डांबरी रस्त्यावर
लांबच लांब डांबरी रस्त्यावर
घरंगळत जाणारे पावसाचे पाणी
कुठेतरी जाऊन थांबत असेलच
कदाचित, तिथेच तू भेटशील..
--
तुला ते पाणी भेटल्यावर
मी सोडलेली कागदाची नाव
तुला सापडली असेलच त्यावर
त्या नावेत तुझ्यासाठी
माझी स्वप्नं पाठवली आहेत
एखाद्या तरी स्वप्नाने तुला
घायाळ केले असेलचं...
--
त्या नावे पाठोपाठ
नारळाच्या करवंटीत
चार चाफ्याची फुलं पाठवली आहेत
सकाळी घराच्या मागच्या आंगणात
सापडली तेव्हा
तुझ्या स्मिताचा सुगंध आठवला
--
तुझ्यापर्यंत पोहचतांना
किती चिमुकले भवरे पार केले असतील
त्या नावेने कुणास ठाऊक
पण तुला सापडली कि जप तिला
तशी ती नाव खुप भक्कम आहे
पण पाणी एकाजागी थांबत नसतं
आणि नावेला कुठेतरी किनार्याला
लागणं गरजेचं असतं
--
लांबच लांब डांबरी रस्त्यावर
घरंगळत जाणारे पावसाचे पाणी
कुठेतरी जाऊन थांबत असेलच
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२४/०७/२०१४)
पाणी झरत चालले...
(No subject)
क्या बात मिकेश लय भारी
छान!
(No subject)
नेहमीप्रमाणेच छान!!
एकदम आवडली !
हिच कविता दुसर्या कोणी
वरचा प्रतिसाद असा अर्धवट का दिसतोय?
>>> हा आमचा मि.का. नाही.
कदाचित
लब्बाड
बरीचशी आवडली...
क्क्या बात !
स्वप्नांची नाव आवडली.
छान!!!
आवडली कविता.
सरांच्या म्हणण्याला दुजोरा.
आवडली..!
जियो
एकदम झकास
छान !
खासच !!