✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बायकांचे संसारींग-माझा अनुभव

स
संजय क्षीरसागर यांनी
Wed, 06/25/2014 - 23:22  ·  लेख
लेख
पुरुषांचं स्ट्रायव्हिंग हा जसा तमाम स्त्रीवर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच बायकांचं संसारींग हा पण आहे. पण याकडे तमाम स्री वर्ग जाणूनबुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर स्त्री-पुरुष हे गेली हजारो वर्ष डांगडींग करत आले आहेत. महाभारतात नाही का, पाच पुरुष एकीशी लग्न करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या १००% स्त्रीयांना संसाराचे नियम हे दोन्हीकडून पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा. गेली दीडदशकं मी सगळीकडे माझी बायको घेवून जातोयं (अर्थात माझं संसारींग हा विषय परत कधीतरी), आणि या दीड दशकात मला जे जाणवलं आहे तेच सांगतो आहे. खरतरं लग्नाच्या ज्या अटी असतात त्या दोघांना सुरळीतपणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात. पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर नेमक्या वेळी मोडण्यासाठी असतात. यांना भलत्याच गोष्टींची एवढी घाई असते की त्या नवर्‍याचं प्रपोजल काय आहे याचा विचार न करता सरळ दुसराच विषय काढतात. विषय बदलत असताना धोक्याचा सिग्नल देणे, किंवा हातात हात घेऊन विचारपूस करणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता, पुढे काय वाढून ठेवलंय याचं नवर्‍यांना काही स्वप्न पडलेलं असतं का? की ही गेम बदलणार आहे म्हणून? यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातल्या काही दिव्यांगना संसार स्वत:च्या मालकी हक्काचा असल्यासारख्या वागतात. हळु बोलायचं तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ते सुद्धा मध्यरात्री किंवा मग एकदम काही डल्ला मारायच्या वेळी बोलतात. जशी यांना सावकाश बोलायला बंदीच केली आहे. तुम्ही कितीही सिग्नल द्या, यांना काहीही फरक पडत नाही. उपलब्ध सोयी आणि यांच्या डिमांडसमधे खंडीभर अंतर नक्कीच असतं. सगळं सरळ होत असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात आळी-पाळीवाल्या, मूड-नाहीवाल्या पण आल्या. आपण दोन्ही बाजुच्या सुखाला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसतं. दोन्हीकडची सोय आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणखी एक प्रकार म्हणजे नेमक्या वेळी भलत्याच विषयावर हुज्जत घालणे. अहो मान्य आहे आमचंही थोडं चुकलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण या गाडी जिथल्यातिथे थांबवणार. जरा म्हणून खाली उतरणार नाहीत आणि मागच्या प्रकरणांवरुन किंवा पुढच्या सुधारणांवरुन भांडत बसणार. यामुळे आपल्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी थांबून राहिल्या आहेत, आपण पुन्हा एकदा गैरसोय करुन ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. काम झाल्यावर मगं भांडाना अरे, कोण नाही म्हणतं? पण नाही, या तिथेच भांडणार. यात अजून भर टाकतात त्या, ज्यांना नातेवाईक आपल्यापुढे गेलेले चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर त्या संसार मोडतील, नवर्‍याला हार्ट-अ‍ॅटॅक देतील, पण त्या नातेवाईकांच्या गाडीच्या पुढे जातील. मी असं नाही म्हणत आहे, पुरुष गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी बायकाच आहेत. तो हॉर्नसुद्धा वाजवत नसतांना इतका गोंधळ घालतात की तो बिचारा गोंधळून जातो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
शिफारस
चौकशी
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6148 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

पॉर्न????

कपिलमुनी
गुरुवार, 06/26/2014 - 00:19 नवीन
हिट विकेट
  • Log in or register to post comments

हॉर्न म्हटलं असतं तर

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/26/2014 - 00:32 नवीन
आणखी गोंधळ झाला असता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

भारी जनलय ...

अर्धवटराव
गुरुवार, 06/26/2014 - 00:51 नवीन
आवडेश.
  • Log in or register to post comments

बाप्रे !!!

खटपट्या
गुरुवार, 06/26/2014 - 04:11 नवीन
बाप्रे !!!
  • Log in or register to post comments

पुढचा विषयः

एस
गुरुवार, 06/26/2014 - 08:03 नवीन
बायकोचे शॉपिंग आणि नवर्‍याचा अनुभव. चला, कोण करतंय?
  • Log in or register to post comments

अगदी खरं.

भाते
गुरुवार, 06/26/2014 - 09:33 नवीन
पुरुषांचे ड्रायव्हिंग/डायेटिंग आणि हा धागा वाचल्यावर माझ्याही मनात हाच विचार आला होता. मिपाच्या समुद्रात ऊडी मारून शोध घेतल्यावर हा मोती मिळाला. यासारखे चांगले धागे शोधुन वर काढल्यास आपल्या ज्ञानात बरीच भर पडेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अत्यंत विचारगर्भ धागा

चौकटराजा
गुरुवार, 06/26/2014 - 08:11 नवीन
असून अडचण व नसून खोळंबा याची प्रचिती रोज देणार्‍या "या" गंभीर विषयावर उत्तम प्रकाश टाकला आहे.
  • Log in or register to post comments

यावरुनच घर `ओळंब्यात' नाही

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/26/2014 - 10:29 नवीन
असा वाकप्रचार आला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अरारारा!

दिनेश सायगल
गुरुवार, 06/26/2014 - 11:32 नवीन
गाडी डिरेल झाली! signalman काय करत आहेत?
  • Log in or register to post comments

मस्तच...

ब़जरबट्टू
गुरुवार, 06/26/2014 - 11:39 नवीन
छान लिव्हलय.... :) बाकी पिरा, पैसा, व रेवतीताईशी सहमत.... :)) इन अडवान्स... म्हणजे संक्षी म्हंटल्यावर येथे जे काही होणार तेला पुर्ण अणूमोडन इन अडवान्स....
  • Log in or register to post comments

आई गं

दिपक.कुवेत
गुरुवार, 06/26/2014 - 12:59 नवीन
विडंबन एक से बढकर एक आहेत. "तसं बघितलं तर स्त्री-पुरुष हे गेली हजारो वर्ष डांगडींग करत आले आहेत" हे वाक्य तर जाम आवडुन गेलं आहे स्पेशली त्यातला तो डांगडींग शब्द.
  • Log in or register to post comments

=)) कचकून सहमत

बॅटमॅन
गुरुवार, 06/26/2014 - 18:56 नवीन
=)) =)) =)) कचकून सहमत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

कशाला तक्रारी करताय पळा लवकर

कंजूस
गुरुवार, 06/26/2014 - 19:19 नवीन
कशाला तक्रारी करताय पळा लवकर हिमालयात.
  • Log in or register to post comments

बायकांचं संसारींग सुधारलं तर

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/26/2014 - 20:11 नवीन
हिमालयात गेलेले संसारात परत येतील *acute*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अच्छा हे कारण आहे तर भ्रमराच्या रुणझुणीचे

लंबूटांग
गुरुवार, 06/26/2014 - 20:16 नवीन
धिस एक्स्प्लेन्स अ लॉट.
  • Log in or register to post comments

हॅ, हॅ, हॅ!!

संजय क्षीरसागर
Fri, 06/27/2014 - 00:02 नवीन
(अर्थात माझं संसारींग हा विषय परत कधीतरी)
....लक्षपूर्वक न वाचता प्रतिसादाची घाई (पुन्हा) नडली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

हॅ, हॅ, हॅ!!

लंबूटांग
Fri, 06/27/2014 - 01:38 नवीन
....विरोधाभासी लिहण्याची आणि सोयीस्करपणे दुर्लक्ष करायची, सवय (पुन्हा) नडली!
माझा अनुभव भलतचं सांगतो
पण ते सुद्धा मध्यरात्री किंवा मग एकदम काही डल्ला मारायच्या वेळी बोलतात.
इतरांच्या संसारींगचा अनुभव रात्री बेरात्री जागून घेतला म्हणायचा का? अरे हो तिथेही बायकोला घेऊन का? वैयक्तिक म्हणून नाही पण लेखात
गेली दीडदशकं मी सगळीकडे माझी बायको घेवून जातोयं
असे वाचले म्हणून विचारले. असो, विडंबन काही खास वाटले नाही, ठीक आहे. पुलेशु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ते विडंबन, प्रकाशित झालेल्या दुसर्‍या पोस्टला उत्तर आहे

संजय क्षीरसागर
Fri, 06/27/2014 - 02:48 नवीन
ती माझ्या संसाराची कहाणी असण्यापेक्षा जगाची कथा आहे. बहुतेक सर्व प्रतिसादकांना पोस्ट आवडलीये म्हणजे अर्थ पोहोचलायं. तुमच्या प्रतिसादातून वैयक्तिक निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न फसल्यानं तुम्ही नाराज झालात. सो आय डोंट केअर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

टुकार !

मदनबाण
Fri, 06/27/2014 - 07:10 नवीन
टुकार ! इतरांसाठी... डांगडींग असा नसुन डिंगडाँग असा आहे... { संदर्भ :- पाखरु गुजगोष्टी शब्दकोष} ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- मेघा रे मेघा रे... :- प्यासा सावन
  • Log in or register to post comments

तुमच्या नाराजीचं कारण कळलं नाही, पण काही हरकत नाही.

संजय क्षीरसागर
Fri, 06/27/2014 - 10:25 नवीन
बाय द वे, लेखनाच्या अषयाशी सुसंगत शब्द, डांगडींग असाच आहे (संदर्भ : तरुणाईची बोली भाषा). `डिंगडाँग' हा डोअरबेलचा आवाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

+१

मराठी कथालेखक
Fri, 06/27/2014 - 10:55 नवीन
सामान्य दर्जाचा फॉर्म्युलाबाज विडंबन लेख. असो. पुढील लेखनास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

विडंबनाचा दर्जा कच्च्या मालावर अवलंबून असतो

संजय क्षीरसागर
Fri, 06/27/2014 - 11:39 नवीन
त्याच्याशी एखादा रिलेट होईल, एखादा नाही. आपण निदान पिडलं तरी नाही कुणाला हे काय कमीये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा