मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही अनवट खाद्यमिश्रणे

अत्रन्गि पाउस · · पाककृती
तसे आपण अनेक नवीन जुने पदार्थ करून खातोच पण मला काही पदार्थ एकाबरोबर एक आवडतात... त्यांना विशिष्ट काही नावे नाहीत ....कदाचित तुम्ही हे करून खात असाल...तसे असेल तर फारच उत्तम ....पण नसाल तर खाऊन बघा आवडतात का आणि तुम्ही पण असे काही करत असाल तर सांगा... १. उत्तम बासमती तांदुळाचा भात + मेतकुट + तूप +साय+ दुध ...त्यावर दह्याची मोठी खाप + एक उकडलेला बटाटा +किंचित मीठ २. दही, दुध भाताला उत्तमपैकी तूप जिर्याची आणि लाल तिखटाची फोडणी बरोबर पाव भाजीची भाजी ३. पाव भाजीचा अतिबटर लावून भाजलेला पाव + चहा ४. माणिक पैंजण + गोड ताक + ताज्या कैरीच्या लोणच्याचा खार ५. कुस्करलेली शिळी भाकरी त्याला ज्यास्त तेल मोहोरिची फोडणी बा SSSS रिक चिरलेला कांदा ६. ४ अंडी + अर्धा कप दुध + मीठ / मिरपूड एकत्र फेटून तूप/बटर वर खरपूस लाल फ्राय केलेले आम्लेट ७. चितळ्यांची बाकरवडी कुस्करून त्यावर घुसळलेले सायीचे दही किंवा टाक ८. उकडून जाडसर कुस्करलेला बटाटा + भाजलेल्या दाण्याचे कुट + तिखट मीठ;+ तूप जिर्याची फोडणी. ९. माफक उकडलेली बारीक चिरलेली फरसबी + दही + जिरेपूड + मिठाची कणी -----------सगळ्यात डेडली ---- आता मी खात नाही पण ---तरीही उत्तम प्रतीचे श्रीखंड त्यावर पातळ केलेले भरपूर तूप आणि वर चमचाभर पेरलेली बारीक पिठीसाखर ....... इत्यलम

वाचन 30250 प्रतिक्रिया 63