९६कुळी मराठा आडनावांच्या निश्चितीत मदत हवी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
21 Jun 2014 - 8:48 pm
गाभा: 

*या धागा लेखातील प्रतिसादांना खात्रीशीर माहितीची दुजोर्‍यांची गरज असते. जस जशी माहिती लागेल तसे प्रतिसादात विनंती/प्रश्न लिहिली असते. धागा लेखाचे पहीले शीर्षक खात्रीशीर माहिती सांगा असे होते. ज्या पद्धतीची माहिती लागेल तसे शीर्षक बदलले जाते. आपण सध्या विनंती केलेल्या प्रतिसादास उत्तर देऊ शकता तसेच मागील विनंत्या अभ्यासून शक्य असल्यास त्याबद्दलही माहिती देऊ शकता. सध्या विचारलेल्या प्रश्नासाठी शेवटच्या प्रतिसादापाशी जावे.

विकिपीडियावर लिहिणारे बहुतांश लोक ऑनलाईन उपलब्ध माहितीवर अवलंबून असतात. बर्‍याचदा आपण खात्रीशीर समजतो अश्या वृत्त माध्यमात अथवा पुस्तकातही विवीध कारणाने चुका असतात त्या जशाच्या तशा विकिपीडियावरही बर्‍याचदा संदर्भासहीतही येतात. (याच एक महत्वाच कारण म्हणजे वृत्तमाध्यमाच्या प्रतिनिधींनी आणि संपादकांनी देत असलेल्या सर्व माहितीस दुजोरा घेणे खात्री करणे गरजेचे असते. त्यातील सर्वच तफावत नेहमी लक्षात येतेच असे नाही तरीही काही तफावत असल्याचे विवीध कारणांनी विकिपीडियात चटकन जाणवते. विकिपीडियाच एक वैशीष्ट्य म्हणजे माहितीतील तफावतीकडे सहज लक्ष जाते. दोन वेगवेगळ्या स्रोतात वेगवेगळी माहिती असेल तर ती चटकन लक्षात येण्याचा संभव असतो बर्‍याचदा वाचकांना त्यांनी पुर्वी वाचलेल्या माहितीशी माहिती सुसंगत नसल्याचे लक्षात येते.

* अशीच एक लक्षात आलेली तफावत म्हणजे "श्रीकांत मोघे यांनी एका मुलाखतीत सुधीर हे त्यांचे मोठे बंधू असे म्हटल्याचे आठवते. पण जन्म तारखांवरून त्याउलट असल्याचे दिसते आहे. दोघांचे थोरलेधाकटेपण तपासून पहावयास हवे " असा संदेश मराठी विकिपीडियाच्या चर्चा पानावर आला आहे. या तथ्याबद्दल खात्रीशीर संदर्भासहीत माहिती आणि दुजोरा हवा आहे.

* कोणती तारीख (काळ) बरोबर ते खात्रीशीर सांगा
असाच प्रकार मोठ्या प्रमाणावर तारखांबद्दल होत असतो. शंका वाटणार्‍या ओळीत सर्व साधारणतः {{काळ सुसंगतता ?}} हा साचा लावण्याची प्रथा आहे त्याचे वर्गीकरण वर्ग:काळ सुसंगतता साशंकता पानावर पाहण्यास मिळते. आता पर्यंत जवळपास तीस एक तारखांबद्दलतरी साशंकाता व्यक्त केली गेली आहे त्यातील काही लेखांची नावे पुढील प्रमाणे

सुदर्शन अग्रवाल
मार्टी अह्तीसारी

एच.एच. आस्क्विथ

हेलन केलर

गोविंद बाबाजी जोशी

चार्ल्स पहिला, इंग्लंड
चार्ल्स बॅबेज
पार्क चुंग-ही

सेलिना जेटली
जॉन डीफेनबेकर
जोहान क्लोएट

ताओकुआंग

दत्तात्रेय जोशी मंगळवेढेकर
दिगंबर बाळकृष्ण मोकाशी
चर्चा:दिगंबर बाळकृष्ण मोकाशी
श्रीनिवास हरि दीक्षित

योहान सेबास्टियन बाख
बाबक खुर्रामुद्दिन
ओटो फॉन बिस्मार्क

रिकार्दो मार्तिनेली
राणी मुखर्जी
युक्ता मूखी

राबिया बसरी
रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल

लालू प्रसाद यादव
लुडविग फान बीथोव्हेन

वासुदेव रामचंद्र भट

शंकर दयाळ शर्मा
मोशे शॅरेड
शोले (चित्रपट)
चर्चा:श्रीनिवास हरि दीक्षित

उपरोक्त लेख विषयांबद्दल तुमच्या कडे खात्रीशीर माहिती असल्यास वर्ग:काळ सुसंगतता साशंकता या दुव्यावरून जाऊन शंका व्यक्त केला गेलेला तारखा आणि काळ तपासून देण्यात मराठी विकिपीडियास साहाय्य हवे असते. (चुकीच्या तारखा येथे लिहिल्या जाऊ नयेत म्हणून ती माहिती येथे लिहिली नाही. मराठी विकिपीडियावरील संबंधीत लेखात जाऊनच पाहणे श्रेयस्कर असेल.)

अशा तारखांबद्दल/तथ्यांबद्दल या धाग्यावर चर्चा केल्यास दुजोरा मिळणे सोपे जाईल या आशेने हा धागा काढला आहे. कृपया (शक्य तेवढे) संदर्भासहीत खात्रीकरून माहिती द्यावी. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादांचे स्वागत असेल.

*आपले प्रतिसाद मराठी विकिसाठी असल्यामुळे नित्याप्रमाणे प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.

* या धाग्याचा उद्देश सामाजिक-राजकीय विवाद्य विषय हाताळण्याचा नसल्या मुळे सामाजिक-राजकीयदृष्ट्या विवाद्य विषयांतरे टाळावीत ही नम्र विनंती आहे.

*आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

प्रतिक्रिया

पुण्याचे वटवाघूळ's picture

22 Jun 2014 - 5:35 pm | पुण्याचे वटवाघूळ

स्वतः माहितगारच खात्रीशीर माहिती मागत आहेत? :)

माहितगार's picture

23 Jun 2014 - 9:20 am | माहितगार

:) 'ज्याला स्वतःला काय माहित नसतं, ते माहित असतं, अन ते माहित करून घेण्याची आणि देण्याची इच्छा असते ', ही माहितगार असण्याची पहिली अट ;) एका विकिपीडिया बन्धू प्रकल्पातील आमची सही He who knows ,wants to know and and loves to keep others informed अशी आहे. धन्यवाद.

माहीतगारभौ, एक प्रश्न. वर दि. बा. मोकाशींचा उल्लेख आहे. त्यांचंच उदाहरण घेऊन विचारतो.

मोकाशींची कन्या माझ्या परिचयाची आहे. तिला विचारून समजा मी "दि. बा. मोकाशी डावखुरे होते आणि त्यांना आमलेटला श्रीखंड लावून खायला आवडे**" अशी विकीलेखात भर घातली, तर
- ही माहिती जवळच्या नात्यातल्या व्यक्तीने दिली असल्याने चुकीची असण्याची शक्यता कमी आहे
- पण मौखिक माहिती हा विकीसाठी योग्य संदर्भ असू शकत नाही (असू नये)

सबब ही माहिती विकीत घालता येणार नाही.

तर संदर्भ कसे असावेत या बंदिस्त चौकटीमुळे महत्त्वाच्या माहितीला विकीपीडिया मुकला, असा त्याचा अर्थ होतो का?

______________________________
**असं काही नसावं पण उदाहरणादाखल

चांगला प्रश्न विचारलात. उत्तर जरा लांबतय (संक्षीप्त वाचना साठी काही वाक्ये ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे) पण मला विकिपीडियावरील साहाय्यपानांमध्ये आंतर्भूत करता येत म्हणून सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न असतो.

ही माहिती जवळच्या नात्यातल्या व्यक्तीने दिली असल्याने चुकीची असण्याची शक्यता कमी आहे - पण मौखिक माहिती हा विकीसाठी योग्य संदर्भ असू शकत नाही (असू नये).....

जवळच्याच व्यक्तीने नव्हे तर त्याच व्यक्तीने दिलेली माहितीही चुकीची असू शकते, तीही पडताळली (क्रॉसचेक केली) जावयास हवीच. याचा अनुभव (धडा) पत्रकारांना देण्यासाठी अमोल पालेकरांनी एक किस्सा घडवला (मि.पा. दुवा). निवडणूका अ‍ॅफिडेव्हीट्स मध्ये शैक्षणिक पात्रते विषयी दिलेल्या माहितीतील केंद्रीय मंत्री महोदयांनी केलेल्या त्रुटी, हे तर सगळ्यात अलिकडचे उदाहरण.

कोणत्याही व्यक्तीस एकाच व्ह्यूमध्ये प्रीझमच्या सर्व बाजू दिसणे अवघड असते. व्यक्ती आणि प्रसंग यांच आकलन प्रत्येक व्यक्ती आपापल्या कुवतीने/मर्यादेत करत असू शकते, बॅटमनच्या बॅटवर येणारा बॉल शेवटी बॅटमनला कसा दिसला/अनुभवला हे त्या बॅटमनच्या अँगल मधूनच दिसत असते, इतर सर्वांचे केवळ तर्क असतात इतर सर्वांच्या व्ह्यू(अँगल) मध्ये त्रुटी राहतेच. ड्राव्हींगसीट वर बसलेल्याच दृश्य शेजारच्या व्यक्तीलाही जसंच्या तस दिसत नाही. वर म्हटल्या प्रमाणे व्यक्ती स्वतःही वस्तुस्थितीचा विपर्यास करत असू शकतेच. घरी दर दोन मिनीटांनी चहा घेणारी व्यक्ती, मी चहा घेतच नाही किंवा मी हल्ली चहा सोडलाय, आज उपवास आहे अशी लोणकढी मारत असू शकते किंवा बाहेर दारू घेऊन घरी मात्र मी दारू कधी घेतच नाही म्हणू शकते. अपघात झाल्यानंतर अपघातास कारणीभूत सर्वच व्यक्ती सहसा दोष नाकारतात पण अपघात तर झालेला असतो. त्यामुळे अपघात झाला हे तथ्य नोंदवण सोप असत अपघात का झाला याच अंतीम सत्य कदाचीत कुणालाच कधीच माहिती होणार नाही. अपघात घडताना उपस्थित व्यक्ती तिसर्‍याच दिशेने पाहत असलीतरी अपघातस्थळावर अनुपस्थित व्यक्तीपेक्षा अपघातस्थळावर उपस्थित व्यक्तीवर अधिक विश्वास ठेवतो एवढेच. हि सत्याची नव्हे सत्याची माहिती होण्यातली मर्यादा स्विकारूनच कोणत्याही संदर्भ असलेल्या अथवा संदर्भ नसलेल्या माहिती कडे पाहिलेले चांगले.

अपघाताची माहिती घेणारा पत्रकार मौखीक माहितीवरच अवलंबून असतो. फक्त एकाच व्यक्तीकडून घेतलेल्या माहितीवर अवलंबून न राहता अधिक व्यक्तींकडून माहिती घेऊन वृत्तांकन करणे अभिप्रेत असते. एकदा वृत्त प्रकाशित झाल्यानंतर वृत्तांकनात त्रुटी असतील तर काही वाचक निदर्शनास आणून देतील, इतर वृत्तसंस्था च्या वार्तापत्रात कदाचीत वेगळी तथ्य पुढे येतील. कोर्टात साक्षीदारांची शहानिशा वकील मंडळी त्यांच्या पद्धतीने करू शकतात (आणि तिथेही साक्षीदार उलटू शकतात). ज्ञानकोशात लेखन करताना वृत्तपत्रातील वार्तांकने ते न्यायालयाचा निर्णय असे जेवढे स्रोत उपलब्ध होतील तेवढ्यांचे संदर्भ देऊन समतोल लेखन करण्याचा प्रयत्न असतो. वेगवेगळ्या स्रोतांनी दिलेल्या माहितीत तफावत येत असेल तर तफावत शोधण्याचा आपल्या मर्यादीत साधनातून प्रयत्न करणे आणि तफावत स्पष्ट न झाल्यास माहितीतील तफावत जशीच्या तशी नोंदवणे ज्ञानकोशीय लेखकाने करावयास हवे.

मौखीक माहितीवर अवलंबून ज्ञानकोशीय लेखन केले जाऊ नये हे खरेच पण मौखीक माहितीमुळे उपलब्ध स्रोतातील संदर्भातील माहितीत कमतरता तर नाहीना हे शोधण्याची प्रेरणा मिळू शकते. मौखीक माहिती प्रथम माबो अथवा मिपा सारख्या संस्थळावर आली (वृत्तपत्रे प्रकाशित पुस्तके इत्यादी माध्यमातून) अनेक वाचकांच्या नजरे खालून गेली त्या माहितीच्या अचूकते बद्दल उहापोह झाला की ज्ञानकोशासाठी या माहितीचे संदर्भमुल्य वाढू लागते. संदर्भमुल्य जेवढे चांगले तेवढी माहितीची विश्वासार्हता वाढते हे जेवढे महत्वाचे तेवढेच, केवळ संदर्भमुल्याने कोणतीही माहिती अंतीम सत्य म्हणून धरून न चालण्याचे भानही महत्वाचे असते हे या निमीत्ताने नमुद करावेसे वाटते.

तर संदर्भ कसे असावेत या बंदिस्त चौकटीमुळे महत्त्वाच्या माहितीला विकीपीडिया मुकला, असा त्याचा अर्थ होतो का?

संदर्भ कसे असावेत या चौकटीमुळे ज्ञानकोश माहितीपासून मुकला असे होऊ शकतेच. ज्ञानकोश माहितीस विश्वासार्हता प्राप्त होण्याच्या माहितीचक्रातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो पण ज्ञानकोशकारांना आणि ज्ञानकोश वाचकांना आपण अंतीम सत्य मांडत अथवा वाचत नाही आहोत हे भान असले म्हणजे, ज्ञानकोशांची जी मर्यादा आहे ती मोकळ्या मनाने स्विकारणे सोपे जाते.

वस्तुनिष्ठ नोंदी ठेवण्याच्या संस्कृतीत आपण भारतीय लोक पाश्चात्यांच्या तुलनेत बर्‍यापैकी मागे पडतो ग्रामीण विभाग तर अजून मागे पडतात, मौखीक गोष्टींवर अधीक अवलंबून राहतो; त्यात अनेक माननीयांच्या प्रसिद्धी पराङमुखतेची भर पडते. मग माहितीचे पुरेसे स्रोतच मिळत माहीत माहिती पडताळणे अवघड जाते. त्यामुळे इंग्रजी विकिपीडिया संदर्भ संकेतांची अंमलबजावणी अधीक कठोर असूनही, इंग्रजी विकिपीडियातही कुणी चॅलेंज केल तर संदर्भ देण आवश्यक होत, पण कमी प्रमाणात का होईना मौखीक माहिती तेथेही अंशतः स्विकारली जातेच. बहुतेक भारतीय भाषी विकिपीडिया कमी अधिक प्रमाणात इंग्रजी विकिपीडियाची नक्कल करतात नाही असे नाही. मराठी विकिपीडियात सामाजिक-राजकीय हेतुपुरस्सरता नसेल या अटीवर ग्रामीण क्षेत्रातून येणार्‍या माहिती साठी आणि प्रसिद्धी पराङमुख संगित क्षेत्रातील मान्यवरांसाठी संदर्भांच्या बाबतीत अधिक लवचिकता दाखवावी असा माझा स्वतःचा आग्रह असतो.

आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

माहितगार's picture

4 Jul 2014 - 4:24 pm | माहितगार

चित्रपटसृष्टीशी निगडीत निवेदक आणि समिक्षण भाई भगत यांचे पूर्ण नाव हवे आहे.

दशमान पद्धतीत दहाचे धन घातांकाच्या किंमती सहस्र, लक्ष, अब्ज वगैरे वापरतात तशा दहाचे ऋण घातांकाच्या किंमतींना कोणते शब्द वापरतात?

मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर मागितली गेलेली माहिती

माहितगार's picture

27 Aug 2014 - 9:16 am | माहितगार

कान्होजी आंग्रे यांनी चिपळूण(दसपटी)येते कधी लढाईस गेले होते का? दसपटी चिपळूण तालुक्यातील कळकवणे गावाच्या माथ्यावर (बारवाई) बारराव कोल्हे यांचा नायनाट कोणत्या सरदारने केला

*

मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर मागितली गेलेली माहिती

माहितगार's picture

28 Sep 2014 - 12:37 pm | माहितगार

विनय कोरे आणि तात्यासाहेब कोरे

या दोन (राजकीय) व्यक्तींची पूर्ण नावे हवी आहेत

गुंड्या's picture

10 Feb 2016 - 6:01 pm | गुंड्या

विनय कोरे - विनय विलासराव कोरे
तात्यासाहेब कोरे - विश्वनाथ आण्णा कोरे
जाता जाता - तात्यासाहेब कोरे राजकारणाच्या फंदात फारसे पडले नाहीत.कदाचित म्हणूनच वारणा समूहाची निर्मिती करु शकले!

संत तुकारामांच्या मुलांची आणि मुलींची नावे माहित करून हवी आहेत.

Photolithography बद्दल इंग्रजी विकिपीडियावर लेखही आहे पण क्लिष्ट तांत्रिक भाषेमुळे काही समजला नाही. छायाशिलामुद्रण (Photolithography) म्हणजे काय ? ह्या बद्दल सर्वसामान्य मराठी वाचकास सहज समजेल अशी थोडक्यात ओळख करून हवी आहे.

धन्यवाद

माहितगार's picture

24 Jan 2016 - 9:43 pm | माहितगार

सुमती क्षेत्रमाडे (जन्म : इ.स. १९१५) या मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका . मराठी आणि इंग्रजी विकिपीडियात माहिती 'वर्तमान काळ' लिहून दिली आहे. मराठी विकिपीडियावर मृत्यूवर्ष नाही इंग्रजी विकिपीडियावर 7 March 1913 – 1997 अशी तारीख दिसते. याचा अर्थ मराठी आणि इंग्रजी विकिपीडियातील जन्म -मृत्यू ? विषयक नोंदी जुळत नाहीत. खात्रीशीर माहिती हवी आहे.

मराठी विकिपीडियावर एका नवागत सदस्याने अलिकडे खालील काही माहिती टाकली आहे. प्रथमदर्शनी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता सांशकीत वाटते -सद्यस्थितीत तरी खालील लेख वगळले जाण्याची शक्यता असू शकते- तरीही कुणास काही अधिक माहिती अथवा दुजोरा देणे शक्य असल्यास स्वागत असेल.

१)
"[[Kale taluka Karad|अजित अनंत देसाई]]- जन्म २३/६/१९६३ - यांनी बि.ए.एम्.एस्.पर्यंतचे शिक्षण घेतले असून ते शेतीचे गाढे अभ्यासक आहेत प्रगत तंत्रद्न्यानाचा वापर करून अधुनिक शेती करणारे प्रयोगशिल शेतकरी असा त्यांचा नावलौकीक आहे सांस्कृतीक वारसा जपताना सर्वसमावेषक विकास साधने ही त्यांच्या पुर्वजांपासून चालत अलेली परंपरा त्यांनी अखंडीत सुरू ठेवलेली आहे असे व्यक्तीमत्व [[Kale taluka Karad|काले व पंचक्रोशीतील]] सर्वमान्य नेतृत्व आहे."

२) पवार-पाटील घराणे कसबा बावडा

मराठी विकिपीडियावर आडनाव विषयक लेख असतात पण विशीष्ट घराण्याबद्दल लेख लिहिताना ज्ञानकोशीय उल्लेखनीयता आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून अधिक माहितीचे स्वागत असेल.

मराठी विकिपीडियावर शहाण्णव कुळी मराठा
नावाचा सहा वर्षांपेक्षा जुना लेख आहे. खरेतर मराठी विकिपीडिया लेखात (शक्यतो ससंदर्भ अथवा दुजोरा असलेली माहितीवर आधारीत) परिच्छेद लेखन करणे अभिप्रेत असते. तसे त्याही लेखात कुणी केले तर हवेच आहे.

या लेख पानावर सध्या परिच्छेद माहिती मजकुर काहीच नाही, केवळ कुळांची/ आडनावांची यादी आहे. कदाचित कुळांच्या संख्ये पेक्षा आडनावांची संख्या अधिक असेल, किंवा इतर काही कारणे असतील पण यादीतील कुळनावे/आडनावे आता पावेतो ५० च्यावर वेळा मागच्या पाचसात वर्षात बदलली गेली असतील म्हणजे ती यादी अजूनतरी स्थिर होत नाही आहे.

मराठा (जात) या लेखातून बहुधा हि यादी स्थानांतरीत केली तेव्हा यादीतील नाव यादी अशी होती (त्याआधी) सुद्धा आणि त्यानंतर या यादत सातत्याने बदल होत राहीले आहेत. यादीतील प्रत्येक केलेला फरक तपासून कोणकोणत्या आडनावांचे/कुळनावांचे क्लेम आहेत ते तपासून शक्य असल्यास यादीचे प्रमाणिकरण अथवा निश्चितीकरण कि ज्यात निश्चितपणाने असलेली नावे आणि आणि तेवढे निश्चितपणे सांगता येत नाही पण क्लेम आहे आणि दुजोरा आहे अशा पद्धतीने अद्ययावत कुणास करता आल्यास मराठी विकिपीडियावर शहाण्णव कुळी मराठा
या लेख पानास लेखन साहाय्याची गरज आहे.

या उठाठेवीचा उद्देश केवळ ज्ञानकोशीय आहे.