकन्येची बाहुली".

शिवस्तुती

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 10/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अति शितल मृदू शांत चंद्र्मा तो ललाटी जटी जया उगम पावे जन्हवी पुण्यदाती लेपुन तनू भस्मा स्वात्मनंदा विराजी नमन तव करीतो शंकरा पुण्यराशी अणू रणू व्यापणारी लोचने तीन दिव्य करी धरी ड्मरू आणि त्रिशुळ भव्य अति धवल दिव्य कांति तेजसी ती प्रकाशी नमन तव करीतो शंकरा पुण्यराशी अर्धांगी आदी शक्ती वाम अंगास ज्याच्या जगत वंद्य पुत्र गणपती स्कंदराजा देखणा करी प्रपंचा शिव विरक्त योगी नमन तव करीतो शंकरा पुण्यश्लोकी अविरत जपी रामा भक्त श्रेष्ठा दयाळा शरण तव येता उद्ध्ररसी कृपाळा सहज तरूनी जाइ प्राथ्रितो जो शिवाला नमन तव करीतो शंकरा विश्वनाथा नृत्यनिपुण नटराजा मोहसी तू जगाला तांडव परि करीता विश्व जाते लयाला क
Taxonomy upgrade extras

रेखाटने (स्केचेस)

लेखक इनोबा म्हणे यांनी मंगळवार, 10/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माझी काही जुनी रेखाटने... माध्यमः बॉन्ड पेपर, २ बी. पेन्सील व शेडींग पावडर

रुदाली - गझल ...

लेखक suralesandip यांनी सोमवार, 09/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणी कोठून आली ही वावटळ वाळवंटी स्वैर झाली ही वावटळ का फ़ुलांनी सजविले खोटेच मजला भावली मज आज आली ही वावटळ वादळाने बांधली कधिची सोयरी वीज बनुनी आज व्याली ही वावटळ आजही होते इरादे साधेच रे सांडली का आज प्याली ही वावटळ नेहमी तू भग्न, आता का रंगली रंग माझे आज ल्याली ही वावटळ 'दीप' विझला, थांबला झंझावात ही आज का झाली 'रुदाली' ही वावटळ --शब्दसखा! रुदाली म्हणजे, एखाद्याच्या मृत्युवर पैसे देउन रडण्यासाठी बोलवीलेली स्त्री .

(येऊ कसा तुमच्यात मी)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 09/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
योगेश वैद्य यांची 'येऊ कसा तुमच्यात मी' ही कैफियत ऐकली आणि एकदम वेगळीच तक्रार डोक्यात रुंजी घालून गेली! ;) घालू कसा शर्टास मी? चालू कसा रस्त्यात मी? तन भारी माझे मला, मावेन का प्यांटीत मी? आरशात मावे न मी जाऊ कुठे, जाऊ कसा? संपेचना हे दोंद, का एवढा बहरात मी? आवळून पट्ट्यास ह्या पोटास ना जावू दिले एवढे जमते मला, आहे तसा निष्णात मी वाटे किती, भेटू तुला, सांगू तुला, का मी असा? पोट येते आधी जरासे आणि त्या पश्चात मी 'काटे' जरी मी मोडले ना थांबले खाणे तरी भेट घ्याया येत होतो अडकलो 'केकात' मी चतुरंग

तुला माहित आहे ?

लेखक शितल यांनी सोमवार, 09/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तुला माहित आहे तु कधी गोड दिसायचीस मी तुझ्याकडे पाहिल्यावर तु हळुच लाजायचीस आणि लाजुन हसल्यावर गोडच गोड दिसायचीस !! तुला माहित आहे तु कधी रूसायचीस तुला मी नकटे म्ह॑टल्यावर तु गाल फुगवुन रूसायचीस !! तुला माहित आहे तु कधी हसायचीस तुला टपोर्‍या मोगर्‍याचा गजरा दिला की तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !! तुला माहित आहे तु कधी जळायचीस तुझ्या मैत्रिणीला मी गाडीवरून घरी सोडायचो तेव्हा तु जळुन जळुन जायचीस !! तुला माहित आहे तु कधी भाव खायचीस तुला कोणी प्रपोज केले की तु माझ्या बरोबर ए॑गेज आहे असे सा॑गुन जायचीस आणि मग माझा भाव वाढवुन जायचीस !!
Taxonomy upgrade extras

म. टा. मधे सुरु झालेले नवीन सदर , सेक्स न्यूज : नवं सेग्मेंट

लेखक शरुबाबा यांनी सोमवार, 09/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
म. टा. मधे सुरु झालेले नवीन सदर सेक्स न्यूज : नवं सेग्मेंट http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/3103033.cms आपली प्रतीक्रीया ?

एस एम एस

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 09/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मला आलेला एक एस एम एस. रिमझीम पावसात तुला वाटत असेल चिंब भिजावे..... पाणी उडवत..गाणी गाताना... कोणी खास भेटावे.... हो ना ?..... अरे हो बोल ना ...लाजायचे काय त्यात?........ प्रत्येक बेडकाला असेच वाटत असते..... तुम्हाला आलेले धमाल एस एम एस....लिहा या इथे. काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल .

बेळगावी मांडे

लेखक अजय जोशी यांनी सोमवार, 09/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमच मी बेळगावात गेलो. एका खानावळीत (फारशी वळवळ नव्हती.तशी ती रिकामीच होती) गेलो. बाके नव्हती. कसाबसा खाली बसलो. ओथंबलेला (चारी बाजूने) आचारी एकदम म्हणाला, "मांडेऽऽ". मला कळेचना. नेमकी काय चूक झाली. पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ". "असं होय..", म्हणून मी मांडी घालून बसलो. तो पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ ए ऽऽऽऽ". मला वाटले बेळगावात सेल्फ सर्विस असावी. म्हणून मी स्वतःच उठून ताट-वाटी वगैरे घेतले. तो पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ ए ऽऽऽऽ". यावेळी इतक्या जोरात म्हणाला की, मी घाबरून काहीतरी अर्थ लावून ताट वगैरे सर्व मांडीवर ठेवले.