संडे स्पेशल (खव्याच्या पोळ्या)
खव्याच्या पोळ्या
साहित्यः
१/२ किलो खवा
२ वाट्या कणिक, कणिक भाजायला ३ टे.स्पून तूप
२ मोठे चमचे खसखस
७-८ वेलदोड्याची पूड
४ वाट्या पिठीसाखर
४ वाट्या कणिक, १ चिमूट मीठ
१ वाटी मैदा
१ वाटी बारीक रवा
१२ टे.स्पून तेल
तांदुळाची पिठी
१.प्रथम कढईत खवा गुलाबी रंगावर भाजावा.
२.२ वाट्या कणिक तुपावर खमंग भाजावी.
३.खसखस भाजून कुटून घ्यावी.
४.वरील सर्व,पिठीसाखर,वेलदोडा पूड घालून चांगले मळावे.
५.कणिक, मैदा,बारीक रवा तेलाचे कडकडीत मोहन घालून भिजवणे,(फार घट्ट नको). २ तास कणिक भिजल्यावर मळून घ्यावी.
६.कणकेचा लिंबाएवढा गोळा घेऊन, हाताने वाटी करून त्यात तेवढाच खव्याच्या सारणाचा गोळा त्यात भरून तोंड बंद करावे.
७.तांदुळाच्या पिठीवर हलक्या हाताने पोळी लाटून तव्यावर मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजावी.
टीपः
१.गुळाच्या पोळीप्रमाणे केली तरी चालते.( दोन पार्या करून).
२.खवा मंद आचेवर भाजल्यावर कोमट असताना हाताने गाठी मोडून मळून घ्यावा. गार झाल्यावर खव्यात गाठी होतात.या गाठी मोडल्याच नाहीतर खवा पुरण यंत्रातून काढून घ्यावा. नाहीतर पोळी फुटते.
३.सारण भरपूर गोड हवे.
४.खव्याच्या सारणात कणिके ऐवजी तांदुळाची पिठी वापरतात.
४.वरील साहित्यात १८ ते २० पोळ्या मध्यम आकाराच्या होतात.
वाचने
7388
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
छळ!
In reply to छळ! by विसोबा खेचर
अहो
मस्त
दिल खुश हुआ .
In reply to दिल खुश हुआ . by शितल
शितल,
In reply to शितल, by स्वाती राजेश
घरगुती खवा...
In reply to शितल, by स्वाती राजेश
मी
केळकर,
वा..
उत्तम कृती!
अरे व्वा...
खवा