आपला कान काचेचा असता तर केव्हाच फुटला असता. याचे कारण आपण घरात टीव्ही रेडीयो स्पीकर मोठ्या आवाजात लावतो. याचा आपल्याला कायमचा त्रास होऊ शकतो. जर आपल्याला ऐकायचे असेल तर दुसर्यांना त्रास होऊ नये एव्हढ्या लहान आवाजात लावावेत.
आपण गाड्यांचे हॉर्न ट्रॅफिक असल्यावर वाजवतो तसेच कारण नसताना पुढे सिग्नल लाल असतो आणि आपण हॉर्न वाजवतो. त्याचा लोकांना त्रास होतो.
लग्नाची वरात, दिवाळी, मिरवणूकीत आपण फटाके फोडतो, डीजे लावतो. त्याचा आपल्या कानांना त्रास होतो. आपल्या कानाचा पडदा नाजुक असल्यामुळे त्याला ईजा होऊ शकते आणि माणुस कायमचा बहिरा होऊ शकतो.
वाचने
19492
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
कीप ईट अप! उत्तम विषय आहेत
कीप ईट अप! उत्तम विषय आहेत तुझ्या डोक्यात, हळूहळू आणखी वेगळ्या विषयावर थोडं जास्त लिहायला सुरूवात कर.
+१
In reply to कीप ईट अप! उत्तम विषय आहेत by किसन शिंदे
सहमत.
किप ईट अप
In reply to कीप ईट अप! उत्तम विषय आहेत by किसन शिंदे
नक्की
विनाकारण होर्न वाजवल्यास दंड
विनाकारण होर्न वाजवल्यास दंड केला पाहिजे. पण असे करण्यासाठी पोलिस कमी पडतील अशी परिस्थिती आहे.
सद्विचारांचं लहान वय...
सद्विचारांचं लहान वय...
लहान वयातले सद्विचार...
==================
़़
धन्या,भाच्याला "छोटा रक्षक" हे आय.डी.नेम घ्यायला लाव! फटू कायतरीच वाटतय.
आयडी
In reply to सद्विचारांचं लहान वय... by अत्रुप्त आत्मा
नक्की
मस्त रे फटू
मस्त रे फटू
वल्ली मामा
In reply to मस्त रे फटू by प्रचेतस
आभारी आहे.
मामा तो मामा
भाचा पण कमी नाही.
खरच कर्णकर्कश वाजवणार्यांना दंडापेक्षाही जालीम उपाय केला पाहीजे.आणि सगळ्या लग्न्-तोरण्-(वाय झेड) डे मिरवणूकांवर काण्ठाळी ध्वनीभिंती/बोंबाट ढोल पथक असेल तर बंदी पाहीजे.फक्त संचलन असेल, न आवाज करता तर ठीक.
आत्मुदांना अनुमोदन.
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
इतर मिपाकरांच्या माहितीसाठी, हा छोटेखानी लेख माझ्या भाच्याने लिहिला आहे. दहा वर्षांचा असल्यामुळे तो मिपावरील सर्वात लहान लेखक आहे असे म्हणण्यास हरकत नाही. :)
वाह
In reply to धन्यवाद मंडळी. by धन्या
मिपावर स्वागत रे फटु :)
वर्ड ऑफ कॉशन : आयडी बदलुन चांगला आयडी घे रे ... एकदा आयडी चिकटला की तो पाठ सोडत नाही :)
+१
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
असेच म्हणतो. जरा चांगला आयडी घे. तूर्त त्याचे कै वाटणार नै, पण ५-६ वर्षांत वाटेल-बरंच काही वाटेल ;)
बॅटमॅन काका,मामा
In reply to +१ by बॅटमॅन
मी छोटा रक्षक हा आयडी घेतो.
प्रगो
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
मी छोटा रक्षक हा आयडी घेतो.
१० वर्षाच्या फटुचे अभिनंदन..
In reply to धन्यवाद मंडळी. by धन्या
१० वर्षाच्या फटुचे अभिनंदन.. धाग्याचा विषय, शुद्धलेखन वगैरे खासच.. बाकी वाचून आणि वयापरत्वे प्रगल्भता वाढेलच!!
वा!
वा!
सर्वांत लहान लेखक असूनही एकोळी धागा नै काढला हे सर्वांत जास्ती आवडलं. नैतर वय कितीही असलं तरी एकोळी काड्या टाकून पसार होणारे लोक पाहिले की फटूचं कौतुकच वाटतं. :) कीपिटप फटु!
+१
In reply to वा! by बॅटमॅन
+१
या वयात तेही मराठीत लिहितोय याचे कौतुक आहे. कीप इट अप! :)
त्याच्या शिक्षणाचे माध्यम
In reply to +१ by ऋषिकेश
त्याच्या शिक्षणाचे माध्यम मराठी आहे.
या निमिताने मला गमभनकार ओंकार जोशी यांचे आभार मानायचे आहेत. गमभन ही सुविधा त्यांनी ईतकी सुलभ बनवली आहे की अगदी मराठी माध्यमातून शिकणारा दहा वर्षांचा मुलगासुद्धा गमभन वापरुन आंतरजालावर मराठीतून आपले विचार व्यक्त करु शकतो.
त्याच्या शिक्षणाचे माध्यम
In reply to त्याच्या शिक्षणाचे माध्यम by धन्या
अरे वा! मग तर त्याच्या पालकांचेही कौतुक :)
+११११११११११११११
In reply to त्याच्या शिक्षणाचे माध्यम by ऋषिकेश
धन्या आणि ऋषिकेश दोघांशीही सहमत!!!!
सहमत.
'सर्वात लहान' लेखकाचे मिपावर स्वागत.
चांगले विचार मांडले आहेत. सहमत.
फटु, मिपावर स्वागत
फटु, मिपावर स्वागत :)
छान लिहिले आहेस. ध्वनी प्रदूषणाबाबत एकदम सहमत!
अजूनही लिही वेगळया वेगळ्या विषयांवर.
लेख
In reply to फटु, मिपावर स्वागत by यशोधरा
नक्की लिहीन.
फटु, मिपावर स्वागत
In reply to फटु, मिपावर स्वागत by यशोधरा
नक्की लिहीन
स्वागत !
बघा, बघा. (वयाने) लहान मिपाकर (पण) किती प्रगल्भ धागा काढताहेत ! कोण म्हणतो मिपाला (आणि पर्यायाने भारताला) भविष्य नाही ?! काही दिवसापूर्वीच्या कट्ट्यात चमक दिसली होतीच म्हणा ;)
नव्या नवयुवक मिपाकराचे स्वागत !
+१
In reply to स्वागत ! by डॉ सुहास म्हात्रे
छान रे फटू. अजून लिही या विषयावर.
रच्याकने तुझा आयडी जर 'धन्याचा भाचा' असाच ठेवला तर बेटर र्हाईल. काय म्हण्तोस? :-)
पाहा बुवा!
In reply to +१ by एस
त्यापेक्षा स्वतःचे नांवच आयडी म्हणून घेतले तर मामाच्या छायेतून लवकर बाहेर पडेल आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देईल.
करेक्ट
In reply to पाहा बुवा! by प्रभाकर पेठकर
त्याला काहीतरी मस्त आयडी घेवु दे मग धन्यालाच आयडी बदलालयला लावु "**** चा मामा " असा !! *biggrin*
ज्याम त्रास झालाय या
ज्याम त्रास झालाय या ध्वनीप्रदूषणाचा. जरा वेळ मिळाला की लिहिते ष्टोरी.
धन्या, फटु तुझाच आयडी होता ना
धन्या, फटु तुझाच आयडी होता ना रे?
बाकी भाच्याला छान एक्स्पोजर देत आहेस त्याबद्दल कौतुक. :)
ऐसैच लगा. १० वर्षाच्या मुलाचा
In reply to धन्या, फटु तुझाच आयडी होता ना by प्यारे१
ऐसैच लगा. १० वर्षाच्या मुलाचा बिल्ला क्रमांक ५७५?
म्हणजे वयाच्या तिसर्या
In reply to ऐसैच लगा. १० वर्षाच्या मुलाचा by अनुप ढेरे
म्हणजे वयाच्या तिसर्या चौथ्या वर्षापासून सदस्य असणं अपेक्षित आहे.
(कोण रे तो मानसिक वयाबद्दल बोलतोय? ;) )
फटू माझाच वापरात नसलेला आयडी
In reply to म्हणजे वयाच्या तिसर्या by प्यारे१
फटू माझाच वापरात नसलेला आयडी आहे. त्या आयडीचा मी डुआयडी म्हणून कधीच वापर केला नाही.
कुठल्या??
In reply to फटू माझाच वापरात नसलेला आयडी by धन्या
>>>>त्या आयडीचा....
ओके. मग कुठल्या आयडीचा वापर केला?
"धन्या"
In reply to कुठल्या?? by प्रभाकर पेठकर
"धन्या"
होय....
In reply to "धन्या" by गवि
माझ्या धनाजीराव वाकडे (आताचा धन्या हा आयडी) डुआयडी म्हणून वापरायचा माझा विचार होता. नव्हे तसा वापर मी सुरुही केला होता. मात्र मिपाकरांनी "धनाजीरावांना" "नाना चेंगटांचा" नवा अवतार समजायला सुरुवात केली.
याच दरम्यान मी धनाजीराव म्हणूनच पन्नास फक्त, वल्ली आणि इतरांना प्रत्यक्ष भेटलो. मग फटू आयडीचा वापर बंद करुन धनाजीराव वाकडे म्हणूनच लिहू लागलो.
यानिमिताने एक गोष्ट माझ्या नव्याने लक्षात आली, मी मिपावर सहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून आहे. :)
वयाच्या मानाने बरंच नीट
वयाच्या मानाने बरंच नीट लिहीलंयन्.
छान लिहितोस रे!
मिपावर स्वागत! तुला जे काही आवडेल ते लिहीत जा.
धन्या, इथल्या बाकी गोंधळाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही याची मात्र काळजी घे रे!
+१
लेकरु त्याच्या मामासारखंच व्यासंगिक आहे म्हणा की... काकणभर सरसच आहे म्हणा...
येउंदेत. लीमौजेटचा किस्सा वाचण्यास उत्सुक.
टीप-एका गाडीमागे वाचलेले वाक्य
माझी बाइक उडत नाही, हॉर्न वाजौला तरीही...
एक नंबर रे फटू! ये बात!
एक नंबर रे फटू! ये बात!
काहीतरी गोष्ट्बिष्ट लिही की राव.