चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा
मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा
येऊनिया न यावा माझा प्रयास कामी
नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा
ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा
एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा
एकी अशी असावी, निश्चय असा असावा
हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा
झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी
प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा
विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा
आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा
माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी
कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा
- अपूर्व ओक
मस्त लेख...
छान आहे .
ट्रेक मस्त झालेला दिसत आहे
कड्डक्क !
कड्डक्क !
शीर्षकाचा 'गदर - एक प्रेम कथा
ओहो!! तुम्ही आमच्या आधी गेला
खूपच थोडक्यात आवरलात लेख..
http://www.mumbaihikers.org/
good wrighting &enjoyful trek