Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 07/25/2014 - 14:35
महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी वाचून महाराष्ट्रदेशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा. मुख्य लेख वाचण्यासाठी "माऊस ची लेफ्ट क्लीक " आणि "डोळे" वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी ही डोळेच वापरावे लागतील. (आतापर्यंत ७ प्रतिसाद आले आहेत व एकही वाचण्यासारखा नाहीये .) http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtra-karnataka-border/articleshow/38989352.cms अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला बेळगाव यळ्ळुर वर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले मुख्यमंत्री, आपले राज्यपाल, आपले पोलिस अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर बेळगाव यळ्ळुरपासून सुरुवात होऊन इतर काही जिल्हेही एक-एक करून फुटतील व महाराष्ट्र म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली किमान दोन पक्ष अस्मिताधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. बेळगाव यळ्ळुर मध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने कन्नडिगां सारख्या देशद्रोह्यांना शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात! असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल! या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रनोबदांना बंगालीत पाठविली नाही आहेत. आपणही पाठवु नका! राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in जय हिंद! जय महाराष्ट्र ! जय पुणे ! जय हिंजवडी फेज १ ! जय आपलं क्युबिकल नंबर ! जय बेन्च ! आणि सर्वात महत्वाचे

जय मिसळपाव !!

  • Log in or register to post comments
  • 33628 views

प्रतिक्रिया

Submitted by धमाल मुलगा on Fri, 07/25/2014 - 15:04

Permalink

वाईट बातमी!

यळ्ळूरकरांच्या लढ्याला चिरडण्याचं कारस्थान जोरदार चालू आहे तर. पुर्वी अपर्णाताईनं मिपावर यळ्ळूरच्या लढ्याबद्दल लिहिलं होतं त्याची आठवण झाली - http://www.misalpav.com/node/17029
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 07/25/2014 - 15:32

Permalink

नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा

नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा? बेळगाव पाकीस्तानात चाललय की काय? इथे महारष्ट्रात काय चांगले होतय की कोणाला महारष्ट्रात यावे असे वाटावे. गुंड आणि टग्यांचे राज्य इथे. आतातर खुल्या वर्गातल्या जागा पण कमी झाल्या. सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल>>> कसली पुण्याई?
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 07/25/2014 - 15:45

In reply to नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा by प्रसाद१९७१

Permalink

अरे

अरे ते सॅर्कॅस्टिक का म्हणतात तसे आहे असे वाटतय. कानडावू विठ्ठलू कर्नाटकू ऐवजी कानडावू विठ्ठ्लू महाराष्ट्र्रू असे म्ह्णायचे ह्यापुढे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 07/25/2014 - 20:13

In reply to नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा by प्रसाद१९७१

Permalink

आवो, ते शिर्षक आसं टोकेरी

आवो, ते शिर्षक < > आसं टोकेरी कंसात लिवलंय बगा ! आता हसा बगू ;)
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 07/25/2014 - 15:40

Permalink

मी

दुसर्‍या राज्यात जावून ही असली पाट्या,ध्वज लावायची टगेगिरी करावीच का म्हणते मी?त्यांच्या लोकांनीही येथे कोल्हापूरात्,सोलापूरात असले प्रकार केले तर चालवून घ्यायचे का? ईतक्या वर्षानंतरही असल्या पेटवापेटवीच्या प्रकारांना महत्व दिले जाते हे मराठी माणसाचे दुर्दैव.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/25/2014 - 15:42

In reply to मी by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

+१

मराठी जतन करण्याचे अन्यही बरेच मार्ग आहेत. उगी राडेबाजी का करावी ते समजत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Fri, 07/25/2014 - 15:55

In reply to मी by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

सहमत आहे. जर ते मुळात

सहमत आहे. जर ते मुळात कर्नाटकात आहे तर तिथे महाराष्ट्राचा दगड लावणेच चुकीचे आहे
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 07/25/2014 - 16:44

In reply to सहमत आहे. जर ते मुळात by मृत्युन्जय

Permalink

आयला!

सीमाप्रश्न सुटला? कधी? यळ्ळूरकर गेली कित्येक वर्षं कर्नाटक सरकारशी लढत आहेत. अधिक माहितीसाठी : कॉलिंग: अपर्णा अक्षय!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 07/30/2014 - 20:16

In reply to आयला! by धमाल मुलगा

Permalink

आर मी तुला बोलवते आहे आन तू

आर मी तुला बोलवते आहे आन तू मला बोलाव! झाल! म्या बेळगावात हाये. मला वाचीव!
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 07/25/2014 - 16:00

Permalink

बेंच की जै?

>>जय बेन्च ! बेन्चवर आहात वाट्टं.... (पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते).
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 07/25/2014 - 18:01

In reply to बेंच की जै? by नितिन थत्ते

Permalink

गुप्त संदेश

(पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते). >>> आपली हरकत नाही त्यालाही :) ! तिकडे कन्नडिग्गांच्या राज्यात बंगळुरुला गोल्द्मन सच्स ची मस्त ऑफर सोडुन इथे पुन्यात येवुन बसलोय ... अल्मोस्त १००% रेज द्यायला तयार झाले होते ते सोडुन आमचं पुणं आमचा सातारा म्हणुन इथे येवुन बसलोय :( !

  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 07/25/2014 - 18:04

In reply to गुप्त संदेश by प्रसाद गोडबोले

Permalink

म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त

म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त होतेय की काय? :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 07/25/2014 - 18:19

In reply to म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त by यशोधरा

Permalink

म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त

म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त होतेय की काय >>> चिडचिड ? तुकाराम बुवांनी तर म्हणुन ठेवलय "ठेविले अनंते तैसेची रहावे | बेन्चवरी असु द्यावे समाधान || " त्यामुळे काही चिडचिड नाही ... मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास ... कधी इथं का ड्या सार तर कधी तिथं *pardon* ... खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते तर मजा आली असती *biggrin* बाकी पुढील चर्चा व्यनितुन !!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 07/25/2014 - 18:25

In reply to म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त by प्रसाद गोडबोले

Permalink

>>खरंच राव अत्ता गिरीजा आयडी

>>खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते तर मजा आली असती अजूनही वेळ गेली नाही गिर्जाकाका, एखादा स्त्रीआयडी घ्यायचा विचार करु शकतोस. ;) ह. घे. हो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 07/25/2014 - 18:25

In reply to म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त by प्रसाद गोडबोले

Permalink

मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास

मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास ... कधी इथं का ड्या सार तर कधी तिथं >> कधीतरी वा मेबी तुमच्या बाबतीत सहसा टाईमपास म्हणून काड्या वा टिंगल वगैरे ठीके, पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? :) प्रयत्न तर करा, जमत असल्यास. खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते>> नाही, माहित होते, तिकडेही झालेय की हे आयडी प्रकरण आणि कधी ना अक्धी कळतेच की लोकांना.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 07/25/2014 - 18:46

In reply to मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास by यशोधरा

Permalink

नको

पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? प्रयत्न तर करा, जमत असल्यास.
नको . आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ... अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत (आणि कोणी अंतर्जालावर लिहुन खुप मोठा कादंबरीकार कथाकार कवी झालयाचे पाहण्यात नाही ) त्यापेक्षा आपलं बरं ... वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 07/25/2014 - 18:52

In reply to नको by प्रसाद गोडबोले

Permalink

आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन

आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ...
आमचंही असंच आहे. :)
अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत
एक मिपाप्रसिद्ध उदाहरण आमच्या पाहण्यात आहे.
वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!
आमचं तर कामच असं आहे की मिपा बंद करण्याची आवश्यकताच भासत नाही. क्रोमच्या इतर सतराशे साठ टॅबमध्ये एक टॅब मिपाचीही. तुमच्या धाग्याला बेळगांवच्या वाटेला लावण्याबद्दल क्षमस्व. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 07/25/2014 - 18:57

In reply to नको by प्रसाद गोडबोले

Permalink

ते हवेत जाणन, न जाणं स्वतःवर

ते हवेत जाणं, न जाणं स्वतःवर अवलंबून असतं. तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण जशी ही एक प्रकारची नशा असते ना, तशीच कोणत्याही आणि जवळपास प्रत्येक धाग्यावर टिंगलटवाळी करायचीही नशाच असते. त्याची उदाहरणं मिपावर आजवर कमी नाहीत. ( तुम्हांला उद्देशून वगैरे हे नाही, गेल्या ५ वर्षांत जे पाहिलं आहे ते सांगतेय) इथे वा कोणत्याही संस्थळावर कादंबरीकार, कथाकार वगैरे व्हायला कोणी येत नाही, येऊ नये. ५- ५० लाईक्स ने फुगून जाऊ नये, असं होत असेल, कोणी ह्यासाठी येत असेल तर त्यांनी आपापले इगो तपासून पहायची गरज आहे हे नक्की. इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं. थट्टा, विनोद, मस्करी ह्याचं वावडं नाहीच, फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे. असो. शुभेच्छा तुम्हांला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 07/25/2014 - 19:10

In reply to ते हवेत जाणन, न जाणं स्वतःवर by यशोधरा

Permalink

इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त

इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं.
स्वांतसुखाय >>> मी आनंदासाठी काहीच करत नसतो .... अनंदाने करीत असतो *i-m_so_happy*
फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे.
कुस्करी झाली तरी ती अंतर्जालीयच राहील ह्याची आजवर काळजी घेतली आहे , कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ... आंतर्जालीय वास्तव्य आणि खरे अस्तित्व ह्या मध्ये डिस्टिन्क्शन करायला शिकले पाहिजे आपण ( माझ्यामते मला आजवर तरी ते जमले आहे :) ) ! कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो ( हे माझं मत नाही , सोशल नेटवर्किंग आणि त्याचे ह्युमन सायकी वरील परिनाम ह्यावरचा कोणतव्हीअभ्यासक हेच सांगेल ) आणि ह्याच कारणासाठी मल्टीपल आणि अन ट्रॅकेबल आयडी अलाऊड असले पाट्रॅकेबलसं माझं प्रांजळ मत आहे :) तुमच्या शुभेच्छांचा आदराने स्विकार करत आहे . मनःपुर्वक धन्यवाद :) त.टी : पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आलातर तुमच्या लक्षात येईल अंतर्जालावरचा प्रगो अन खर्‍या आयुष्यातला पश्या ही दोन खुप वेगळी व्यक्तिमत्वे आहेत :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 07/25/2014 - 19:13

In reply to इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त by प्रसाद गोडबोले

Permalink

कित्येक मतांवर कचकचीत विरोध

कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ...
हे बाकी खरं आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 07/25/2014 - 19:17

In reply to कित्येक मतांवर कचकचीत विरोध by धन्या

Permalink

+११११ आतापर्यंत तरी.

+११११ आतापर्यंत तरी. ;) एक दोघांना भेटायचंय. मात्र भेटल्यावर काय होईल माहिती नाही. :P
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 07/25/2014 - 19:33

In reply to +११११ आतापर्यंत तरी. by प्यारे१

Permalink

जेव्हा कधी योग येईल तेव्हा

जेव्हा कधी योग येईल तेव्हा तुला भेटायला येताना मी माझे पुष्पक विमानच घेवुन येणार आहे *angel*
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 07/25/2014 - 20:19

In reply to +११११ आतापर्यंत तरी. by प्यारे१

Permalink

एक माहिती आहे, दुसरा कोण याचा

एक माहिती आहे, दुसरा कोण याचा अंदाज लावत आहे ;) :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/25/2014 - 19:13

In reply to इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त by प्रसाद गोडबोले

Permalink

कारण माणुस जसा खराखुरा असतो

कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो
हाण तेजायला! या वाक्यासाठी तुला पार्टी लागू.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 07/25/2014 - 19:57

In reply to कारण माणुस जसा खराखुरा असतो by बॅटमॅन

Permalink

कारण माणुस जसा खराखुरा असतो

कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो
जे ब्बात!! आता ब्याट्या पार्टी देतोय म्हणताना मी वेगळे कष्ट घेत नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 07/25/2014 - 19:17

In reply to इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त by प्रसाद गोडबोले

Permalink

ओके. हरकत नाही

ओके. हरकत नाही :) पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आला तर तुमच्या लक्षात येईल आंतर्जालावरची यशो अन खर्‍या आयुष्यातली यशो ही दोन वेगळी व्यक्तिमत्वे नाहीत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 07/26/2014 - 02:15

In reply to ओके. हरकत नाही by यशोधरा

Permalink

(No subject)

*ok* *smile*
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 07/25/2014 - 16:40

Permalink

मला वाटतं आता इतिहासाची पानं

मला वाटतं आता इतिहासाची पानं मागे पलटत बसण्यापेक्षा राज्याराज्यांतून शेजारच्या राज्यांची भाषा शिकवण्याचे वर्ग काढा .महाराष्ट्रात कानडी आणि गुजराथी वगैरे .महानगरपालिकांच्या शाळांत संध्याकाळी शिकवा .आज आम्हाला शेजारच्या राज्यात पर्यटन करायला गेल्यावर इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो हे दुर्दैव आहे .विनोबा भावेंचं उदाहरण घ्या .आठ देशी आणि सहा परदेशी भाषा येत होत्या . पुढे जाण्याचे विचार नवीन पिढीसमोर मांडा हो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 07/25/2014 - 17:09

In reply to मला वाटतं आता इतिहासाची पानं by कंजूस

Permalink

मी बेळगावात जन्माला आलो असतो

मी बेळगावात जन्माला आलो असतो तर मला मराठी बरोबर कन्नड पण आली असती. मी पुण्यात / बंगलोर ला दोन्हीकडे लोकल भाषेत बोलू शकलो असतो. कन्नड ग्रुप मधे कन्नड म्हणुन आणि मराठी लोकांच्यात मराठी म्हणुन खपुन गेलो असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/25/2014 - 17:16

In reply to मला वाटतं आता इतिहासाची पानं by कंजूस

Permalink

कन्नड शाळा सांगली-मिरजेत

कन्नड शाळा सांगली-मिरजेत अजूनही आहेत- किमान २००३ सालापर्यंत तरी पाहिल्याचे आठवते. अन्य सीमावर्ती भागांतही असाव्यात बहुधा.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Mon, 07/28/2014 - 20:05

In reply to मला वाटतं आता इतिहासाची पानं by कंजूस

Permalink

कन्नड शाळा सोलापुरातही आहेत.

कन्नड शाळा सोलापुरातही आहेत. निपाणीत कन्नडपेक्षा मराठी शाळा जास्त आहेत. सरकारकडून तेवढं आधीच केलं गेलंय. पण सरकारी कागदपत्रे, कोर्टकचेर्‍या, वगैरे कन्नडमध्ये. याचा त्रास होतो लोकांना.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 07/25/2014 - 19:41

Permalink

आपलं झालं थोडं व्याह्यानी

आपलं झालं थोडं व्याह्यानी धाडलं घोडं असा प्रकार आहे हा सगळा. कायदेशिर पणे महाराष्ट्राचा भाग असणार्‍या प्रदेशात काय सोयीसुविधा देतयं सरकार? अजुन वाढीव भाग समाविष्ट करुन काय साधणार आहे? हाच प्रश्ण महानगरपालिकेच्या हद्दीत नव्यानी समाविष्ट होणार्‍या गावांबद्दलही विचारता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/26/2014 - 02:56

Permalink

हा विडंबनाचा धागा फार सिरियसली घेणार्‍यांनी आधी

मूळ स्रोत आणि त्याचं नंतर एकदा आलेलं विडंबन हेही नजरेखालून घालायला हरकत नाही ;-) बाकी मटा मधली बेळगावची बातमी वाचली तेंव्हाच मिपावर धागा निघणार याची खात्री होती, तो विडंबनात्मक निघाला हे फार बरं!
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Tue, 07/29/2014 - 17:02

Permalink

महाराष्ट्रात येवून बेळगावचं

महाराष्ट्रात येवून बेळगावचं भले काही भलं नाही होवो (खरं म्हणजे हेच खरं असावं). पण कन्नड्यांना हाणायला काय हरकत आहे? शिवसेना नेहमी तर या मुद्द्यावरून शंख करत असते. आता कर्नाटकाच्या एसट्या महाराष्ट्रात का फोडल्या जात नाहियेत? नॅशनल हायवे कोल्हापूरला बंद करून त्यांच्याकडे जाणारे ट्रक्स अडवता येवू शकतात. कृष्णेचं पाणी ब्लॉक करता येवू शकतं. शेट्ट्यांना हाकलून देता येवू शकतं. नाशिकचा कांदा अडवता येवू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 07/30/2014 - 19:35

In reply to महाराष्ट्रात येवून बेळगावचं by काळा पहाड

Permalink

तुमची

तुमची ती कॅनरा बॅन्क्,कॉर्पोरशन बॅन्क व इन्फोसिसही फोडता येईल असे हे आवेशात येवून म्हणाले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 07/29/2014 - 17:47

Permalink

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका जवळ आलेल्या आहेत. ह्या घटनेचं निमित्त करुन मराठी मुद्द्यावर 'मनसे'ला पुढं आणण्याचं कार्य काँग्रेसकडून होत असण्याची शक्यता वाटते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पोटे on Tue, 07/29/2014 - 20:49

Permalink

.

सीमावाल्यांची अवस्था संत मीराबाईगत झालेली आहे. मीराबाईला अन्न वस्त्र निवारा तिचा नवरा द्यायचा. पण ती लबाड बाई त्याला सुख न देता देवाच्या लाकडी पुतळ्याला नवरा मानत होती. सीमावाल्याना सोयी कर्नाटक देते ( अर्थात रेव्हेन्युही घेते.) पण याना कुंकु मात्र म्हाराश्ट्राचे हवे आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 07/29/2014 - 23:08

In reply to . by पोटे

Permalink

आततायी प्रतिसाद

आपला अभ्यास किती आपण बोलतो किती ? काहीतरी ताळमेळ ठेवा राव !!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 07/29/2014 - 23:20

In reply to आततायी प्रतिसाद by प्रसाद गोडबोले

Permalink

फारच अपेक्षा राव तुझ्या!! ;)

फारच अपेक्षा राव तुझ्या!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/30/2014 - 17:29

In reply to आततायी प्रतिसाद by प्रसाद गोडबोले

Permalink

उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ

उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ मुद्दा बरोबरच आहे असं मला वाटतं. उपमेबद्दल चर्चा तूर्त करीत नाही. अर्थात याचा अर्थ कर्नाटक पोलिसांची गुंडगिरी समर्थनीय आहे असा आजिबात नाही. पण यांनी विचार करावा, मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत. नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही, त्यातही मराठी नेत्यांकडून *ट काही होणार नाही हे ढळढळीत दिसत असतानाही! हे ***** नेते 'आपल्याच' विदर्भ आणि मराठवाड्याला धड जोडू शकले नाहीत, बेळगाव काय *ट घेणारेत? गफ्फा हो, नुसत्या गफ्फा! बेळगाव इ. आपल्याकडे हवा असं लाख वाटतं हो मलाही, पण यांच्या **त दम नाही त्याचं काय? मुंबैत बसून गफ्फा मारणारे केंद्रात मात्र उघडे पडतात! दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं.
  • Log in or register to post comments

Submitted by पोटे on Wed, 07/30/2014 - 17:36

In reply to उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ by बॅटमॅन

Permalink

.

नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही, ........ म्हणुनच तर म्या त्याना मीराबै म्हटलं . ती लाकडी पुतळा बाळगुन होती, हे लाकडी फलक लावुन बसलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Wed, 07/30/2014 - 22:03

In reply to उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ by बॅटमॅन

Permalink

परिणाम भोगायची तयारी असणार्

परिणाम भोगायची तयारी असणार्‍यांनीच असले उद्योग करावेत हे बरोबर. पण अगदिच शांतपणे बघत बसले, तर मग गर्व, अभिमान तर सोडाच, स्वतःच्याच 'गल्लीत' लाज वाटायला लागेल की. मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत ते कोणते सांगावे. म्हणजे जर उद्या दुकानावरच्या मराठी पाट्या काढण्यात आल्या तर प्रतिक्रीया काय असेल? (असे किरकोळ प्रकार झाले आहेत.) त्याच्या पुढे जाऊन दारावरची पाटी कन्नडमध्ये लावण्याची सक्ती केली तर? - पासपोर्ट व्हेरिफिकेशनवेळी निपाणी पोलिस स्टेशनमध्ये माझा वाद झाला होता. *** साले मराठीत बोलायलाच तयार नव्हते. "कन्नडा माताड इल्लादरे पासपोर्ट सिगल्ला" (कन्नड बोल नाहीतर पासपोर्ट मिळणार नाही) असे जरी तो पोलिस हसत (?) म्हणाला असला तरी आता मस्ती नक्कीच आलीय त्यांना. माझ्या जवळच्या नातेवाईकाने, निपाणीत फक्त मराठी बोलल्याने लाठीचा मार खाल्ला आहे. -(मुळचा KA23/ सध्या MH12) SYG
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/31/2014 - 12:57

In reply to परिणाम भोगायची तयारी असणार् by यसवायजी

Permalink

कन्नडिगांची मस्ती माहितेय बे

कन्नडिगांची मस्ती माहितेय बे यसवायजी. पण माझा मुद्दा असा आहे की या लोकांना- द्याटिज़ निप्पाणी, बेळगाव, इ. गावांतल्यांना महाराष्ट्रात येऊन कायच मिळणार नाही. हे कटु सत्य आहे. कर्नाटकवाले माज सोडत नाहीत आणि महाराष्ट्रातल्यांच्या अंगी तो दमही नाही, अशा परिस्थितीत काय करावे? मला असं वाटतं खरं. असो. जर यांच्याइतक्याच जोराने काही केलं तर ठीक, नपेक्षा दिल्या घरी सुखी रहा असेच खेदाने म्हणावे वाटते. :( :( असो...भावना समजून घेतल्या, पण मार्ग काय ते कळत नाही. मराठी नेतृत्व नेभळट दिसत असल्याने मी जे म्हणालो ते म्हणालो इतकेच.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/31/2014 - 12:58

In reply to कन्नडिगांची मस्ती माहितेय बे by बॅटमॅन

Permalink

बाकी, ऑल सेड & डन,

बाकी, ऑल सेड & डन, यळ्ळूरकरांनी फलक लावणे चूक आहे असेच मला वाटते. ते एक असो.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 07/31/2014 - 13:16

In reply to बाकी, ऑल सेड & डन, by बॅटमॅन

Permalink

अरे

सहमत रे. काही नातेवाईक आहेत तिकडे.कधीच भाषेची अडचण आली नाहि त्यांना.सीमाभागातही गुजराती,मारवाडी बांधब बर्यापैकी व्यापार करून आहेत असे ऐकले आहे.विशेषकरून मिठाईचा.त्यांना नाही का अडचण येत भाषा शिकायला? कसे शिकतात ते चटकन? ईकडे महाराष्ट्रात आसाम्,राजस्थानचे लोक येतात्,भाषा आतम्सात करतात व धंदा करून पैसेही मिळवतात. तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 07/31/2014 - 13:25

In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

मग

तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.
मग ? तुमचा मनसेला पाठींबा आहे का हो नेफळे ?
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 07/31/2014 - 14:11

In reply to मग by प्रसाद गोडबोले

Permalink

स्थानिक भाषा शिकण्याचा आग्रह

स्थानिक भाषा शिकण्याचा आग्रह म्हणजे मनसे नव्हे. मनसे म्हणजे असे इतर मुद्दे आणि खळ्ळ खट्याक यांचं काँबिनेशन आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 07/31/2014 - 15:06

In reply to स्थानिक भाषा शिकण्याचा आग्रह by बाळ सप्रे

Permalink

अगदी

अगदी योग्य बोललास बाळ.मनसेचे 'टार्गेट' का काय म्हणतात ते म्हणजे रोजगारी करणारे अमराठी लोक.मराठीच्या नावाने राजकारण करणार्यांनी राज्यात २/४ मराठी ग्रंथालये बांधली तरी पुरे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 08/01/2014 - 13:14

In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

आज एका फोरमवर एका मुंबईच्या

आज एका फोरमवर एका मुंबईच्या बावीस तेवीस वर्षांच्या बाब्याशी ओळख झाली. बोलणं अर्थातच हिंदीत चालू होतं. म्हटलं तू मुळचा कुठला त म्हणे "देल्हीका. नॉर्थ इंडीयन" मुंबईत केव्हापासून आहेस तर म्हणे "बॉर्न अँड ब्रॉटप इन बॉम्बे". बॉम्बे बरं का. मुंबई नाही. म्हटलं तू नॉर्थ इंडीयन किंवा दिल्लीचा कसं म्हणू शकतोस? तू तर महाराष्ट्रीय आहेस. तुझे आई वडील कामानिमित्त मुंबईत आले असतील तर ते फार तर म्हणू शकतात की आम्ही नॉर्थ इंडीयन किंवा दिल्लीचे आहोत म्हणून. अशा काही मिरच्या झोंबल्या त्याला.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Fri, 08/01/2014 - 13:30

In reply to आज एका फोरमवर एका मुंबईच्या by धन्या

Permalink

बॉर्न अँड ब्रॉटप इन बॉम्बे

बॉर्न अँड ब्रॉटप इन बॉम्बे असून "देल्हीका. नॉर्थ इंडीयन" असणे हे देखिल अस्मितेचेच गळू.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com