असं गं रक्तिम मुख तुझं
जसं मिटल्या लाजाळूचं पान ,
त्यावर टेचात चालणं गं
वळवी वैराग्याची मान !!
मीच थिटा वर्णू कसा
सृष्टीत तूच महान,
सुरमयी कटी सखे
तुझा कुमुदिनीचा वाण !!
एक पाचोळाच मी सखे
ज्याला कुठून देहभान ?
मन आलं दबकत चाखण्या
तुझे ओठ रंगले पान !!
बेहोष गंध तुझा तो
त्यात रेखीव कमान,
बेसावध तुझ्यात तू मात्र
भुंग्यांना त्याची जाण !!
कधी जाण हृदय हेही
खुपसे तुझ्यावर कुर्बान,
मला लाभावं माळण्या
वेणी गजरयाचा मान !!
नजरे नको प्रतारणा आता
तुला मनाचीच आण,
काय आहे गं सृष्टीत ?
समोर लावण्याची खाण !!
श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी,
(पलूस, सांगली)
हम्म.
रोचक
नक्की वाचणार.
In reply to नक्की वाचणार. by आदूबाळ
+१
प्लिपकार्ट आणि अमेझॉन वर तरी
In reply to प्लिपकार्ट आणि अमेझॉन वर तरी by मनिष
हं!
पुस्तक परिचय आवडला.
आभार
वाचेन हे पुस्तक.