Skip to main content

बुटरमिल्श कुकन

Published on सोमवार, 16/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
बुटर मिल्श कुकन म्हणजे ताकातला केक. साहित्य-२ कप ताक,१.५ कप साखर,४ कप मैदा,१ चिमूट मीठ, ३ अंडी,५ ते ६ चहाचे चमचे बेकिंग पावडर,२ चमचे वॅनिला अर्क, १ लिंबाचा रस+१/२ लिंबाची किसलेली साल,२०० ग्राम बदाम तुकडा,१५० ते २०० मिली अन व्हिप्ड क्रिम कृती- मैदा+मीठ+बेकिंग पावडर एकत्र करणे. त्यात अंडी व ताक घालणे , साखर घालणे आणि चमच्याने सारखे करून एकजीव मिश्रण तयार करणे.

बुकोव्स्की यांच्या एका कवितेचा अनुवाद

Published on सोमवार, 16/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
दंभकुठार यांच्या मुळे एक इंग्रजी कविता वाचायला मिळाली : An Almost Made Up Poem: see you drinking at a fountain with tiny blue hands, no, your hands are not tiny they are small, and the fountain is in France where you wrote me that last letter and I answered and never heard from you again. you used to write insane poems about ANGELS AND GOD, all in upper case, and you knew famous artists and most of them were your lovers, and I wrote back, it’ all right, go ahead, enter their lives, I’ not jealous because we’ never met.
Taxonomy upgrade extras

शिवराज्याभिषेक-३३४ वा वर्धापन दिन !

Published on सोमवार, 16/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
"आज सकाळपासूनच आपला "बा" लंय जोमांत हाय !" असं मनांत येताच बजाबा आपल्या बापाला म्हणजे श्रीपतीला म्हणाला,"आंज लगीन घाई लागलिया जनू बा तुंज्या मांगं?काई इशेस?" श्रीपती आपल्या कल्ल्यापर्यंत पोचलेल्या आकडेबाज मिशीवर पालथा हात फिरवंत म्हणाला,"आरं , काल बाजारला ग्येलो व्हतो तवाधरंनंच मांजा जीव आबाळायेवढा जांलाय बग !आरं , आपला धनी 'शिवाजी राजा आता दोन रोजांतच आबिषेक करुन घ्येत परत्यक्षात राजा हुनार हाय' अशी खबंर दिली बग सवता हंबीरमामा मोहित्यानं मला ! आन् त्ये आईकल्यापासनं मांजं काळीज सुपायेवढं जांलया बग !

कवितेच्या कवितेची लावणी....

Published on रवीवार, 15/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
रेशमाच्या रेषांनी, निळ्या निळ्या शाईनी, टाकोटाक कशिदा मी काढीला, नाक नका मुरडू माझ्या कवितेला..|| नवी कोरी कविता लाखमोलाची भरली मी नक्षी यमका-वॄत्ताची, गुंफीयले अलंकार ,अलंकार जोडीला..|| नाक नका मुरडू... लिहीत होतो कागदावर मी जोषात असा जोषात.. अवचित आली माझ्या मनात की मनात.. कुणी म्हणे प्रतिभा , कुणी कवीकल्पना..|| नाक नका मुरडू... भीड नाही ठेवली टीकाकारांची, मुरवत ना राखली सोम्या-गोम्यांची, कुणी माझ्या कवितेला छान का नं म्हणीना..|| नाक नका मुरडू...
Taxonomy upgrade extras

शेअर बाजार

लेखक जयन्त
Published on रवीवार, 15/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
मीसळ्-पाव वर सद्दया शेअर बाजारावर कोणीच चर्चा करत नाही का बरे?

गुर्रुनाथ नाईक व बाबुराव अर्नाळ रांची

लेखक नाखु
Published on रवीवार, 15/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
क्रुपया गुर्रुनाथ नाईक व बाबुराव अर्नाळ रांची कादंबरि पुस्तके याबद्द्ल काहि माहीती आहे काय.. मला त्यांच्या "काळा पहाड कथा" "हर्शवर्धन कथा" विशेष भावल्या.. आपल्यापॅकी वाचक्/संग्राहक आहात काय?

पुस्तकाची ओळख... "असे पेशंट , अशी प्रॅक्टीस...".. लेखक : डॉ : प्रफुल्ल दाढे

Published on रवीवार, 15/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
पुस्तकाचे नाव... : असे पेशंट, अशी प्रॅक्टिस आणि ऍलर्जी एक इष्टापत्ती प्रकाशक : अक्षयविद्या प्रकाशन पृष्ठे : १६० मूल्य : १२५ रु. लेखक डॉ : प्रफुल्ल दाढे लेखक एम.बी.बी.एस. आहेत ...ते अडतीस वर्षे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असून त्यांनी दोन वर्षे सरकारी नोकरी केली आणि नंतर स्वतंत्र व्यवसाय चालू केला. हे पुस्तक म्हणजे व्यवसाय करताना डॉक्टरांना आलेल्या पेशंटची स्वभाववैशिष्ट्ये दाखवणारं अनेक भल्याबुर्‍या काही विनोदी अनुभवांचे एकत्रीकरण आहे...

आमची एक अती sssssssप्रकाशित कविता..

Published on शनीवार, 14/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
काही "लोकं" (अनुस्वार विसरु नका...) जनसामान्य किंवा मागासलेल्या विचारांचे... काहीही म्हणा ..भुवया उंचावतील्..पण लक्ष न देणे... ही कविता "बॉम्बे" मधल्या गाण्याच्या चालीवर म्हणावी.. चव चांगली लागते...
Taxonomy upgrade extras

सुहास शिरवळकर

लेखक नन्या
Published on शनीवार, 14/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रख्यात लेखक दिवगन्त सुहास शिरवळकर याचे मानसपुत्र मन्दार पत्वर्धन आनी फीरोज ईरानी या विषयी माहीती आहे का? मी.पा. करानो अशुधलेखना बद्दल माफी असावी.