Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 07/25/2014 - 14:35
महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी वाचून महाराष्ट्रदेशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा. मुख्य लेख वाचण्यासाठी "माऊस ची लेफ्ट क्लीक " आणि "डोळे" वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी ही डोळेच वापरावे लागतील. (आतापर्यंत ७ प्रतिसाद आले आहेत व एकही वाचण्यासारखा नाहीये .) http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtra-karnataka-border/articleshow/38989352.cms अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला बेळगाव यळ्ळुर वर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले मुख्यमंत्री, आपले राज्यपाल, आपले पोलिस अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर बेळगाव यळ्ळुरपासून सुरुवात होऊन इतर काही जिल्हेही एक-एक करून फुटतील व महाराष्ट्र म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली किमान दोन पक्ष अस्मिताधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. बेळगाव यळ्ळुर मध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने कन्नडिगां सारख्या देशद्रोह्यांना शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात! असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल! या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रनोबदांना बंगालीत पाठविली नाही आहेत. आपणही पाठवु नका! राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in जय हिंद! जय महाराष्ट्र ! जय पुणे ! जय हिंजवडी फेज १ ! जय आपलं क्युबिकल नंबर ! जय बेन्च ! आणि सर्वात महत्वाचे

जय मिसळपाव !!

  • Log in or register to post comments
  • 33628 views

प्रतिक्रिया

Submitted by बॅटमॅन on Fri, 08/01/2014 - 15:27

In reply to आज एका फोरमवर एका मुंबईच्या by धन्या

Permalink

बरं झालं मिर्च्या झोंबल्या ते

बरं झालं मिर्च्या झोंबल्या ते. हरामखोर लोक असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on गुरुवार, 07/31/2014 - 14:30

In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

तीन पिढ्या राहूनही स्थानिक

तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.
थोडी सुधारणा- स्थानिक भाषा मराठीच आहे. कन्नड लादली गेली आहे. असो. खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. कुठल्या सीमाभागाबद्दल बोलताय आपण? निपाणीत मराठी ८०% हून जास्त असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 07/31/2014 - 15:01

In reply to तीन पिढ्या राहूनही स्थानिक by यसवायजी

Permalink

तसे

सीमाभागात जे कोणी मराठी असतील त्यातील बहुतांशी लोकांना कन्नड येते असे म्हणतात.स्थानिक भाषा शिकायचीच नाही असा आग्रह धरणार्‍यांची संख्या खूप कमी असेल. होय ना? कन्न्ड लादली गेलीय म्हणजे काय? अरे राज्ये होवून ५० वर्षे उलटून गेली.मुंबईच्या गुजराती बांधवांनी किंवा नागपूरकरांनी 'आमच्यावर मराठी लादली' असे म्हणण्यासारखे आहे. .
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 08/01/2014 - 10:10

In reply to तसे by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

ओ आत्याबै

गुजराती लोक मुंबैत गुजरातमधून स्थलांतर करून आलेत. बेळगाव भागातल्यांचे तेच मूळ स्थान आहे. इवलूसा फरक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Fri, 08/01/2014 - 10:23

In reply to ओ आत्याबै by पैसा

Permalink

मुंबैत सगळेच तसे स्थलांतर

मुंबैत सगळेच तसे स्थलांतर करुन आलेत.. मराठी माणसं कोकणातून, प. महाराष्ट्रातून.. गुजराती, गुजरातमधून..इ.. मुंबै पहिल्यांदा फक्त इंग्रज, पारशी लोक आणि काही कोळी एवढेच होते.. स्थलांतर करुन आलेल्या गुजरात्यांच्या आता ४-५ पिढ्या मुंबैत राहिल्यात.. किती वर्ष स्थलांतरीत म्हणणार ?? बेळगावात बर्‍याच जुन्या लोकांना मराठी, कन्नड दोन्ही भाषा येतात.. अस्मितेचा प्रश्न करुन लढा देत रहायच की परिस्थितीचा स्वीकार करुन पुढे जायच हे महत्वाचं.. राज्यस्थापनेनंतर इतक्या वर्षांत पुढच्या पिढ्यांनी कामकाजापुरतं कन्नड शिकण नक्की शक्य आहे.. आणि इतर जीवनात मराठी वापरा ना तिथे कोण येत नाहिच आहे अडवायला..
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 08/01/2014 - 11:31

In reply to मुंबैत सगळेच तसे स्थलांतर by बाळ सप्रे

Permalink

ते बिचारे शिकतातच ना!

ते बिचारे कन्नड शिकतातच ना! तसे गुजराती लोकसुद्धा बर्‍यापैकी मराठी बोलतात. आता गुजराती/मराठी असा काही वाद आहे असं वाटत नाही. पण तिथल्या कानडी सरकारने सीमाभागात सगळे ऑफिसर्स कानडीच नेमायचे, सगळे बोर्ड कानडीत लावायचे असली दंडेली करू नये ना! बेळगावातले दुकानदार सांगतात की मराठी दुकानदारांना हे कानडी ऑफिसर्स भयंकर त्रास देतात. सगळे सरकारी बोर्ड त्रैभाषिक असले पाहिजेत असा नियम असताना सीमाभागात सगळे रस्त्यांचे बोर्ड्स कानडीच आहेत. अगदी राष्ट्रीय हमरस्त्यावरसुद्धा. पोलिसांना मराठी/हिंदीत विचारलं तर कानडीत बोलतात आणि दुर्लक्ष करतात. स्वतःची गाडी घेऊन खानापूर हाळशीकडे जाऊन या एकदा. रस्ता विचारायला प्रत्येक वळणावर कोणतरी मावशी/मामा भेटतात का बघत रहावं लागतं. आणि ही कानडी दंडेली सर्वपक्षीय आहे. म्हादेईच्या उपनद्यांवर धरणे बांधू नका कारण गोवा सीमेवरचे दूधसागर जंगल आणि धबधबा ओसाड पडेल, शिवाय गोव्याचे पाणी कमी होईल असा लवादाचा निर्णय आहे, तरी भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही कन्नडिग सरकारांनी धरणांचे काम चालूच ठेवले आहे. गोवा सरकार निषेध करण्यापलीकडे काहीही करू शकलेले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Fri, 08/01/2014 - 11:57

In reply to ते बिचारे शिकतातच ना! by पैसा

Permalink

कानडी दंडेली निषेधार्हच आहे.

कानडी दंडेली निषेधार्हच आहे. पण जितक्या दोन्ही बाजू हट्टाला पेटतील तेवढी दंडेली वाढतच जाणार. आणि इथे सामंजस्याने प्रश्न सुटण्यासारखा आहे. कामापुरतं कानडी वापरुन सोडुन द्यावं. जर खरच मराठी माणसं जास्त आहेत तर बाकी व्यवहार मराठीत चालतीलच की. दोन दुकानदार एकमेकांशी मराठी बोलतात म्हणून पोलिस येणार नाहियेत अडवायला. पोलिस मराठीत पत्ता विचारल्यास उत्तर देत नसतील तर जवळच्या दुकानदाराला मराठीत विचारावा (मराठी बहुसंख्य आहेत असं ऐकलय. त्यामुळे मराठी दुकानदारच नाहित असे होणार नाही) .. पोलिसाशिवाय पर्याय नसल्यास हिंदी/ इंग्लिशमध्ये विचारावा.. पत्ता शोधताना पत्ता मिळण्याला प्राधान्य द्यावे. भाषिक अस्म्तेला नव्हे. अस्मिताही असावी पण डेडलॉक होतयं म्हटल्यावर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काहितरी विचार करायला हवा. लोकशाही मार्गाने केंद्रात मागण्या चालू ठेवाव्या भाषिक सक्तिविरुद्ध.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 08/01/2014 - 12:24

In reply to कानडी दंडेली निषेधार्हच आहे. by बाळ सप्रे

Permalink

टुरिस्टांना कसली आलीय अस्मिता?

>>जर खरच मराठी माणसं जास्त आहेत तर बाकी व्यवहार मराठीत चालतीलच की. दोन दुकानदार एकमेकांशी मराठी बोलतात म्हणून पोलिस येणार नाहियेत अडवायला.>> मला वाटते तिथले लोक तसेच वागतात. तरी परवा पोलिसांकडून येळ्ळूरला लोकांना घरात घुसून मारहाण झाली असं ऐकलं. पण एवढी दंडेली अस्ताना आणि महाराष्ट्र सरकारची कोणतीही भरीव मदत नसतानाही ते एवढा लढा देत आहेत, म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणारच. निव्वळ पुढार्‍यांची सोय/मतलब म्हणून असे लढे इतकी वर्षे चालत नाहीत. नाहीतर महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई गुजरातला जोडायची मागणी हळूहळू थंड झाली, तशी ही चळवळसुद्धा बंद झाली असती. तुम्ही खानापूरच्या जंगलात आहात. जवळपास माणूस नावाचा प्राणी ५ एक किमि मधे नसावा. समोर सारख्याच रुंदीचे दोन रस्ते दिसताहेत. गोव्याकडे जाणारा कुठचा रस्ता ते तुम्हाला माहिती नाही. जो बोर्ड आहे तो फक्त आणि फक्त कानडीत. इंग्लिशसुद्धा नाही. अशावेळी काय कराल? त्या सरकारला शिव्या देण्यापलिकडे? हे जास्तच जाणवतं कारण कोल्हापूरकडून किंवा लोंढ्याकडून कर्नाटकात शिरताच फक्त एकाच कानडी भाषेतले बोर्ड दिसायला लागतात आणि गोव्यात तर ३ काय चार भाषांतले बोर्ड्स आहेत सगळीकडे! कर्नाटक सरकारला मराठीची चळवळ दडपून टाकायची आहे ना, मग त्याचा त्रास प्रवासी लोकांना का? आणि पोलिसांना हिंदी/इंग्लिशमधे विचारलं तर सरळ दुर्लक्ष करतात. मराठी तर सोडूनच द्या! टुरिस्टांना कसली आलीय अस्मिता!
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Fri, 08/01/2014 - 13:39

In reply to टुरिस्टांना कसली आलीय अस्मिता? by पैसा

Permalink

येळ्ळूरला घरात घुसून मारहाण

येळ्ळूरला घरात घुसून मारहाण हे अतिच झालं पोलिसांचं पण "येळ्ळूर महाराष्ट" बोर्डाचा हट्ट धरणं हेदेखिल अतिच झालं.. बाकी फक्त कन्नड बोर्ड लावणं हे देखिल या हट्टाचा परीणाम.. बेंगळूरला इंग्लिश बोर्ड लावतील पण सीमाभागात नाही!!
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Mon, 08/04/2014 - 10:20

In reply to येळ्ळूरला घरात घुसून मारहाण by बाळ सप्रे

Permalink

जरा

दोन्ही राज्यांनी प्रश्न सुटावा म्हणून महाजन आयोग नेमला.बहुतेक १९६५-६६ च्या सुमारास.आयोगाने निकाल कर्नाटकच्या बाजुने दिला.शहरात/जिल्ह्यात मराठी भाषिक अधिक असले मूळ संस्कृती कन्नड होय असा आयोगाने निर्वाळा दिला होता.त्याच सुमारास शिवसेनेची स्थापना झाली. काहीतरी करून मराठी प्रश्न,अन्याय जिवंत ठेवणे ही मराठी राजकिय नेत्यांची गरज बनली. मग कधी मनोहर जोशी तर कधी शरद पवार तर कधी आणखी कुणी जनता पार्टीचा कुणी नेता.'अन्यायाला वाचा फोडून' स्वतःच्या राजकारणाला सीमाभागाची फोडणी देण्याचे काम त्यांनी केले. सध्या येळ्ळूरकरांमागचा बोलवता धनी कोण हे सांगणे कठीण पण सेना व कॉन्ग्रेस असण्याची शक्यता वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on गुरुवार, 07/31/2014 - 13:38

In reply to कन्नडिगांची मस्ती माहितेय बे by बॅटमॅन

Permalink

सीमा भागात बिगरमराठा 'मराठी'

सीमा भागात बिगरमराठा 'मराठी' लोक आहेत, लिंगायत वाणी जैन वगैरे जास्त आहेत. त्यामुळे इथल्या 'मराठा 'नेतृत्वाला त्यांच्याशी घेणेदेणे नाही, एक बाळासाहेबांनंतर या मुद्दावर कोणीही आक्रमक नाही. टग्या आणि टग्याचा काका पक्के जातियवादी असल्याने तिकडे फिरकतही नाहीत, विदर्भातही मराठा पाँप्युलेशन कमी असल्याने तिकडे फारसे लक्ष देत नाहीत.सीमा प्रश्नी मराठी लोक संघटीत नाहीत याचे कारण' जात' आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on गुरुवार, 07/31/2014 - 14:20

In reply to सीमा भागात बिगरमराठा 'मराठी' by नानासाहेब नेफळे

Permalink

आली, सरकारांची चर्चा जातीवर

आली, सरकारांची चर्चा जातीवर आली एकदाची. ही माहिती सरकार कुठून आणतात देवाला माहित. मागे बारामती च्या एका बातमीतील "गाव धनगर" आहे असं सांगितलं होतं सरकारांनी, आता सीमा भागात बिगरमराठा लोक राहतात हि एक नवी माहिती. नेफळे अहो झोप तरी लागते का, कि झोपेत सुद्धा जात-जातच चालू असतं. सुधरा राव.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on गुरुवार, 07/31/2014 - 14:18

In reply to कन्नडिगांची मस्ती माहितेय बे by बॅटमॅन

Permalink

बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन

बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन काहीच फायदा नाहीए आता. ६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली. शाळेत कन्नड सक्तीचे असल्याने पुढच्या पिढीला कन्नड येतंच. उलट माझ्यासारख्यांना पुणे-मुंबै ते बेंगलुरु-मैसुरु पर्यंतचे सगळे पर्याय सोयीचे वाटतात. फलकाबद्दल- तो फलक बर्‍याच वर्षांपासून होता तिथे. आता न्यायलयाचा निर्णयाविरुद्द पुन्हा फलक लावणे चुकीचेच. पण त्यांच्या दॄष्टीने तो फक्त फलक नव्हता. जाउदे.. फक्त त्या मस्तीचे काय करायचे हाच खरा अनुत्तरीत प्रश्न आहे. आपण आपलं जिकडं(KA-MH) खोबरं मिळंल तिकडं चांगभलं म्हण्तो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/31/2014 - 14:20

In reply to बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन by यसवायजी

Permalink

सहमत आहे. खोबरं तिकडं चांगभलं

सहमत आहे. खोबरं तिकडं चांगभलं हेच उत्तम!!!! बाकी मराठी नेतृत्वाने मनावर घेतल्याखेरीज त्या मस्तीचं काय होत नसतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on Fri, 08/01/2014 - 12:39

In reply to सहमत आहे. खोबरं तिकडं चांगभलं by बॅटमॅन

Permalink

"गुलाल तिकडं चांगभलं" असा

"गुलाल तिकडं चांगभलं" असा ग्रामीण वाक्प्रचार आहे हे नमूद करु इच्छितो.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Fri, 08/01/2014 - 14:44

In reply to "गुलाल तिकडं चांगभलं" असा by नानासाहेब नेफळे

Permalink

वाक्प्रचार आपले आपले..

वाक्प्रचार आपले आपले.. :p
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 08/01/2014 - 14:58

In reply to "गुलाल तिकडं चांगभलं" असा by नानासाहेब नेफळे

Permalink

'चाय त्याचा न्याय' असा रायगड

'चाय त्याचा न्याय' असा रायगड वैगरे भागात वाक्प्रचार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 08/01/2014 - 15:28

In reply to "गुलाल तिकडं चांगभलं" असा by नानासाहेब नेफळे

Permalink

मिरजेत आम्ही खोबरं घालूनच

मिरजेत आम्ही खोबरं घालूनच ऐकलेला आहे. तुमचं गाव कोन्तं म्हणे?
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 08/02/2014 - 16:53

In reply to मिरजेत आम्ही खोबरं घालूनच by बॅटमॅन

Permalink

आम्ही 'सरशी तिथे पारशी' अशी

आम्ही 'सरशी तिथे पारशी' अशी म्हण ऐकली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 08/03/2014 - 01:14

In reply to आम्ही 'सरशी तिथे पारशी' अशी by नितिन थत्ते

Permalink

ही म्हण कुठेशीक वाचल्याचे

ही म्हण कुठेशीक वाचल्याचे आठवते. म्हणींचे स्कॉलरशिपवाले कळेक्षन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Fri, 08/01/2014 - 12:31

In reply to बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन by यसवायजी

Permalink

६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी

६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली.
बापरे माझी पण निम्मी लाकडं मसणात गेली हे ऐकून उगीचच म्हातारं झाल्याचे वाटायला लागलं :(
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 08/01/2014 - 13:52

In reply to ६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

उप्स.....

मी ५४चा, त्यामुळे स्वर्गातूनच मिपा-मिपा खेळतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Fri, 08/01/2014 - 14:47

In reply to उप्स..... by प्रभाकर पेठकर

Permalink

भावानावोंको समझो काकालोग्ज.

:)) भावानावोंको समझो काकालोग्ज.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Fri, 08/01/2014 - 15:14

In reply to उप्स..... by प्रभाकर पेठकर

Permalink

अरे!!! स्वर्गातून मजा काय

अरे!!! स्वर्गातून मजा काय बघताय राव?? इकडे देव असण्या नसण्यावर इतका वाद चालू आहे.. धावतं समालोचन करा की देवभेटीच!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 08/02/2014 - 19:21

In reply to अरे!!! स्वर्गातून मजा काय by बाळ सप्रे

Permalink

??

मी काय धावतं समालोचन-बिमालोचन वगैरे करणार? मराठीत म्हण आहे नं 'आप मेल्याशिवाय स्वर्ग (पर्यायाने देव) दिसत नाही.' मग कायssss मरा.....!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 08/02/2014 - 19:32

In reply to ?? by प्रभाकर पेठकर

Permalink

मरे आपके दुश्मन काका! (आहेत

मरे आपके दुश्मन काका! (आहेत का कोणी? ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 08/02/2014 - 19:45

In reply to मरे आपके दुश्मन काका! (आहेत by यशोधरा

Permalink

अजून तरी नाही.

हा: हा: अजून तरी आमने-सामने कोणी दुश्मनी करू धजलेले नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 07/30/2014 - 22:08

In reply to उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ by बॅटमॅन

Permalink

महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ?

दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं. पूर्णपणे सहमत ! महाराष्ट्राचे वाटोळे कोणी केले ? कन्नडिगांनी का ? बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं जी महाराष्ट्रात येण्यास आसुसली आहेत, त्यांना महाराष्ट्रात काय मिळणार आहे ? इथे फक्त आमच्या माजलेल्या सांड नेत्यांच्या वाढदिवसांच्या फ्लेक्स शिवाय काही नाही ! बरं महाराष्ट्रातली जनता यांच्या {बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं} यांच्यासाठी पेटुन उठेल का ? तर खेदाने सांगावे लागेल नाही ! अहो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पाण्यासाठी उपोषणाला बसणार्‍यांची टिंगल करतात आणि गलिच्छ भाषा वापरतात... त्या महाराष्ट्रात येउन काय मिळणार ? इथे विजही नाही ! बरं वीज नाही त्यामुळे जास्त मुल जन्माला येतात असा जगावेगळा शोध लावणारेच हेच टग्या ! इथे फक्त टगेगिरी चालते... विकास आणि सुव्यवस्थेच्या नावाने पुरती बोंब आहे. जास्त कशाला वेगळ बोलु ? माझ्या लहानपणा पासुन आणि जेव्हा पासुन पेपर वाचत आलो आहे तेव्हा पासुन पावसाळ्याच्या आधी नाले सफाई झाली नाही, नाले सफाईत भ्रष्टाचार, सगळीकडे पाणी तुंबले, मुंबइच्या लोकलवर पावसाचा परिणाम, हार्बरलाइन बंद पडली, खड्डे आणि त्याच्या बातम्या आणि फोटो... हे इतके वर्ष सातत्याने घडताना पाहत आहे,वाचत आहे. कालच लोकसत्तेचा अग्रलेख {राज्य रुतले खड्डय़ांत..!} वाचला होता... फार अस्वस्थ व्हायला होत मला... आपल्या महाराष्ट्रातले राज्यकर्त्ये नक्की काय करतात ? मुंबइच शांघ्याय झाल ? सिंगापुर झाल? कोकणाचा कॅलिफोर्रनिया झाला ? वाटोळ मात्र नक्कीच झालं ! नुसता भ्रष्टाचार...अव्याहतपणे चालणारा ! महाराष्ट्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येत पहिला, विद्यार्थींच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,पोलिसांच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,सर्व प्रकारच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला. काय ठेवलय या महाराष्ट्रात भ्रष्टाचारा शिवाय ? जाता जाता :--- कालच ऑफिसमधुन घरी जाताना जवळपास गुडघाभर पाण्यातुन बाइक काढुन घरी जिवंत पोहचलो ! हेच आमचे जगणे ? नाहीतर खालच्या तरुणासारखा कुठेतरी वाहुन गेलो असतो... आजची स्वाक्षरी :- 'काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं' :(
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/31/2014 - 13:02

In reply to महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ? by मदनबाण

Permalink

परम खेदाने मदनबाणाशी सहमत

परम खेदाने मदनबाणाशी सहमत व्हावे लागत आहे. :( एकसे एक माजलेले गुंठामंत्री, किलो किलो सोने घालून फिरणारे हत्ती यांची मोकाट चराई सुरू आहे. माजुरडे नेते अन त्यांचे दीडदमडीचे चेले यांची गुंडगिरी वगळता महाराष्ट्रात काही उरलेलं नाही. सगळे साले मूर्खागमनी :(
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on गुरुवार, 07/31/2014 - 14:05

In reply to महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ? by मदनबाण

Permalink

अगदी

अगदी मान्य. बेळगाव- संयुक्त महाराष्ट्र याविषयी मिपावरच २०१० मधील पंगांचा हा आणि हा प्रतिसाद आठवला. पंगांसारखे मिपाकर हल्ली इथे का येत नाहीत काय माहित?
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Fri, 08/01/2014 - 17:30

In reply to अगदी by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

पंगांचा आयडी उडवला म्हणून येत

पंगांचा आयडी उडवला म्हणून येत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 11/20/2014 - 16:37

In reply to पंगांचा आयडी उडवला म्हणून येत by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

आयडी

एखाद्या आयडी चा अपमृत्यू कशाने होतो ? :(
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 07/31/2014 - 14:31

In reply to महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ? by मदनबाण

Permalink

खेदानेच पण १००% सहमत

खेदानेच पण १००% सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 07/31/2014 - 14:51

In reply to महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ? by मदनबाण

Permalink

तुलना अस्थानी आहे..

तुलना अस्थानी आहे.. महाराष्ट्रात त्यांना केवळ कन्नड सक्ती टाळण्यासाठी यायचयं.. आणि ते नक्की साध्य होईल महाराष्ट्रात आल्यास. बाकी राहिला प्रश्न महाराष्ट्रातील राजकारण्यांचा आणि राज्यकारभाराचा.. कर्नाटकात काय एवढं रामराज्य आहे?? इथे टग्या तिथे येडंयुरप्पा.. गुंठामंत्री तिकडेही आहेतच.. खाणवाले रेड्डीबंधु वगैरे या गुंठामंत्र्यांचेही बाप निघतील.. इकडे मनसे,सेना, ब्रिगेड .. तिकडे रक्षण वेदिके, श्रीरामसेना सगळे एका माळेचे मणी..
  • Log in or register to post comments

Submitted by पोटे on गुरुवार, 07/31/2014 - 17:31

In reply to तुलना अस्थानी आहे.. by बाळ सप्रे

Permalink

.

तिकडची घरे विकुन इथे घेउन रहा म्हणावं त्याना.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 08/01/2014 - 11:31

In reply to उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ by बॅटमॅन

Permalink

पाइंट नाही?

नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही
जर काही पॉइंट नाहि तर तसाच का नाही ठेऊ दिला तो फलक? कशाला उखडला? तेव्हा कैतरी पॉइंट असणारच ना तो फलक लावण्यात? :P
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 07/30/2014 - 17:36

Permalink

वर

वर प्रशांतने म्हंटल्याप्रमाणे सेना-भाजपाची कोंडी करण्यासाठी मनसेला पुढे आणण्याचा कॉन्ग्रेसवाल्यांचा डाव दिसतोय.तिकडे कर्नाटकातही कॉन्ग्रेसचे सरकार आहे त्यामुळे नाटक जास्त वेळ चालवण्याची परवानगी कॉन्ग्रेसश्रेश्ठि देणार नाहीत्.असो. दिल्ली असो वा येळ्ळूर आपल्या मराठी पुढार्‍यांना कुठलाही मुद्दा चालतो, मराठीच्या नावाने गळा काढायला.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Mon, 08/04/2014 - 10:42

Permalink

उकरून

हा प्रश्न उकरून काढण्यामागे मती गुंग करणारे बारामतीकरच असणार असे हे परवा म्हणाले होते. ते खरे ठरले. http://www.loksatta.com/maharashtra-news/rally-of-ncp-in-yellur-736564/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 11/19/2014 - 20:37

Permalink

शिळ्या कढीला ऊत

धाग्याच्या शीर्षकात बेळगावच्या ऐवजी बेळगावी असा बदल करावा अशी संपादकांना विनंती करीत आहे :D
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 11/19/2014 - 20:41

In reply to शिळ्या कढीला ऊत by प्रसाद गोडबोले

Permalink

आँ

कानडी लोकांसमोर मान टाकलीत का राव!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 11/19/2014 - 20:51

In reply to आँ by पैसा

Permalink

झालं की संपलं आता ... आता

झालं की संपलं आता ... आता कस्लं येतेय बेळगाव महाराष्ट्रात ... सोडुन द्या विषय ...
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 11/20/2014 - 03:14

In reply to झालं की संपलं आता ... आता by प्रसाद गोडबोले

Permalink

नायतर काय. वेगळा विदर्भ

नायतर काय. वेगळा विदर्भ (हागणदारीमुक्त) केला नाही हेच नशीब म्हणायचे! अन नै आलं ते त्यांच्यासाठी बरंच आहे. पुन्हा नायतर दादागिरीसाठी अजूनेक फ्रंट मिळणार, दुसरे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Wed, 11/19/2014 - 20:59

Permalink

बेळगावचं काय घेऊन बसलात ?

बेळगावचं काय घेऊन बसलात ? विदर्भ तरी महाराष्ट्रात राहतोय की नाही देवेंद्र जाणे !
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 11/19/2014 - 21:01

Permalink

१०० झालेच पाहिजेत का???

१०० झालेच पाहिजेत का??? :)
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 11/19/2014 - 22:02

In reply to १०० झालेच पाहिजेत का??? by टवाळ कार्टा

Permalink

+१००

करा सुरु बॅटिंग..!! *lol*
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 11/19/2014 - 22:27

In reply to +१०० by हाडक्या

Permalink

हे बघा मी टीआरपीसाठी एकही

हे बघा मी टीआरपीसाठी एकही प्रतिसाद देणार नाही आधीच सांगून ठेवतोय. समजलं का??? समजलं नसलं तर पुन्हा सांगेनच असं नाही असं नाही असंही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on गुरुवार, 11/20/2014 - 02:00

Permalink

टीआरपी साठी कोणीही प्रतिसाद

टीआरपी साठी कोणीही प्रतिसाद देऊ नये ही नम्र ईनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 11/20/2014 - 13:22

Permalink

कोणता प्रश्न

काश्मीर की बेळगाव ? कोणता प्रश्न आधी ( अजून साधारण ५० वर्षात) सुटेल ?
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on गुरुवार, 11/20/2014 - 15:38

In reply to कोणता प्रश्न by कपिलमुनी

Permalink

बेळ्ळगावी म्हणा वो..

बेळ्ळगावी म्हणा वो..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 11/20/2014 - 16:16

In reply to बेळ्ळगावी म्हणा वो.. by हाडक्या

Permalink

डबल ळ नैये ओ तिथे. शिंगल ळ

डबल ळ नैये ओ तिथे. शिंगल ळ आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com