Skip to main content

इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 25/07/2014 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत. काही उदाहरणे देत आहे. १) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते. २) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' ३) Bicycle करिता 'सायकल' ४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. ५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !! ६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं. ७) Cinema/Movie साठी 'पिक्चर' तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?

वाचने 97588
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

नंतर सांगतो, आत्ता थोडा वीकनेसपणा आलाय!

In reply to by वामन देशमुख

मग डॉक्टरना (किंवा डॉक्टरीणबाईंना) बोलवाकी हो Doctor

In reply to by मराठी कथालेखक

डॉक्टरीणबाईं आमच्याकडे दवाखान्यात नोकरी करत असलेल्या लेडीज बायकांना "सिस्टरिणबाई" असं म्हणतात!

झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?

In reply to by कविता१९७८

Xerox ला इंग्रजीत पण Xerox नाही म्हणत हो !! Photocopy म्हणतात. आपण मात्र Ricoh/Canon ई कोणत्याही मशिनवर Xerox काढत असतो. पुढे कधी काळी ती Xerox कंपनी बंद पडली तरी भारतात मात्र तिचे अस्तित्व कायमच टिकून राहील !!

In reply to by आदूबाळ

भेटणे हे क्रियापद अनेक जण वापरताना तारतम्य बाळगत नाहीत. मला पेन किंवा असे वस्तु सुचक शब्द भेटत नाही. सापडते किंवा मिळते. जीवंत मानव एकमेकांशी भेटतो. निर्जीव वस्तूंसाठी हे क्रियापद वापरू नये असे वाटते.

In reply to by आदूबाळ

>>>>तर ती मिळाली, सापडली का भेटली? म्हैस बेवारशी असेल आणि तुम्ही तिला पाळण्यासाठी आपल्या घरी नेलीत तर ती 'रस्त्यात मिळाली'. जर आधीपासून तुमचीच असेल आणि हरवली असेल तर जेंव्हा ती दिसली तेंव्हा ती 'सापडली' म्हणता येईल. 'भेटली' म्हणण्यासाठी तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखणे अपेक्षित आहे. तसेच, दोघांनी थांबून एकमेकांशी कांही संभाषण करणे, भावनिक आदानप्रदान होणे आवश्यक आहे. तसे असेल तर ती 'भेट' म्हणता येईल. जसे, 'गेल्यावर्षी मी माझी गाय एका शेतकर्‍याला विकली. तीची आणि माझी काल रस्त्यात भेट झाली. तिने मला आणि मी तीला ओळखलं. मी तिच्या गळ्याखाली कुरुवाळलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिने माझ्याकडे पाहून तिचं डोकं माझ्या अंगावर घासलं. आणि ओळख दर्शविली.' असे झाल्यावर तो माणूस घरी येऊन आपल्या घरच्यांना म्हणू शकतो 'अरे! आज मला रस्त्यात आपली 'आनंदी' किंवा 'कपिला' (जे नांव असेल ते) भेटली होती. तिने मला लगेच ओळखलं. खुप वाईट वाटलं रे आम्हा दोघांनाही.' वगैरे वगैरे. अन्यथा एक गाय अथवा म्हैस 'दिसली' हेच योग्य होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

आपण सापडणे, भेटणे व मिळणे ह्यातील फरक उत्तमरित्या अधोरेखित केला आहे. परंतु मराठी भाषेच्या शुद्ध असण्याबद्दल लोकांमधे कमालीचे औदासिन्य आहे. पेन भेटले, बसचे तिकिट भेटले हे हिंदीत मिलना हे क्रियापद आहे त्याचे मराठीत केलेले कलम आहे. " कल मुझे अपना पुराना दोस्त मिला था. " "कल मेरा फोन खो गया था, आज मिला." ह्यातील मिलना हे क्रियापद सजीव निर्जीव सगळ्यांकरता वापरले जाते म्हणून त्याचे मराठी रुप भेटणे हेही असेच सजीव वा निर्जीवांकरता वापरावे असा सोयिस्कर समज काही शॉर्टकट बहाद्दरांनी करुन घेतला आहे. कदाचित नागपूरसारख्या हिंदाळलेल्या मराठीतून हा शब्दप्रयोग मराठीत आला असेल. मलाही सगळ्याला भेटणे म्हणणे चूक वाटते. तोच प्रकार बोलणे व म्हणणे ह्यात होतो. "काल रमेश बोलला की सगळ्या लोकल लेट आहेत." ह्यात बोलला पेक्षा म्हणाला हे जास्त समर्पक आहे. पण इथेही बोलणे हेच क्रियापद सर्रास वापरले जाते.

In reply to by शशिकांत ओक

आमच्या मावळात लोकल भेटते, मोबाईल भेटतो , बस भेटते.. ;)

In reply to by आदूबाळ

पाचगणीतल्या बर्‍याच विन्ग्रजी शाळेत जाणार्‍या पोरांच्या तोंडी 'रिमूव्ह प्रिंट/पेज' असं ऐकलंय. प्रिन्ट निकाल, पेज निकाल वगैरे साठी. बाकी तिथंही बर्‍याच जणांना मार्क भेटतात.

In reply to by प्यारे१

उस्मानाबादच्या एका कॉलेजातल्या मास्तर आणि विद्यार्थी यांचा संवाद: what my father's go - म्हणजे माय मराठीत माझ्या बापाचं काय जातंय नगर कॉलेजच्या मास्तर आणि विद्यार्थ्यांचा संवाद: you people are drinking cigarette under tree - तुम्ही लोक झाडाखाली उभे राहून सिगरेट पिताय :)

In reply to by प्यारे१

शाळेतल्या पोरांचं सोडा. आमचा रिजनल हेड म्हणतो, "अरेSS रिमूव्ह सम टाईSSम, लेट्स डू इट ना.." :))

In reply to by यसवायजी

एका टायवाल्याचा दुसर्‍या टायवाल्याशी बसमधे ऐकलेला संवाद.. "हे, आय हॅव रिमूव्हड युवर टिकीट अल्सो हा!"

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टुथ्पेस्ट म्हणजे कोल्गेट :) आयटी / सोफ़्टवेयर म्हणजे इन्फोसिस :) माझ्या ओलखीचे एक काका आहेत त्यांनी मी फ्रेशर असताना विचारलं "काय रे कुठे नोकरी लागली तुला". मी सांगितलं "पर्सिस्टनट मध्ये". काका म्हणाले काय करते हे कंपनी. मी सांगितलं सोफ़्टवेयर बनवते. काका म्हणाले "अच्छा म्हणजे इन्फोसिस मध्ये नोकरी लागली तुला :) "

In reply to by धन्या

हे मी पण दोनतीन लोकांकडून ऐकलं आहे. बहुदा लोकांना "इन्फोटेक" म्हणजे "इन्फोसिस" वाटत असावं! माझे एक दूरचे काका आहेत. त्यांनी मी दहावी पास झाल्यानंतर इन्फोसिस(?) हेच कसं बेष्ट करियर आहे हे परोपरीने पटवून द्यायचा प्रयत्न केला. चंद्रमोहन नावाच्या त्यांच्या मित्राची मुलगी तेव्हा टाटा इन्फोसिस मध्ये नुकतीच लागली होती. तिचं उदाहरण सारखं देत असत. मी "जाणार नाही" हे निक्षून सांगितल्यावर "थू: तुझ्या जिंदगानीवर" असा चेहेरा करून बोलायला लागले. अजूनही बोलतात. टाटा इन्फोसिस मधली चंद्रमोहनची मुलगी आता मोठ्या पदावर आहे.

In reply to by आदूबाळ

हे वाचून माझ्या आजोबांची आठवण आली. आईचे वडील हे अल्फाबेटस वाचनापुरते इंग्रजी शिकले होते. माझी आई बी ए झाल्यावर त्यांना भयंकर अभिमान वगैरे वाटला होता. (ज्या काळी मुलींची १८ व्या वर्षी लग्ने होत त्याकाळी मुलीला बी ए होईतो शिकवणे आणि त्यावर टायपिंगच्या क्लासला घालणे हे म्हणजे अतिच समजत असत) ;) पुढे अनेक वर्षांनी माझी मामेबहिण पेढे देऊन नमस्कार करून म्हणाली की "आजोबा मी बीई इलेक्ट्रॉनिक्स झाले" त्यावर ते (वय ९५) म्हणाले "अरेरे! जुन्या काळी मी मुलीला बी ए केले आणि आज तू फक्त बीई झालीस, जरा ई पासून ए पर्यंत येण्यासारखा अभ्यास का नाही केलास?" आम्ही हसून लोळलो होतो. त्यावर "अचरट कार्टी" असा शेरा त्यांनी मारला. ;)

In reply to by रेवती

जेव्हा साखर कारखानदारांनी आपल्या गावांत नवीन नवीन महाविद्यालये उघडणे सुरू केले त्यावेळेची गोष्ट आठवली. एका कारखान्याच्या चेअरमनने मोठ्या अभिमानाने प्राध्यापकांच्या मुलाखतीत भाग घेतला होता. एका उमेदवाराने आपले शिक्षण एम एस सी असे सांगितल्यावर चेर्मन सायबांनी, "पन मंग तुमी मॅट्रीक झाला का नाय ते सांगा अदुगर." असे म्हणून उमेदवारालाच नव्हे तर इतर मुलाखत घेणार्‍यांनाही गारद केले होते ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काहीही खोटं सांगू नका ,आमच्या प महाराष्ट्रतल्या साखर कारखानदारानी पार युके जर्मनी युएसतल्या कंपन्यांशी करार करुन रिफाईन्ड शुगर, अल्कोहोल, कोजनरेशन प्रोजेक्ट उभारलेत ,ते इतका दूधखुळा प्रश्न विचारतील असे वाटत नाही...

In reply to by नानासाहेब नेफळे

त्या वाक्याची सुरुवात वाचा हो पहिली, मग समजेल तो कोणता काळ होता ते... मग उचलली जीभ लावली टाळ्याला असे करून बेजबाबदार आरोप करण्याची प्रवृत्ती जरा तरी काबूत येईल असे वाटते (अर्थात हा आपला माझा आशावाद आहे). मी सांगीतलेल्या काळात त्या विभागात मी स्वतः रुरल इंटर्नशीपसाठी ६ महिने राहिलो आहे. उस शेतकर्‍यांपासून ते अनेक स्तराच्या साखर कारखानदारांशी प्रत्यक्ष संबंध आणि बोलणे झालेले आहे... तीच गोष्ट महाविद्यालयात काम करणार्‍या प्रिंसिपल-प्राध्यापक वगैरेंबद्दल. हा किस्सा तेथे फार प्रसिद्ध झाला होता. तो तुम्हाला माहित नाही म्हणजे तुमचा पश्चिम महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीच्या इतिहासाचा अभ्यास कमी पडतोय असे दिसते ! खरा अभिमान असायला आधी अभ्यास जरूर आहे हे नमूद करावेसे वाटते. मी पण पश्चिम महाराष्ट्राबद्दल अभिमान बाळगून आहे. पण फुक्या अभिमानाच्या लागणीने अस्मितेची गळवे होऊ नयेत इतके मानसिक स्वास्थ्य कमावून आहे. तुम्हालाही स्वास्थ्यासाठी अनेक शुभेच्छा ! :) (तुमच्या आयडीचा एकंदर स्वभाव पाहता ही नुसती फुसकी काडी असण्याचा संभवही नाकारता येत नाही... तसे असले तर मग आम्ही खो...खो...खो असे हसलो आहे असे समजा. {हल्ली स्मायल्या गायब आहेत तेव्हा शब्दांवरच समाधान मानून घ्या :) ;) }

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझे आजोबा एका कारखान्याचे डायरेक्टर होते व मी त्याच कारखान्याचा सभासद आहे

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासायेब, आवो ही दंतकथा नाही तेथे प्रत्यक्ष हजर असलेल्या अनेक जणांकडून ऐकलेली आहे. तुमच्या आजोबांचे माहिती नाही. पण एकापेक्षा जास्त कारखानदारांशी वैद्यकीय व्यवसायिक म्हणून वैयक्तीक स्तरावरही संबंध आलेला आहे. त्यावेळेस त्यांचे सर्वसामान्य ज्ञान आणि अचानक आलेल्या सधनतेचा असर असलेली वागणूक हे दोन्ही जवळून पाहिलेले आहे. तेव्हा याबाबत जास्त चर्चा न वाढवणे तुमच्याच फायद्याचे राहील असे वाटते ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून काही... ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्या एकाच तालुक्यात त्या काळी पाच साखर कारखाने होते.

In reply to by मराठी कथालेखक

झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे. http://www.merriam-webster.com/dictionary/xerox अधिक माहितीसाठी हे वाचा. http://en.wikipedia.org/wiki/Genericized_trademark झेरॉक्स सध्या to xerox हे क्रियापद लोकांनी वापरू नये म्हणून प्रयत्न करत आहे. असे चालू राहिल्यास xerox हा शब्द त्या कंपनीच्या मालकीचा राहणार नाही. http://en.wikipedia.org/wiki/Xerox#Trademark

In reply to by संचित

गूगलही प्रचार करत आहे लोकांना 'टू गूगल' असं क्रियापद वापरण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी. जालावर अजून शोधले असता बँड-एड हेही जनेरीक झालेलं ब्रँड नेम आहे असं दिसलं. फोटोशॉपही त्याच मार्गावर आहे.

In reply to by अनुप ढेरे

झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे.
असंही काही चालू आहे हे माहित नव्हतं. पण हे म्हणजे जनरेट्यामुळे अतिक्रमणे नियमित करण्यासारखं आहे.

काही चूक नाही त्यात. आपल्या भाषांची वाट लावणार्‍या त्या इंग्रजीची आपणही शक्य तितकी वाट लावलीच पाहिजे ;)

In reply to by बॅटमॅन

त्यांची झोपडी आपण तोडलीच पाहिजे... ते करताना आपला बंगला मोडला तरी बेहत्तर ! ;) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आपला बंगला आणि कशाला मोडतोय ओ? ज्याला झोपडी म्हटले जाते त्यांनाच अधिकृत करून बंगल्याचा पार्ट म्हणून आत घ्यायचे अन जरा रिनोव्हेषण केले की जंक्षाण कामच झालं की ओ ;)

In reply to by बॅटमॅन

बाकीचे युरोपियन्स लावतात की वाट. आपल्यापेक्षा जास्त. इतालियन किंवा स्पॅनिश लोकाम्शी इन्ग्लिश बोलताना खूप धमाल येते.

In reply to by बॅटमॅन

आपल्या भाषांची वाट लावणार्‍या त्या इंग्रजीची आपणही शक्य तितकी वाट लावलीच पाहिजे
हरकत नाही , पण सध्या आपण नेमकी कशाची वाट लावत आहोत ? इंग्रजीची की मराठीचीच ? कारण इंग्रजीत लिहताना आपण 1) She is my wife 2) There was a huge queue at Cinema 3) The movie was damn good असं बरोबरच लिहतो.

In reply to by बॅटमॅन

इंग्रजी ही मुळातच अशुद्ध भाषा आहे. त्यात खुप्श खुपशे फ्रेंच, दॉईच आणि इतर बरेच शब्द आहेत. आपण एक एका अर्थाने ती भाषा अजुन समृद्धच करत आहोत. लै लिहिण्यासारखे आहे ह्या विषयावर.

In reply to by केदार-मिसळपाव

अर्थातच सहमत आहे. मला इंग्रजीच्या तथाकथित शुद्धतेबद्दल आग्रही अन मातृभाषेबद्दल अनाग्रही लोक पाहिले की मजा वाटते त्यामुळे मजेने म्हटलो इतकेच.

In reply to by बॅटमॅन

इंग्रज नविन शब्दांबद्दल किंवा एक/अनेक जुने शब्द वापरून बनवलेल्या शब्दांकडे "भाषा बिघडवली" या दृष्टीने बघतात असे वाटत नाही... ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मोठ्या अभिमानाने दर वर्षी "न्यू वर्ड लिस्ट वर्ष>" जाहीर करते / छापते... ही आहे २०१२ ची नविन शब्दसूची अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. मुख्य म्हणजे असे करताना जगातल्या कोणत्याही भाषेतली आवक त्यांना निषिद्ध नाही असे दिसते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. सहमत. पूर्वीही अशाच विषयाच्या धाग्यावर शांताबाई शेळके यांनी सांगितलेले विचार टंकले होते. जी भाषा काळाप्रमाणे बदलत जाते तीच टिकते अशा अर्थाने त्या म्हणाल्या होत्या.

In reply to by रेवती

भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार आहे, एखाद्या नदीला जसे ओढे ओहोळ येऊन येऊन त्या नदीला समृद्ध करतात ,जर ओढे बंद केले तर नदीचे प्रवाहीपण बंद पडेल व डबके होऊन ती वास मारायला लागेल.तसेच भाषेचे आहे ,उदा- संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या.

In reply to by नानासाहेब नेफळे

आयला, म्हणजे गेल्या अडीच हजार वर्षांपासून संस्कृत मरणासन्न आहे होय? नवीनच शोध लागला, धन्यवाद बरं का नेफळेसाहेब.

In reply to by बॅटमॅन

मागच्या अडीचहजार वर्षात कोणत्या कालखंडात लोक संस्कृतातून सर्रास बोलत होते, केव्हा ती बोलीभाषा होती ? एखाद्या भाषेचे डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे ती प्रचलीत भाषा आहे असा गैरसमज झाला आहे काय? (माझा हा प्रतिसाद संस्कृतातून खरडून दावल्यास संस्कृतात अजूनही धुगधुगी आहे हे मान्य करु)

In reply to by नानासाहेब नेफळे

गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् काले जना: सर्वथा संस्कृतेन वार्तां कुर्वन्ति स्म, अपि च कदा सा लोकभाषा आसीत्? कस्याश्चित् भाषाया: केवलम् आलेखनं उपलब्धम्, अतः सा प्रचलिता भाषा, इत्येषा मिथ्यामति: किम्? (ममेतद् प्रत्युत्तरं संस्कृतेन लिख्यते चेत् 'संस्कृतम् अद्यापि ऊर्जयते' इति अंगीकुर्मः|)

In reply to by पिशी अबोली

पिशी आनी बॅटमॅन असताना (माइंड इट - बॅट्मॅन - काव्य वगैरे करतो तो संस्कृत मध्ये...) त्यांना असले भुक्कड चॅलेंजेस देणे म्हणजे... जौ दे... अजुन बॅटमॅनाचे एखादे काव्य कसे आले नाही इथे..???

In reply to by नानासाहेब नेफळे

ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय क्रॉसचेक करायला म्हणजे त्याला संस्कृत नक्की चांगलं येतं हे तुम्हीच मान्य करताय की.. म्हणजे संस्कृत उत्तम जाणणारी एक व्यक्ती इथे नक्कीच आहे हे तुम्हाला मान्यच आहे. आता माझा अनुवाद अगदी शून्य मार्क मिळवण्याजोगा असला, तरीही ते क्रॉसचेक करु शकणारा बॅटमॅन उत्तम संस्कृत जाणणारा आहे हे तुम्हाला मान्य असल्यामुळे संस्कृतमधे धुगधुगी आहे हेही तुम्हाला मान्य करावंच लागेल, हो ना नेफळेसाहेब?

In reply to by पिशी अबोली

ब्याटम्यानभाऊ फारच विश्लेषण करतात भाषेचं, लँग्वेज सिम्यानटीक्स ,फोनेटीक्स ,मॉर्फोलॉजी वगैरे वगैरे! खरे तर त्यांनाच आव्हान केले होते पण त्यांनी सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही, आता क्रॉस चेक करुन खरे खोटं सांगा, बघू जमते का त्यांना!!

In reply to by नानासाहेब नेफळे

सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही
हा हा हा :D ब्याट्या, पळ का काढला का च्यालेंज फाट्यावर मारलं बे ??

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे, तुम्ही बॅटमॅन साहेबांना परत आव्हान द्या आणि यावेळी तुम्ही हरले तर काय करणार हे पण लिहा - जसं हरलो तर नेफळे पुन्हा मिसळपाव वर दिसणार नाही :) आणि अजून एक, फक्त "नानासाहेब" नाही सगळेच "साहेब". इथे बाकीचे पण काही "साहेब" आहेत आणि ते सगळे नेफळेच आहेत हि आतली खबर माहित आहे सगळ्यांना.

In reply to by नाव आडनाव

ब्याटोबाला आव्हान दिले तेव्हा ते बर्याच वेळ ऑनलाईन होते,दुसर्या दिवशीही याच धाग्यावर होते, परंतु फिरकले नाहीत ,बहुधा बराच खटाटोप करुनही जमले नसावे ,मग अबोलीताईंना धाडले असावे. असो ,चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला मिपासारख्या अग्रेसर संस्थळावर तीन दिवस लागतात यावरुन आम्ही काय समजायचे ते समजलो. (तरीही उपरोक्त भाषांतर ग्राह्य मानतो व संस्कृतात धुगधुगी आहे हे मान्य करतो )