आनंदघन यांचे राजवाड्यांचे गाव वाचले आणि आमची म्हैसूर ट्रीप आठवली.त्यावेळी आम्ही एका गेस्ट हाऊस मध्ये राहिलो असताना तेथल्या खानसाम्याने फरसबीची इतकी झक्कास भाजी केली होती की त्याच्याकडून रेसिपी घेतल्याशिवाय राहवले नाही.तीच पाकृ तुम्हाला सांगत आहे.
साहित्य- २५० ग्राम फरसबी,१ मध्यम कांदा, १/२ वाटी ओले खोबरे,२ सुक्या लाल मिरच्या,कढीलिंबाची ४,५ पाने,१/२ चमचा उडीदडाळ,फोडणीचे सामान,तेल,मीठ चवीनुसार,साखर १ चहाचा चमचा,कोथिंबिर
कृती- कांदा चौकोनी चिरा,फरसबी चौकोनी चिरा.१ टेबलस्पून तेलात फोडणी करा.त्यात कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ,लाल सुक्या मिरच्या घाला व परता.कांदा घाला व परता.खोबरे घाला व परता.झाकण ठे