चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा
मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा
येऊनिया न यावा माझा प्रयास कामी
नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा
ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा
एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा
एकी अशी असावी, निश्चय असा असावा
हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा
झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी
प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा
विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा
आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा
माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी
कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा
- अपूर्व ओक
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3890
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप छान गजल ! आवडली !
हातात हात यावे,
In reply to खूप छान गजल ! आवडली ! by psajid
:) नाही...
In reply to हातात हात यावे, by राजेंद्र मेहेंदळे
गजल नव्हे गझल
एकाहून एक कविता पाडायलेत राव
क्या बात वेल्लाः
सुंदर.
वाह!
क्या बात
सुरेख गझल!
खूप आवडली.
माझेच मी पुसावे अश्रू असे
सुंदर !!!
क्या बात है वेल्लाशेठ, मस्तच
_/\_ धन्यवाद सगळ्यांचे
आवाडली
मस्तये.. आवडली..
जबरदस्त आशावाद!
आभार !:)
In reply to जबरदस्त आशावाद! by आयुर्हित
सुंदर आवडलीच.